रणवीर सिंग (Ranveer Singh) हा बॉलिवूडचा फॅशन आयकॉन आहे. तो कधी कुठले कपडे घालेल याचा भरवसा नसतो. कधी नाईट सूटसारख्या ड्रेसमध्ये एखाद्या कार्यक्रमात पोहचतो, तर कधी बायको दिपीकाच्या कपड्यांसारखाच सूट घालतो. पिवळा, गर्द जांभळा, लाल भडक असे त्याच्या कपड्यांचे रंगही भन्नाट असतात.
आपल्या फॅशनमुळे रणवीर कायम ट्रोल होत असला तरी त्याच्या चाहत्यांना विक्षिप्त लूकमधला रणवीरच अधिक भावल्याचं स्पष्ट झालंय. हे बघून की काय, रणवीर सिंगनं चक्क न्युड फोटो शूट करुन बॉलिवूडमध्ये धम्माल उडवून दिली आहे. (Nude photoshoot of Ranveer Singh)
रणवीनरने एका मॅगझिनसाठी केलेल्या या न्यूड फोटो शुटमुळे एकच खळबळ उडाली असून तो सोशल मिडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. रणवीर सिंग आणि अतरंगी फॅशन नेहमी सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतो. अगदी एअरपोर्टवरचा फोटो असो वा एखादी मोठी फिल्मी पार्टी, रणवीरच्या कपड्यांची अनेकदा खिल्ली उडवली जाते. पण या त्यांच्या हटके फॅशन सेन्समुळे सर्व मिडिया मात्र त्याच्या मागे मागे असतो. सर्व कॅमेरांचा त्याच्यावरच रोख असतो.

रणवीरला हा प्रसिद्धीचा मार्ग चांगलाच माहित आहे. त्यामुळेच त्याला कितीही ट्रोल केलं तरी तो आपल्याच धुंदीत आणि मस्तीत असतो. आता रणवीरनं या त्याच्या सर्व फॅशनवर एक मोठं पाऊल टाकत त्यानं चक्क ऩ्यूड फोटो शूट केलं आहे. एका मॅगझिनसाठी रणवीरनं हे शूट केलंय. बरं नुसतं फोटो शूट करुन शांत राहिल तर तो रणवीर कसला. त्यानं आपले हे सगळे न्यूड फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले. त्यामुळे आता सर्व सोशल मिडियावर रणवीरच्या या फोटोंना अधिक शेअर केलं जातंय आणि त्यासोबत अनेक मिम्सही व्हायरल झाले आहेत. (Nude photoshoot of Ranveer Singh)
या फोटोमध्ये रणवीर एका टर्किश कार्पेटवर वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देत आहे. काही फोटोंमध्ये तो पडून आहे तर काही फोटोंमध्ये तो उभा आहे. रणवीरच्या फोटोची पोज प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक बर्ट रेनॉल्ड्स यांच्यापासून प्रेरित असल्याचे सांगण्यात आलंय.
बर्ट रेनॉल्ड्स हे हॉलिवूडचे सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून त्यांची ओळख आहे. 1958-2018 या काळात बर्ट यांनी हॉलिवूडमध्ये राज्य केलं. बर्ट यांचा चाहतावर्ग मोठा असला तरी त्यात सर्वात जास्त संख्या महिलांचीच होती. त्यांनी केलेले न्यूड फोटो शूटही गाजले होते.

आता त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत रणवीर सिंगने बर्ट यांनी ज्या मॅगझिनसाठी फोटो शूट केले होते. त्याच मॅगझिनसाठी न्यूड फोटो शूट केले आहे. या फोटो शूटसोबत रणवीरची मुलाखतही आहे. यात त्याने त्याच्या चित्रपट आणि फॅशनबद्दलचे अनुभव सांगितले आहेत. (Nude photoshoot of Ranveer Singh)
न्यूड फोटो शूटबाबत त्यांनं त्याच्या स्वभावाप्रमाणे बिनधास्त वक्तव्य केली आहेत. रणवीर म्हणतो, “शारीरिकरित्या नग्न राहणे माझ्यासाठी खूप सोपे आहे. माझ्या काही परफॉर्मन्समध्ये मी नग्न झालो आहे. तुम्ही माझा आत्मा पाहू शकता. तो किती नग्न आहे? मी हजार लोकांसमोर नग्न होऊ शकतो. मला काही फरक पडत नाही. पण ते बघणारे मात्र अस्वस्थ होतात इतकेच.”
====
हे देखील वाचा – फिटनेससाठी ‘महागड्या जिम’ची गरज नाही; जाणून घ्या हेमांगी कवीचा ‘फिटनेस फंडा’
====
2010 मध्ये आलेल्या ‘बँड बाजा बारात’ चित्रपटातून रणवीरनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. चित्रपटांपेक्षा तो फॅशनमुळेच जास्त चर्चेत राहिला आहे. राम लीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत हे त्याच्या नावावर असलेले हिट चित्रपट. अलिकडेच प्रदर्शित झालेला ‘जयेशभाई जोरदार’ हा त्याचा चित्रपट जोरदारच आपटला आहे. त्याआधी प्रदर्शित झालेला ‘83’ हा चित्रपटही बॉक्सऑफीसवर म्हणावं तेवढा यशस्वी ठरला नाही. त्यामुळेच कंगाल झालेल्या रणवीरला आता न्यूड फोटो शूटचा आधार घ्यावा लागल्याचा आरोप सोशल मिडियावरुन करण्यात येत आहे. एकापोठोपाठ एक फ्लॉप चित्रपट येत असल्यामुळे रणवीरनं हा चिप फंडा ट्राय केलं अशा अर्थाचे मिम्स सोशल मिडियावर येत आहेत.
काहींनी या न्यूड फोटो शूटची आणि मिलिंद सोमणनं केलेल्या फोटो शूटची तुलना केली आहे. मिलिंद सोमण आणि मधु सप्रे यांनी न्यूड फोटो शूट करताना निदान अजगराला तरी घेतलं होतं….पण रणवीरनं कसलाही अडसर ठेवला नसून त्याचं कौतुकच करायला हवं, अशी उपाहासात्मक टिकाही त्याच्यावर होतेय. (Nude photoshoot of Ranveer Singh)
रणवीरनं अद्यापही यावर आपलं मत दिलं नसलं तरी त्याच्या आगामी चित्रपटांसाठी हे न्यूड फोटो शूट सहाय्यक ठरु शकतं, असंही मत काहींनी व्यक्त केलं आहे. रणवीर लवकरच सर्कस, रॉकी और राणी अशा दोन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. सर्कसचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले असून, यात रणवीरसोबत जॅकलीन फर्नांडिस आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहेत. त्याचवेळी तो रॉकी और राणी या प्रेमपटातही आहे. यामध्ये त्याच्यासोबत धर्मेंद्र, आलिया भट्ट, जया बच्चन आणि शबाना आझमी, इ कलाकार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहर करत आहेत. 11 फेब्रुवारी 2023 रोजी रॉकी और राणी प्रदर्शित होत आहे. (Nude photoshoot of Ranveer Singh)
अर्थात ही सुरुवात आहे. आता कुठे बी टाऊनमध्ये या न्यूड फोटो शूटची चर्चा सुरु झालेय. याआधी अभिनेता राहुल खन्ना यांनीही असेच न्यूड फोटो शूट करत खळबळ उडवून दिली होती. वर्षापूर्वी मिलिंद सोमण यांनी गोव्यातील एका बीचवर न्यूड पोजमध्ये धावतानाचा फोटो शेअर केला होता….तेव्हाही खूप गोंधळ उडाला होता. आता रणवीरच्या या बिनधास्त अदांना कसा प्रतिसाद मिळतोय, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
– सई बने