Home » Odisha : पुरीजवळ आहे, कलेचे गाव !

Odisha : पुरीजवळ आहे, कलेचे गाव !

by Team Gajawaja
0 comment
Odisha
Share

ओडिशा येथील पुरीमध्ये भगवान जगन्नाथ रथयात्रेसाठी लाखो भाविकांचा मेळा भरला आहे. 8 जुलैपर्यंत पुरीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक येणार आहेत. हे भाविक पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिरासह गुडिंचा मंदिरालाही भेट देत आहेत. त्यानंतर हे भाविक पुरी येथील समुद्रकिना-यावरही फेरफटका मारत आहेत. (Odisha)

मात्र यासोबत पुरी शहराच्या आसपास असलेल्या पर्यटनस्थळांवरही या भगवान जगन्नाथांच्या भाविकांनी गर्दी केली आहे. यातील प्रमुख स्थळ म्हणजे, रघुराजपूर गाव. पुरीपासून अगदी थोड्या अंतरावर असलेले हे रघुराजपूर गाव कलाकारांचे गाव आहे. या गावातील सर्व घरांवर आकर्षक चित्रे काढलेली आहेत. याशिवाय पुरी येथील प्रसिद्ध ‘पट्टाचित्र’ याच गावात तयार केली जातात. ताडपत्रांची कलाकुसर आणि लाकडी कोरीवकाम यामुळे रघुराजपूर गाव जगभरात प्रसिद्ध आहे. पुरी जगन्नाथ यात्रेसाठी आलेले जगभरातील भाविक या रघुराजपूर गावातही हमखास फेरफटका मारतांना दिसत आहेत. त्यामुळे या गावातील कलात्मक वस्तूंना चांगली मागणी वाढली आहे. या कलाकुसरीच्या वस्तू प्रामुख्यानं महिला कलाकार करतात. या वस्तूंना मागणी वाढल्यामुळे या महिला कलाकारांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. (Social News)

पुरी येथील जगन्नाथ यात्रेसाठी जगभरातून लाखो भाविक या नगरीमध्ये दाखल झाले आहेत. प्रभू जगन्नाथांसह त्यांच्या रथांचे दर्शन झाल्यावर हे भाविक पुरी परिसरातील अन्य मंदिरांमध्येही गर्दी करीत आहेत. यासोबत पुरी जगन्नाथांच्या मुर्ती आणि चित्र घेण्यासाठी हे सर्व भाविक पुरी जवळील रघुराजपूर या गावाला भेट देत आहेत. रघुराजपूर हे पुरीजवळील एक प्रसिद्ध गाव असून ते कलाकारांचे गाव म्हणून ओळखले जाते. पट्टाचित्र चित्रकला आणि इतर पारंपारिक कला या गावातील घराघरात केल्या जातात. शिवाय हे रघुराजपूर गाव पुरी शहरापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे पुरी येथे आलेले भाविक या गावाला भेट देत आहेत. (Odisha)

समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणा-या या गावामध्ये सरकारतर्फेही विविध योजना राबवून येथील कलाकारांच्या कलेचा जगभरात प्रचार करण्यात येत आहे. रघुराजपूर हे पारंपारिक ओडिशा चित्रशैली पट्टाचित्र कलेचे एक प्रमुख केंद्र आहे. या गावातील प्रत्येक घरामध्ये ही पट्टाचित्र चित्रशैली जपण्यात आली आहे. या गावातील प्रत्येक घरातील एकतरी महिला या कलेसाठी मोठे योगदान देत आहे. त्यामुळेच केंद्र सरकारनं या गावाल विशिष्ट दर्जा दिला आहे. या गावात पट्टाचित्र, ताडपत्री रंगकाम, दगड आणि लाकूड कोरीव काम यासह अन्य कलेतून हजारो वस्तू तयार केल्या जातात. या सर्व वस्तू खरेदी करण्यासाठी आणि येथील कलाकारांना भेटण्यासाठी सध्या येथे पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. याशिवाय मुख्य गोष्ट म्हणजे, रघुराजपूर गाव हे ओडिसी शास्त्रीय नृत्याचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या गावातील अनेक महिला कलाकार ओडीशी गोटीपुआ नृत्यामध्ये पारंगत आहेत. त्यामुळे भगवान जगन्नाथ यात्रेदरम्यान आलेले अनेक भाविक ही नृत्यकला शिकण्यासाठीही या रघुराजपूर गावामध्ये काही दिवसांचा मुक्काम करतात. (Social News)

आत्ताही अशाच कलाकारांची या गावात गर्दी झाली आहे. गावात येणा-या पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज असलेल्या रघूराजपूर गावाला निसर्गाने सौंदर्याची मोठी देणगीही मिळाली आहे. या गावाभोवती नारळ, ताडाची झाडे आणि फणसाच्या बागांचा वेढा आहे. या झाडांच्या मध्ये असलेल्या रघुराजपूरमध्ये सुमारे 120 घरे आहेत. या सर्वच घरांमध्ये पट्टाचित्रे, पारंपारिक मुखवटे तयार करणे, भगवान जगन्नाथांच्या कागद्याच्या लगद्यापासून तयार केलेल्या लहान मुर्ती, लाकडी खेळणी तयार केली जातात. याच रघुराजपूर गावामधील अनेक कलाकारांचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला आहे. या सर्व कलाकारांच्या घराच्याही भींतीही मोठी चित्र काढून सजवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळेच हे सुंदर गाव बघण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं रघुराजपूरला भेट देत आहेत.  रघुराजपूरमध्ये 12 व्या शतकातील कापडावरील चित्रकला शैली प्रत्यक्षात भगवान जगन्नाथ यांच्या कृपाशीर्वादानं भरभराटीस आली, अशी येथील स्थानिकांची धारणा आहे. (Odisha)

=============

हे ही वाचा : 

Jagannath Temple : भगवान जगन्नाथ नंदीघोष रथावर होणार स्वार

Kolhapuri Chappal: राज्या-महाराजांच्या पायाची शोभा वाढवणाऱ्या कोल्हापुरी चप्पलेचा जाज्वल्य इतिहास

=============

या पट्टाचित्रांसाठी जे रंग वापरण्यात येतात, ते स्थानिक फळ आणि फुलांपासून तयार केले जातात. शंख आणि दिव्याच्या काजळीपासून पांढरा आणि जळलेल्या नारळाच्या कवचापासून काळा असे नैसर्गिक रंग येथे तयार होतात. पट्टाचित्रांच्या माध्यमातून भगवान जगन्नाथांच्या कथा कापडावर चितरण्यात येतात. याशिवाय रामायण आणि महाभारातील कथा सांगणारी अनेक चित्रे हे कलाकार तयार करतात इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट्स अँड कल्चरल हेरिटेज ने रघुराजपूरला पहिले हेरिटेज क्राफ्ट व्हिलेज म्हणून 1998 मध्ये निवडले. यातून या गावातील रहिवाशांना पट्टाचित्र शैलीचे अधिक प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे या गावाचा झपाट्यानं विकास झाला. आता हे रघुराजपूर गाव भारतातील कलेचे गाव म्हणून ओळखले जात आहे. या गावातील कलाकुसरीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी आणि या गावचा फेरफटका मारण्यासाठी आता पुरी येथील भाविक मोठ्या संख्येनं येथे भेट देत आहेत. (Social News)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.