अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचे नाव घेऊन सनसनाटी बातमी देण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानची वकिली करण्याच्या नादात ट्रम्प यांनी जगाला धमकीही दिली आहे. एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये ट्रम्प यांनी अणुचाचण्या करण्याची गरज का आहे, हे सांगतांना पाकिस्तानचे नाव घेतले. रशिया, चीन आणि उत्तर कोरियासह पाकिस्तान सारखा देशही अणुचाचण्या घेत आहे. अशात अमेरिकेने या चाचण्या का करु नयेत, असा प्रश्न विचारत त्यांनी अमेरिकेकडे १५० वेळा जग नष्ट करण्यासाठी पुरेशी अण्वस्त्रे आहेत, आणि आता आम्ही नव्यानं अण्वस्त्र चाचणी कऱण्यासाठीही सज्ज आहोत अशी धमकी दिली आहे. जवळपास ३३ वर्षांनंतर अमेरिकेत पुन्हा अणुचाचण्या सुरू करण्यात येणार आहेत. या ट्रम्प यांच्या घोषणेनं खळबळ उडाली होती. याबाबत आपली भूमिका स्पष्ट करतांना ट्रम्प यांनी अधिक खळबळजनक दावे केले आहेत. (America)

मुळात हे दावे करतांना त्यांनी पुन्हा पाकिस्तानची वकिली केली आहे. पाकिस्तानमध्ये गेल्या महिन्याभरात सतत भूकंपाचे धक्के बसले, हे कदाचित अणुचाचणीचे लक्षण आहे, असेही ट्रम्प यांनी सूचित केले. पाकिस्तानचे सरकार सध्या ट्रम्प यांच्या सल्यानुसार चालत आहे. ट्रम्पही त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत. भारतासोबत चालू असलेल्या चर्चेत पाकिस्तान अणुचाचणी करत आहे, ही धमकी देत ट्रम्प यांनी भारतावर अप्रत्यक्षपणे दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. त्यातच अमेरिकेमध्ये सध्या शटडाऊनमुळे लाखो सरकारी कर्मचारी पगारावाचून काम कऱण्यास मजबूर झाले आहेत. मोफत धान्य योजना बंद आहे, यामुळे जनतेमध्ये प्रचंड रोष वाढत आहे. या सर्वांवरुन लक्ष दूर कऱण्यासाठी ट्रम्प अशी विधाने करत असल्याचीही चर्चा आहे. एकुण जगाची काळजी करणा-या अमेरिकेतच ट्रम्प यांच्यामुळे असंतोष वाढत असून त्याचा कधीही स्फोट होण्याची शक्यता आहे. (International News)
शटडाऊनमुळे अमेरिकेत वाढत असलेल्या असंतोषाला अधिक वाढवण्याचे काम ट्रम्प यांच्या दोन निर्णयांनी केले आहे. त्यांनी व्हाईट हाऊसचे नुतनीकरण सुरु केले असून त्यासाठी अब्जो रुपयांचे बजेट मंजूर केले आहे. त्यातच अमेरिकेमध्ये ३३ वर्षानंतर पुन्हा अणुचाचण्या करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या घोषणेमुळे खळबळ उडाली. यासंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांची एक जाहीर मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देश अण्वस्त्र चाचणी करत असतांना अमेरिकेनं का मागे रहावं, हा प्रश्न उपस्थित केला. हे सांगतांना त्यांनी भारताचा शेजारी, पाकिस्तानचे नाव घेत, पाकिस्तानमध्येही अण्वस्त्र चाचणी होत असल्याचा दावा केला. त्यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. (America)

कारण गेल्या महिन्यात पाकिस्तानमध्ये भूकंपाची एक मालिकाच झाली. हे भूकंप नैसर्गिक नव्हते, तर त्यामागे पाकिस्तान करत असलेल्या अण्वस्त्र चाचण्या कारणीभूत असल्याचे ट्रम्प यांनी सूचित केले आहे. पाकिस्तानबाबत हा दावा करतांना ट्रम्प यांनी रशिया, चीन, उत्तर कोरिया या देशांचीही नावे घेतली. या देशात उघडपणे अणुचाचण्या होत नाहीत. हे देश भूमिगत चाचण्या करतात, त्याची फार कमी प्रमाणात कंपने जाणवतात. पण अमेरिकेचे तसे नाही. अमेरिका जाहीरपणे अणुचाचणी करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. ट्रम्प यांनी या मुलाखतीमध्ये ३३ वर्षांच्या अणुचाचणी स्थगितीच्या समाप्तीचा बचाव केला. यासंदर्भात तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे जागतिक अण्वस्त्र संतुलनावर गंभीर परिणाम होऊन नवीन शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू होणार आहे. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी भारत वगळता जवळजवळ सर्व अण्वस्त्रधारी देशांची नाव घेतली. त्यांनी पाकिस्तानचे नाव घेतल्यामुळे ट्रम्प पुन्हा भारतावर दबाव निर्माण करु पहात आहेत का, हा प्रश्न विचारला जात आहे. (International News)
================
हे देखील वाचा : Sudan : म्हणून होतेय, दुबईवर बहिष्कार घालण्याची मागणी !
================
भारतासोबतच्या युद्धानंतर पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र कार्यक्रम १९७१ साली सुरु झाला. तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्या नेतृत्वाखाली त्याचा पाया रचला गेला. १९८० आणि १९९० च्या दशकात पाकिस्तानमध्ये गुप्त अणुचाचण्या करण्यात आल्या. मात्र या सर्वात भारतावर अमेरिकेचा प्रचंड दबाव होता. भारतानं अणुचाचण्या करु नयेत, यासाठी अमेरिकेच्या सीआय़ए या गुप्तचर संघटनेनं मोठा दबाव आणला होता. या सर्वांवर मात करत अटलबिहारी वाजपेयी सरकारनं पोखरणमध्ये अणुचाचणी केली. भारताच्या या पोखरण-२ चाचण्यांनंतर काही दिवसांनी २८ मे १९९८ रोजी पाकिस्तानने बलुचिस्तानमधील चगाई येथे पहिली सार्वजनिक अण्वस्त्र चाचणी केली. मात्र पाकिस्तानने अमेरिकेच्या मदतीनं याआधीही अनेक गुप्त सब-क्रिटिकल चाचण्या केल्याची माहिती आहे. (America)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
