Home » पारसी नवं वर्षाचा पहिला दिवस नवरोज, जाणून घ्या अधिक

पारसी नवं वर्षाचा पहिला दिवस नवरोज, जाणून घ्या अधिक

by Team Gajawaja
0 comment
Nowruz 2023
Share

जगभरात जेवढे धर्म अथवा जाती आहे त्यांच्यामध्ये नवं वर्ष साजरी करण्याची आपली आपली मान्यता आहे. अशातच पारसी धर्मात नवं वर्षाची परंपरा वसंत ऋतुपासून होते. आजपासून पारसी नवं वर्ष नवरोज सुरु झाले आहे. नवरोज पारसी कॅलेंडरचा पहिला दिवस आहे. नवरोजचा अर्थ आहे की नवा दिन. पारसी धर्मातील लोक हा दिवस आपल्या पारंपारिक पद्धतीने साजरा करतात. जाणून घेऊयात नवरोज संदर्भातील काही खास गोष्टी. (Nowruz 2023)

पारसी धर्मात नवं वर्ष वसंत ऋतूच्या आगमानाच्या आनंदात साजरे केले जाते. वसंत ऋतूची सुरुवात मार्च महिन्याच्या मध्यापासून सुरुवात होते. यावेळी नवरोज २१ मार्च पासून सुरु होणार आहे. हे ईराणी कॅलेंडरचा पहिल्या महिन्याचा (फारवर्दिन) पहिला दिवस सुद्धा आहे. पारसी धर्मात ३ हजार वर्षांपूर्वी वसंतात आलेल्या नव्या वर्षाचे स्वागत करत नवरोज साजरा करण्याची परंपरा आहे.

नवरोज उत्सवादरम्यान मोठ्या संख्येने लोक एकमेकांच्या घरी जातात. तसेच एकमेकांना गिफ्ट ही दिले जातात. यादरम्यान कोणत्याही हिरव्यागार मैदान अथवा बागेत सहभोज करण्याची जुनी परंपरा आहे. यावेळी परंपरागत जेवण बनवले जाते. या दिवसाचा आनंद पारसी लोकांकडून घेतला जातो. पारसी लोक आपल्या खाद्यपदार्थात धंसक, गोड शेव दही, बेरी पुलाव आणि अन्य काही गोष्टींचा समावेश करतात. पारसी लोक आपल्या देवतांची पूजा सुद्धा यावेळी करतात. ते आपल्या राजाची आठवण करतात.

नवरोजच्या वेळी पारसी धर्मातील लोक आपले पारंपारिक कपडे परिधान करतात. महिला पारंपारिक गारा साडी नेसतात आणि पुरुष एक लांब मलमलचे शर्ट, ज्याला शुद्र आणि कुस्ती अशा नावाने सुद्धा ओळखळे जाते.

भारतात नवरोजची सुरुवात कोणी केली?
दिल्ली सल्तनतचे सुल्तान बलबन यांनी आपले धन आणि शक्तीच्या माध्यमातून आपल्या मंत्र्यांना, स्वयंपाक घरातील लोक आणि राज्यातील लोकांना प्रभावित करण्यासाठी भारतात प्रसिद्ध फारसी सण नवरोजची सुरुवात केली होती. मुळत: हा सण वसंत विषुवच्या नव्या वर्षाच्या आगमानाचा उत्सव आहे. असे म्हटले जाते की, बलबन यांच्या शासनकाळात लोक त्यांच्या पद्धतीवर अधिक खुश नव्हते. त्यामुळे त्यांनी आपल्या राज्य क्षेत्रात कायद्याच्या स्थितीवरुन लोकांचे लक्ष हटवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी फारसी नवं वर्ष उत्सवाची सुरुवात केली, ज्याबद्दल काबी पुस्तक अथवा ग्रंथांमध्ये नॉरुज उत्सवाच्या नावाने ओळखले जाते.(Nowruz 2023)

हे देखील वाचा- वर्ल्ड हॅप्पीनेस डे का साजरा केला जातो?

नवरोजला काही नावांनी ओळखले जाते. नवरोज हा एक फारसी भाषेतील शब्द आहे. जो नव आणि रोजपासून मिळवला आहे. नवरोज शब्दात नवचा अर्थ नवे आणि रोजचा अर्थ दिवस. त्यामुळे नवरोजचा सण एका नव्या दिवसाच्या प्रतीकाच्या रुपात उत्सावाप्रमाणे साजरे केले जाते. ईरान देशात नवरोजला ऐदे नवरोज असे म्हटले जाते. पारसी न्यू ईअरला नवरोज, जमशेदी नवरोज, पतेती आणि खोरदाद वर्षाच्या नावाने ही ओळखले जाते. दरम्यान या सणाचा दोनदा उत्साह साजरा केला जातो.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.