काजू हा सर्व सुक्यामेव्यातील आवडता घटक म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पांढ-या शुभ्र काजूचा गर (nuts) आवडत नाही असा कोणी शोधून सापडणार नाही. पण काजू जरी सर्वांना आवडत असला तरी काजू घेणं म्हणजे खिशाला मोठा खड्डा पडल्यासारखे असते. कारण काजू साधारण 1000 ते 1200 हजार किलोपर्यंत मिळतो. त्यामुळे अनेकजण काजूची कमी शेंगदाण्यांवर भरुन काढतात. पण तुम्हाला सांगितलं तर मोठ्या आकारचा काजू अगदी 40 ते 50 रुपये किलोपर्यंत मिळू शकेल तर यावर विश्वास ठेवता येईल का? अगदी टोमॅटो, कांद्याच्या दरात मिळणारा हा काजू सध्या देशात लोकप्रिय होत आहे. हा काजू गोव्यात किंवा कोकणात होत नसून हा काजू आहे, झारखंड राज्याच्या जामतारा या भागातील आहे. जामतारा हे गाव आधी ऑनलाईन फसवणुकीसाठी बदनाम झालेले आहे. आता हेच जामतारा गाव काजूसाठी लोकप्रिय ठरत आहे. येथील काजू खूप स्वस्त असल्याचे प्रमुख कारण म्हणजे, जामताराचा बहुतांशी भाग आता काजूच्या झाडांनी व्यापून गेला आहे. त्यामुळे या भागात काजूचे भरपूर उत्पादन येते. हा काजू त्यामुळेच जामताराच्या स्थानिक बाजारात अगदी भाजीच्या दरात विकला जातो. त्यामुळे या जामतारा काजूची लोकप्रियता वाढत आहे. (nuts)
भारतात सुक्या मेव्यामध्ये काजू सर्वाधिक लोकप्रिय आहे. काजूचा (nuts) वापर मिठाईमध्ये हमखास केला जातो. काजू कतली नावाची बर्फी भारतात सर्वाधिक खाल्ली जाते. हा काजू बहुतांशी गोवा, तामिळनाडू आणि कोकणप्रांतात होतो. गोड पदार्थ काजूचा वापर झाल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तसेच शाही भाज्यांमध्येही काजूचा वापर आवश्यक करण्यात येतो. त्यामुळेच काजूची (nuts) मागणी वाढती असते आणि या मागणीनुसार काजूची किंमतही चढीच असते. बहुताशी काजू हा 1000 रुपयांच्या पुढेच विकला जातो. अस्सल आणि दर्जेदार काजू 1500 रुपयांच्या पुढे विकला जातो. हा काजू ज्यांना परवडत नाही ती मंडळी तुकडा काजू, म्हणजेच काजूचे तुकडेही विकत घेतात. पण हाच काजू अलिकडे अगदी 40 ते 50 रुपयांना उपलब्ध झाला आहे. हा दर ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. झारखंडमधील जामतारा भागात काजूचे मुबलक उत्पादन घेतले जाते आहे. त्यामुळे तेथील काजूचे (nuts) दर अगदी कमी असून त्याची चव आणि दर्जा मात्र चांगला आहे. पण हे सर्व व्यवहार करताना खात्री करुन घ्यावी आणि नंतरच व्यवहार करावा असा सल्लाही दिला जात आहे. हा सल्ला काजूच्या दर्जाबाबत नसून तर जामताराच्या पूर्वीच्या ओळखीबाबत आहे. जामतारा हे ऑनलाईन फसवणुकीसाठी कुप्रसिद्ध होते. तेच जामतारा आता काजूसाठी लोकप्रिय होऊ पाहत आहे.
जामतारा काजू अगदी भाजीच्या दरात उपलब्ध आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे, येथे काजूची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. या काजू झाडांपासून भरघोस उत्पादन मिळत आहे. जामतारा हे झारखंडचे एक छोटेसे शहर आहे. जामतारा जिल्ह्यात अनेक एकरांवर काजूची लागवड करण्यात आली असून त्यामुळे स्थानिक बाजारात काजूचे दर अगदीच स्वस्त आहेत. या काजूला (nuts) वाढती मागणी आहे, आणि हे पाहून अजून अधिक जागेवर काजूची लागवड करण्यात येत आहे. जामतारा काजू हा आता ऑनलाईनवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या भागात शेती हे रोजगाराचे साधन होते. पण त्यातील बेभरोशी उत्पादनामुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान होत होते.
अशात जामतारा येथील काही प्रगतीशील शेतक-यांनी ओरिसातील कृषी शास्त्रज्ञांच्या मदतीने काजूच्या रोपांची लागवड केली. या रोपांची व्यवस्थित काळजी घेतली गेली. या काजूच्या झाडांची वाढ झाल्यावर आता त्याच्यापासून भरघोस उत्पादन मिळत आहेत. हे पाहिल्यावर अन्य शेतकरीही काजूच्या शेतीकडे वळले आहेत. आणि जामतारा हा काजूसाठी प्रसिद्ध झाला आहे. आता हा जामतारा काजू (nuts) ऑनलाईन विकला जात असून त्याद्वारे शेतक-यांना चांगले पैसे मिळत आहेत. मात्र जामतारा हा भाग ऑनलाईन फसवणुकीसाठी कुप्रसिद्ध आहे याचीही जाणीव ठेवा हे आवाहन आहे.
=======
हे देखील वाचा : पिवळी केळी खाल्ली असतील पण लाल केळी खाल्लीत का?
=======
त्यामुळे जामतारा येथून ऑनलाइन काजू मागवायचे असल्यास योग्य तपासणी करूनच ऑर्डर द्यावी आणि शक्यतो हाती काजू पडल्यावर पूर्ण पैसे द्यावेत असे आवाहनही आहे. गुगलवर जामतारा काजू असे सर्च करण्यासाठी टाकल्यावर तेथील अनेक डीलर्स आणि शेतकर्यांचे नंबर आणि संपर्क तपशील उपलब्ध होतात. त्यातून हा जामतारा काजू अगदी अल्प दरात विकत घेता येईल.
सई बने