जायफळाचा (Nutmeg) वापर भारतीय गोड पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. अतिशय सुगंधी असलेले हे छोटुसे जायफळ मोठे गुणकारी मानले जाते. याच्या सुगंधाबरोबरच यातील औषधी गुणधर्मामुळे जायफळचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. पण या जायफळाबरोबर त्याची पत्रीही तेवढीच औषधी मानली जाते. जायफळाच्या (Nutmeg) भोवती असलेल्या या आवरणाला जायपत्री किंवा जावेत्री असे म्हणतात. ही जायपत्री तिखट मसाले, करण्यासाठी जशी वापरली जाते, तशीच चहाचा सुगंधी मसाला करण्यासाठीही या जायपत्रीचा वापर होतो. मुख्य म्हणजे ही जायपत्री मधुमेहाचा शत्रू असल्याची माहिती आहे. जायपत्री (Nutmeg) घातलेला चहा घेतल्यास मधुमेह असलेल्यांना मधुमेहाचे प्रमाण नियंत्रीत ठेवण्यास मदत होऊ शकते.

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले आणि मधुमेहाचे निदान झाले की, त्या माणसाला खूप काळजी घेण्यास सांगितले जाते. वाढत्या मधुमेहामुळे किडणी आणि शरीरातील अन्यही अवयवांना त्रास होऊ शकतो. त्यामुळेच मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. अशात जायपत्री ही खूप गुणकारी आहे. जायफळ (Nutmeg) आणि जायपत्रीही प्रत्येक भारतीय आहारात वापरली जाते. पण यासोबत त्याचे गुण माहित असले तर हा वापर अधिक सुखकारक होऊ शकतो. जायपत्रीचा वापर आहारात असल्यास फक्त मधुमेह नियंत्रणात राहते असे नाही तर यामुळे शरीराची प्रतिकारशक्तीही वाढते. जायफळाप्रमाणेच जायपत्रीही सुगंधी असते. पण त्याचा अतिरिक्त वापर झाल्यास पदार्थात थोडा कडवटपणा येतो. त्यामुळेच त्याचा अगदी थोडा वापर होतो. पण हा थोडा वापरही त्या पदार्थाची चव वाढवतो आणि त्याचे गुणही वाढवण्यास मदत होते. पुलाव, बिर्याणी यांसारख्या पदार्थांमध्ये स्वतंत्र मसाला म्हणून जायपत्रीचा (Nutmeg) वापर केला जातो. याशिवाय चहा मसाला, केक, बिस्कीट करतांनाही त्याचा वापर होतो. मात्र याबरोबरच रोजच्या चहाच्या ऐवजी या जायपत्रीचा वापर केलेला चहाही करता येतो. हा एक आरोग्यदायी असा काढाच आहे. यासाठी पाणी उकळावे, उकळत्या पाण्यात जायपत्रीचे काही मोजके तुकडे घालावे. साधारण दहा मिनिटे हे पाणी उकळल्यावर ते गाळून घेतांना त्यात थोडे मध घालावे. हा अत्यंत आरोग्यदायी असा चहा तयार होतो. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात रहाण्यास मदत होते. या जावपत्रीमध्ये अँटी-मायक्रोबियल, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-कर्करोगजनक आणि मधुमेहविरोधी गुणधर्म असल्याचे एका शोधात निष्पन्न झाले आहे. एवढेच नाही तर मज्जासंस्था आणि यकृताचे रक्षण करण्यातही या जायपत्रीमुळे मदत होते. पचनसंस्थेसंबंधी काही आजार असल्यास या जायपत्रीच्या पाण्याचा फायदा होतो.
जायफळ (Nutmeg) ज्याप्रमाणे पचनास मदत करते त्याचप्रमाणे जायपत्रीही पचनासाठी फायदेशीर असते. अनेकवेळा तोंडातून दुर्गंधी येते. दात स्वच्छ ठेवण्यासाठी आणि तोंडातील दुर्गंधी दूर करण्यासाठी अगदी छोटा जायपत्रीचा (Nutmeg) तुकडा तोंडात ठेवल्यास त्याची मदत होते. एवढेच नाही तर, यात अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म देखील असतात. यामुळे तोंडाचा कर्करोग रोखण्यात मदत होते. किडनीसंदर्भातील समस्याही जायपत्रीच्या सेवनाने रोखता येतात. मुळात जायपत्रीमुळे पचनसंदर्भातील समस्या दूर होतात. त्यामुळेच किडनीचे आरोग्य चांगले रहाण्यास मदत होते. सर्दी आणि ताप असेल तर अनेकवेळा जायफळाचा लेप लावला जातो. त्याचप्रमाणे जायपत्रीही फायदेशीर ठरते. याच्या सेवनामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे अनेक भारतीय घरात जायफळ (Nutmeg) आणि जायपत्री लहान मुलांना बालगुटीच्या रुपात देतात. अॅसिडीटी, भूक कमी होणे अशावेळीही ही जायपत्री उपयोगी ठरु शकते. पुलाव आणि बिर्याणी सारख्या पदार्थात तिखटाचे प्रमाण जास्त असते. या मसाल्याचा पोटाला त्रास होऊ नये म्हणून जायपत्रीचा वापर त्यात करण्यात येतो. मसालेदार पदार्थांमध्ये जायपत्रीचा वापर केल्यास त्यामुळे पोटात जळजळ होत नाही. वाढत्या वयानुसार हाडे कमकवूत होण्याचा त्रासही अनेकांना जाणवतो.
=======
हे देखील वाचा : वेळेआधीच आलेल्या मेनोपॉजमुळे महिलांच्या शारिरीक-मानसिक आरोग्याला धोका
=======
यातही जायपत्री फायदेशीर ठरते. संधिवातासारख्या त्रासातही ही जायपत्री मोठी गुणकारी असते. मुख्य म्हणजे लठ्ठपणाच्या समस्येमध्ये जायपत्रीचा वापर फायदेशीर होतो. झोप जर कमी येत असेल तर त्यातही जायपत्रीचा वापर करण्यात येतो. हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजारांमध्येही जायपत्री उपयोगी ठरते. आपल्या आहारात नियमीत या जायपत्रीचा वापर केल्यास अनेक रोगांवर अटकाव होऊ शकतो. मात्र अनेक घरात जसा जायफळाचा वापर करण्यात येतो, तसे महत्त्व जायपत्रीला देण्यात येत नाही. मात्र ही जायपत्री अनेक रोगांवर अटकाव करणारी आहे.
सई बने