Home » ऑफिसमध्ये कंन्फर्टेबल आणि स्टाइलिश दिसण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

ऑफिसमध्ये कंन्फर्टेबल आणि स्टाइलिश दिसण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

by Team Gajawaja
0 comment
Bond with colleagues
Share

तुमचा ड्रेसिंग सेंस हे तुमचे व्यक्तीमत्व एखाद्या समोर मांडते. त्यामुळे आपण जे काही कपडे घालतो त्यात आपण खरंच कंफर्टेबल आहोत का हे सुद्धा पहावे. कारण काही वेळेस असे होते की, आपण अशा प्रकारचे कपडे घालतो जे आपल्यावर दिसतात छान पण त्यात आपण कंफर्टेबल नसतो. खासकरुन जेव्हा आपण ऑफिसमध्ये दररोज काय कपडे घालावे असा प्रश्न पडतो तेव्हा आपल्याला आपण घातलेल्या कपड्यांमध्ये कंफर्टेबल तर रहायचे असते पण स्टायलिश ही दिसायचे असते. अशावेळी नेमके काय करावे किंवा कोणत्या प्रकारचे कपडे आपण निवडावे असे विविध प्रश्न आपल्याला पडतात. यावर साधा-रसळ आणि सोप्प्या काही टीप्स फक्त तुम्हाला फॉलो कराव्या लागणार आहेत. तर जाणून घेऊयात याबद्दल अधिक.(Office wear ideas)

-कॅज्युअल वेअर्स घालणे काही वेळेस टाळा
ऑफिसमध्ये जेव्हा एखादी मिटिंग किंवा एखादा कार्यक्रम असेल तेव्हा कॅज्युअल वेअर्स घालणे टाळले पाहिजे. कारण त्यावेळी आपण ज्या प्रोफेशन मध्ये काम करतोय त्याअनुरुप आपण आपल्या कपड्यांची निवड केली पाहिजे. कपडे निवडताना सुद्धा ते आपल्या व्यवस्थित फिट होतायत का किंवा ते घातल्यानंतर आपण त्यात कंफर्टेबल असू का असे स्वत: ला विचारा. अन्य वेळेस तुमच्या ऑफिसमध्ये जर कॅज्युअल वेअर्स घालणे चालत असेल तर ते नक्की तुम्ही घालू शकता.

-कंफर्टेबल कपडे आणि साइजकडे लक्ष द्या
परफेक्ट फिटिंग आणि कंफर्टमध्ये योग्य अंतर असले पाहिजे. कारण उत्तम फिटिंग असलेल्या कपड्यांमध्ये तुमचे व्यक्तिमत्व दर्शवतेच. पण अतिफिटिंग असलेल्या कपड्यांमुळे तुमची चिडचिड होऊ शकते. त्यामुळे ऑफिसमध्ये नेहमीच असे कपडे घाला जे तुम्हाला उत्तम फिटिंगचे असतील आणि त्यात तुम्ही कंफर्टेबल सुद्धा असाल. कारण या दोन्ही गोष्टींमुळे तुमचा आत्मविश्वास ही कुठे ना कुठे वाढला जातो. या व्यतिरिक्त कधी कधी फॅशन ट्रेंन्ड नुसार ही तुम्ही ऑफिससाठी कपडे निवडू शकता.

हे देखील वाचा- नोकरी करताना पैशांची बचत कशी करावी?

Office wear ideas
Office wear ideas

-असे कपडे निवडा ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल
आत्मविश्वासू व्यक्ती या नेहमीच प्रत्येकाला भावतात. कारण त्यांचा आत्मविश्वास पाहून आपल्याला काम करण्याची उमेद मिळते. त्यामुळे ऑफिससाठी नेहमी अशा कपड्यांची निवड करा ज्यामध्ये तुमचा आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. विविध रंग किंवा कपड्यांच्या पॅटर्ननुसार तुम्ही तुमचे ऑफिस वेअर्स निवडा. याचा परिणाम तुमच्या कामावर ही कहीवेळेस होतो.(Office wear ideas)

-फुटवेअरवरकडे ही लक्ष द्या
बहुतांश महिला या आपण स्टाइलिश दिसण्यासाठी कपड्यांकडे अधिक लक्ष देतात. मात्र फुटवेअरच्या बाबतीत त्या ब्रँन्ड किंवा क्वालिटीकडे फारसे लक्ष देत नाहीत. पण हे चुकीचे आहे. कारण कपड्यांमध्ये आपण जेवढे कंफर्टेबल असतो तेवढेच आपण घातलेल्या फुटवेअरमध्ये सुद्धा कंफर्टेबल असले पाहिजे. एका अभ्यासानुसार, बहुतांश लोक सर्वात प्रथम तुमचे फुटवेअर्स नोटीस करतात. त्यामुळे नेहमीच उत्तम क्वालिटीचे फुटवेअर्स खरेदी करा. जे तुमच्या कपड्यांसोबत मिळतेजुळते असतील.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.