Home » आता पेंटागॉनवर भारतीयांचे वर्चस्व राहणार…

आता पेंटागॉनवर भारतीयांचे वर्चस्व राहणार…

by Team Gajawaja
0 comment
Pentagon
Share

युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सच्या मुख्यालयाची  इमारत म्हणजे पेंटागॉन (Pentagon). अमेरिकेची सर्व सुरक्षा प्रणाली याच इमारतीमधून कार्यरत असते. अत्यंत अभेद्य असलेल्या या सुरक्षा प्रणालीवर, 11 सप्टेंबर 2001 मध्ये हल्ला झाला होता. त्यानंतर पेंटागॉनच्या भव्य इमारतीमध्ये आणखी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. जगभरातली सर्वात मोठी सुरक्षा खात्याची वास्तू म्हणूनही पेंटागॉनची ओळख आहे. आता याच पेंटागॉनवर (Pentagon) एका भारतीयाचे वर्चस्व राहणार आहे.  या भारतीयाचे नाव आहे, रवी चौधरी. अमेरिकन हवाई दलाच्या सहाय्यक संरक्षण सचिवपदी रवी चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चौधरी यांनी यापूर्वीही अमेरिकन लष्करात अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत.

अमेरिकेने भारतीय वंशाचे रवी चौधरी यांची ऊर्जा, आस्थापना आणि पर्यावरणासाठी हवाई दलाचे सहाय्यक सचिव म्हणून नियुक्ती केली आहे.  तमाम भारतीयांसाठी ही गौरवाची गोष्ट आहे. रवी चौधरी यापूर्वी अनेक महत्त्वाच्या पदांवर विराजमान होते. यापूर्वी चौधरी यांनी अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्टेशनमध्ये वरिष्ठ कार्यकारी म्हणून काम केले आहे. अमेरिकेतील सरकारमध्ये अनेक भारतीय मानाच्या जागेवर आहेत. आता त्यात रवी चौधरी यांचाही समावेश झाला आहे. युनायटेड स्टेट्स  सिनेटने भारतीय-अमेरिकन रवी चौधरी यांची हवाई दलाच्या सहाय्यक संरक्षण सचिवपदी नियुक्ती केल्याची माहिती दिली आहे. हे पद अमेरिकेत आणि जागतिक स्तरावरही अत्यंत मानाचे आणि अधिकाराचे आहे. पेंटागॉनमधील (Pentagon) सर्वोच्च नागरी नेतृत्व पदांपैकी एक पद असून त्यावर आता रवी चौधरी आपल्या कतृत्वानं विराजमान झाले आहेत. अमेरिकेतील वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार विरोधी रिपब्लिकन पक्षाच्या डझनाहून अधिक मतांसह सिनेटने या हवाई दल अधिकाऱ्याच्या नावाला पसंती दिली. यासाठी 65-29 असे मतं चौधरी यांच्याकडे आली. चौधरी यांनी यापूर्वी अमेरिकेच्या परिवहन विभागामध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून काम केले आहे. तिथे ते फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन मधील आधुनिक कार्यक्रम आणि नवीन उपक्रम विभागाचे संचालक होते. परिवहन विभागात असतांना, चौधरी यांनी प्रदेश आणि केंद्र संचालनाचे कार्यकारी संचालक म्हणूनही काम केले. 1993 ते 2015 या कालावधीत अमेरिकन एअरफोर्समधील  सेवेदरम्यान चौधरी यांनी अनेक कठिण कामगिरी फक्ते केल्या आहेत. अफगाणिस्तान आणि इराकमधील अनेक लढाऊ मोहिमांसह C-17 पायलट म्हणून जागतिक फ्लाइट ऑपरेशन केले आहे. उड्डाण चाचणी अभियंता म्हणून काम करतांना अनेक नव्या उपाययोजना करुन आपला विभाग अधिक आधुनिक करण्यावर चौधरी यांनी भर दिला आहे. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम साठी स्पेस लॉन्च ऑपरेशन्ससाठी देखील काम केले आहे. प्रणाली अभियंता म्हणून, चौधरी यांनी नासा अंतराळवीरांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी नासा च्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सुरक्षा क्रियाकलापांसाठीही काम केले आहे. बराक ओबामा यांच्या कार्यकाळात त्यांनी अमेरिकन आणि पॅसिफिक बेटवासियांवरील अध्यक्षांच्या सल्लागार आयोगाचे सदस्य म्हणूनही काम केले आहे.

रवी चौधरी हे उच्चविद्याविभुषीत आहेत. जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीच्या डीएलएस प्रोग्राममधून त्यांनी डॉक्टरेट केली आहे. सेंट मेरी विद्यापीठातून औद्योगिक अभियांत्रिकीमध्ये त्यांनी एम. एस. ही पदवी घेतली आहे. याशिवाय चौधरी यांनी हवाई विद्यापीठातून ऑपरेशनल आर्ट्स आणि मिलिटरी सायन्समध्ये एमए केले आहे. यासोबतच त्यांनी यूएस एअर फोर्स अकादमीमधून एरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये बीएस केले. रवी चौधरी फेडरल एक्झिक्युटिव्ह इन्स्टिट्यूटचे पदवीधरही आहेत.

========

हे देखील वाचा : पॉप सिंगर ते गुन्हेगार… मंत्र्याची हत्या करत शरिराचे केले १८ तुकडे

========

हे रवी चौधरी आता पेंटागॉन (Pentagon) या अमेरिकन सुरक्षा विभागाच्या इमारतीचे प्रमुख असतील. पेंटागॉन ही युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सची मुख्यालय इमारत आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ही इमारत बांधण्यात आली. पेंटागॉन ही जगातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारत आहे,  सुमारे 150 एकर जागेवर पेंटागॉनची उभारणी करण्यात आली आहे. यात  लष्करी आणि नागरी कर्मचारी काम करतात. या इमारतीच्या  पाच बाजू असून जमिनीपासून वरचे पाच मजले, दोन तळघर अशी त्याची व्याप्ती आहे. 11 सप्टेंबर रोजी अमेरिकर झालेल्या सर्वात मोठ्या हल्ल्याची झळ पेंटागॉनलाही (Pentagon) बसली होती. त्यानंतर या इमारतीची दुरस्ती करुन अधिक सुरक्षा प्रणाली कडक करण्यात आली आहे.  जिथे हल्ला झाला  त्या ठिकाणी एक स्मारक करण्यात आले. पेंटागॉनच्या मध्यभागी असलेल्या या स्मारकात 184 प्रकाशाची किरणे सोडण्यात आली आहेत.  याच भक्कम इमारतीच्या तळघरात परग्रहावरील माणसांचा वावर असल्याच्याही बातम्या येतात. तसेच पेंटागॉन जिथे आहे, तिथे युएफओ बघितल्याचा दावाही काहींनी केला आहे. आता या पेंटागॉनची (Pentagon) रहस्ये आणि अमेरिकेची सुरक्षा बघण्याची जबाबदारी एका भारतीयावर आली आहे.  ही तमाम भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.