Home » Japan : संभाव्य अणुहल्ल्यापासून वाचण्यासाठी !

Japan : संभाव्य अणुहल्ल्यापासून वाचण्यासाठी !

by Team Gajawaja
0 comment
Japan
Share

6 ऑगस्ट 1945 आणि 9 ऑगस्ट 1945 हे दोन दिवस जपान कधीही विसरणार नाही. याच दोन दिवसात अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकला. यात हिरोशिमा आणि नागासाकीच्या अणुबॉम्बस्फोटात अंदाजे 1,40,000 नागरिक मृत्युमुखी पडले आणि याहून अधिक नागरिक जखमी झाले आणि त्याहून अधिक नागरिकांना आजन्म या अणुबॉम्बच्या खुणा झेलाव्या लागल्या. आज 80 वर्षानंतरही जपानचे नागरिक या अणुबॉम्बच्या हल्ल्याच्या दाहक आठवणीतून बाहेर पडलेले नाहीत. (Japan)

त्यामुळेच अशा प्रकारचा हल्ला पुन्हा एकदा झाला तर जपानला वाचवण्यासाठी अवघा देश एका गुप्त योजनेवर काम करीत होता. जपान सरकारनं नुकतीच ही गुप्त योजना जाहीर केली. ही योजना म्हणजे, अवघ्या जपानमध्ये भूमिगत बंकर करण्यात येत आहेत. जगभर असलेली अस्थिरता, युद्धजन्य परिस्थिती यामुळे जपान सरकारनं हा निर्णय घेतला आहे. त्यातून अलिकडच्या काळात उत्तर कोरियाने जपानला युद्धाची धमकी दिली आहे. जपानने केलेल्या अण्वस्त्रे आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचणीवरून उत्तर कोरियाने ही धमकी दिली आहे. त्यामुळे आपल्या नागरिकांचे रक्षण करणे ही आपली मुख्य गरज आहे, हे सांगत जपान सरकारनं मोठ्याप्रमाणात भूमिकत बंकर बनवण्यास सुरुवात केली आहे. काही वर्ष गुप्त असलेली ही योजना जाहीर करत आता जपान सरकारनं जगातील प्रत्येक देशाला आता अशाच प्रकारच्या बंकरची गरज असल्याचे सांगितले आहे. (International News)

जपान सरकारनं देशात बांधलेल्या बंकरचे फोटो सार्वजनिक करत आपल्या देशातील नागरिकांच्या संरक्षणासाठी सदैव तयार असल्याचे जाहीर केले आहे. 80 वर्षापूर्वी अणुबॉम्बच्या हल्ल्याचे भयाण वास्तव झेललेल्या या देशानं हा निर्णय, सध्याची युद्धजन्य परिस्थिती पाहून घेतला आहे. अणु युद्धादरम्यान भूमीगत बंकर हे नागरिकांसाठी सुरक्षित मानले जातात. अणुयुद्धादरम्यान जे रेडिएशन निर्माण होते, त्यापासून संरक्षण करण्यासाठी हे बंकर डिझाइन केलेले आहेत. बंकरमध्ये पाणी, वीज आणि हवा पुरवठ्याची व्यवस्था आहे. जेणेकरून आत राहणारे नागरिक दीर्घकाळ सुरक्षित रहाणार आहेत. जपाननं घेतलेल्या या निर्णयाचा खुलासा झाल्यावर आशियायी देशांमधील युद्धजन्य परिस्थिती किती गंभीर झाली आहे, याचीही चर्चा सुरु झाली. चीन आणि उत्तर कोरियाच्या वाढत्या लष्करी सामर्थ्यामुळे जपाननं हे पाऊल उचललं आहे. संरक्षणतज्ञांच्या मते जपानचे हे पाऊल म्हणजे, जग अणुहल्ल्याच्या अधिक जवळ आल्याचे लक्षण आहे. (Japan)

तिस-या महायुद्धाची ठिणगी कधीही पडणार असून या युद्धाचा शेवट हा अणुहल्ल्यानं होणार आहे. यात किती मनुष्यहानी होईल, याची गणतीही करता येणार नाही. अशा परिस्थितीत जपान सारखे भूमिगत बंकर बांधणे ही सर्वच देशांची गरज असल्याचे मतही व्यक्त होत आहे. जपानमध्ये एप्रिल 2024 पर्यंत, भूमिगत 4.91 लाख चौरस मीटर क्षेत्रावर बंकर बांधण्यात आले आहेत. पुढच्या वर्षात आणखी 4 लाख चौरस मीटर अतिरिक्त क्षेत्रावर बंकर बांधण्यात येणार आहेत. जपाननं 2026 पर्यंत देशातील सर्व नागरिकांसाठी सुरक्षित बंकर निर्मिती हे ध्येय ठेवले आहे. याशिवाय आधी असलेले बंकर अधिक मजबूत आणि त्यात अधिक काळ राहण्यासाठी योग्य वातावरणाची निर्मिती करण्यावर जोर देण्यात येत आहे. जपाननं घेतलेल्या या महत्त्वाच्या निर्णयानं जगभरातील देशांनाही भूमीगत बंकर बाबत विचार करायला भाग पाडले आहे. सध्या जगभरातील निवडक देशांमध्ये भूमीगत बंकर सुविधा उपलब्ध आहे. फिनलंडने त्यांच्या 86% लोकसंख्येसाठी सुरक्षित बंकर उभारले आहेत. तिथे रासायनिक हल्ल्यांपासून संरक्षणासाठी प्रणाली आहे. (International News)

================

हे देखील वाचा : Liver Cancer : लिव्हर कॅन्सरची माहिती, लक्षणं आणि कारणं

Panchkula Tragedy News : एकाच गाडीत ७ मृतदेह..

================

कोरियामध्ये तर बंकरची क्षमता त्यांच्या लोकसंख्येपेक्षा तिप्पट आहे. अल्बेनियामध्येही बंकरची संख्या अधिक आहे. शीतयुद्धाच्या काळात, कम्युनिस्ट नेते एन्व्हर होक्सा यांनी परकीय आक्रमणाच्या धोक्यापासून देशाचे संरक्षण करण्यासाठी हे सुरक्षित बंकर उभारले आहेत. बंकर निर्मितीच्या बाबतीत स्वित्झर्लंड हा एक प्रमुख देश आहे. या देशात जवळजवळ प्रत्येक घरात बंकर आहेत. शीतयुद्धानंतर स्वित्झर्लंड हा एकमात्र युरोपीय देश होता ज्याने कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बंकर बांधले. इस्रायलमध्येही भूमीगत बंकरचे प्रमाण अधिक आहे. या सर्वात भारतात किती बंकर आहेत,याचीही चाचणी होत आहे. सध्या भारताच्या सीमालगत गावांमध्ये बंकर बनवण्यात येतात. मात्र जपानच्या धर्तीवर भारतातही भूमीगत बंकर होण्याची गरज असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. (Japan)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.