Home » आता जैसलमेरची सैर होणार पर्यटकांसाठी आकर्षित

आता जैसलमेरची सैर होणार पर्यटकांसाठी आकर्षित

by Team Gajawaja
0 comment
Jaisalmer attracts tourists
Share

राजस्थानमधील जैसलमेरचे नाव समोर आले की वाळवंट, उंट आणि राजे रजवाड्यांच्या हवेल्या, मोठे किल्ले समोर उभे राहतात.  जैसलमेरमध्ये याच हवेल्या आणि किल्ले बघण्यासाठी वर्षभर पर्यटकांची ये-जा चालू असते. परदेशी पर्यटकही येथे मोठ्याप्रमाणात येतात (Jaisalmer attracts tourists). मात्र याच वाळवंटी भागात काही हजारो वर्षापूर्वी समुद्र होता आणि यात शार्क मासे मोठ्या संख्येनं राहत होते, हे सांगितले तर खरं वाटेल का? यापेक्षा या जैसलमेरमध्ये डायनासोरचीही वस्ती मोठ्या प्रमाणात होती. अगदी उडणारे डायनासोरही येथे राहत होते, हे सांगितलं तरी खरं वाटणार नाही. मात्र जैसलमेरच्या वाळवंटामधून हजारो वर्षापूर्वी दडलेली रहस्य आता समोर येत आहेत. यामुळे आता वाळवंटी असलेला हा भाग हजारो वर्षापूर्वी घनदाट जंगलांनी व्यापलेला होताच शिवाय या भागात अनेक पशूपक्षी मोठ्या संख्येनं राहत होते.  जैसलमेरच्या वाळवंटातून आता याच पशूपक्षांचे आणि समुद्रातील शार्कचे अवशेष सापडत आहेत.  हे अवशेष जतन करण्यासाठी येथे भव्य असे डायनासोर संग्रहालयही उभारण्यात येणार आहे.  त्यामुळे जैसलमेरची सैर करण्यासाठी येणा-या पर्यटकांसाठी डायनासोरचे संग्रहालय आकर्षित करणार आहे. (Jaisalmer attracts tourists)

जैसलमेरच्या वाळवंटातून  250 दशलक्ष वर्षे जुनी रहस्ये समोर येत आहेत. 250 दशलक्ष वर्षांपूर्वी जगातील सर्वात मोठा टेथिस समुद्र जैसलमेर येथे होता हे स्पष्ट झाले आहे.  25  कोटी वर्षांपूर्वी जैसलमेरमध्ये डायनासोर, शार्क, व्हेल, महाकाय मगरी यांसारख्या प्राण्यांचा वावर होता. या भागात शोध घेणा-या तज्ञांनी जैसलमेर शहराचा किल्ला आणि तेथे वसलेले संपूर्ण शहर हे लाखो वर्षांपूर्वी असलेल्या समुद्रकिना-यावर असल्याचे सांगितले आहे.  त्याचा पुरावा म्हणजे या भागात मोठ्या प्रमाणात सागरी प्रवाळ आणि प्रवाळ दगडांचे जीवाश्म सापडले आहेत.  ज्यावरून जैसलमेर शहर हे लाखो वर्षांपूर्वी टेथिस समुद्राचा किनारा असल्याचे स्पष्ट झाले आहे (Jaisalmer attracts tourists). जैसलमेर शहराच्या एका बाजूला हजारो मीटर खोल टेथिस समुद्राचा किनारा होता आणि दुसऱ्या बाजूला डायनासोर राज्य करत होते. येथे घनदाट जंगल असून या जंगलात उंट नव्हे तर विमानांसारखे मोठे डायनासोर उडत होते. कारण याच डायनासोरचे अवशेष आता शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहेत. जैसलमेरमध्ये आता असणा-या वाळूच्या ढिगाऱ्यांऐवजी 30 ते 40 फूट उंच झाडे असलेले घनदाट जंगल होते. जैसलमेरच्या समुद्रात प्रचंड आकाराचे शार्क समुहानं पोहायचे. या शार्कचे जीवाश्म आशियामध्ये फक्त जैसलमेर, जपान आणि थायलंडमध्ये सापडले आहेत. हे जीवाश्म संग्रह करण्याचे काम आता सुरु झाले आहे.  त्यासाठी जीवाश्म थीम पार्कची घोषणा राजस्थान सरकारनं केली असून पर्यटकांना त्यात सर्व आवश्यक ती माहिती देण्यात येणार आहे.(Jaisalmer attracts tourists)  

गेली काही वर्ष शास्त्रज्ञांची एक टीम जैसममेर शहराला लागून असलेल्या 30 किलोमीटर परिसरात शोध घेत आहे. त्या जमिनीखाली संशोधन चालू आहे.  त्यातूनच ही सर्व रहस्य उघड होत आहेत.  एक ज्युरासिक जगच जैसलमेरमध्ये असल्याचे उघड झाले आहे. आज जिथे सोनारचा किल्ला दिसतो,  इथून थोड्या अंतरावर टेथिस समुद्राचा किनारा होता.  यात सागरी शार्कसह अन्य मोठे मासे रहात होते. येथील थैया गावातून डायनासोरचा वावर मोठ्याप्रमाणात होता. अकालच्या बाजूला घनदाट जंगले होती आणि नद्या वाहत होत्या. (Jaisalmer attracts tourists) 

संशोधकांच्या म्हणण्यानुसार जैसलमेरमध्ये चार वेगवेगळ्या साइट्स आहेत. जिथे शास्त्रज्ञांना कधी डायनासोरचे पंजे सापडतात तर कुठे शार्क आणि व्हेल सारख्या माशांचे दात सापडतात. अकाल वुड-फॉसिल पार्क जैसलमेरपासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर आहे जिथे हे पुरावे गोळा करून सध्या ठेवले जात आहेत. जैसलमेरमध्ये ज्युरासिक युगातील डायनासोरच्या दोन प्रजातींचे जीवाश्म सापडले आहेत. त्यांच्यामध्ये एक थेरोपॉड असून हा जमिनीवरचा डायनासोर आहे. तर दुसरा टेरोसॉर प्रकारातला आहे. हा डायनासोर उडण्यात, पोहण्यात आणि रंग बदलण्यात पारंगत होता. थेरोपॉड हे मांसाहारी डायनासोर मानले जातात. थैया गावाच्या टेकड्यांवर थेरोपॉड डायनासोरच्या पावलांचे ठसे सापडले आहेत.  तसेच थेरोपॉड डायनासोर आणि टेरोसॉरच्या हाडांच्या, पंजाच्या खुणा सापडल्या आहेत. याशिवाय  जैसलमेरमध्ये डायनासोरच्या अनेक प्रजातींचेही वास्तव्य होते.  संशोधक त्यांच्या खुणांचा तपास घेत आहेत. 

=========

हे देखील वाचा : कालव्यांचे शहर झाले कोरडे…

=========

थेरोपॉड हे डायनासोर सर्वात भयानक डायनासोर होते.  त्यांची लांबी 12 ते 13 मीटर म्हणजेच 40 फूट असायची, पण 65 दशलक्ष वर्षांपूर्वी ते नामशेष झाले. टेरोसॉर हे डायनासोर उडत असत. त्यांचे पंख अमेरिकन फायटर जेट F-16 सारखे मोठे होते. अनेक टेरोसॉरचे पंख 35 फुटांपर्यंत पसरत असत. त्यांची मान आणि शेपटी लांब होती, जबडे पूर्णपणे दात होते.  टेरोसॉरच्या काही प्रजाती उडण्यात तसेच पोहण्यात पारंगत होत्या. यासोबतच ते पंखांचा रंगही बदलत असत. मजबूत पंजेमुळे ते डोंगरावरही चढायचे, झाडांवरही रहायचे. आता याच सर्व डायनासोरचे अवशेष जैसलमेरमधील वाळवंटात सापडत आहेत. त्याचं हे अवशेष वुड फॉसिल पार्क येथे सुरक्षित ठेवओण्यात येत आहेत. भविष्यात या सर्व भागात अजून मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यातून जैसलमेरच्या वाळवंटाखाली दडलेला हजारो वर्षापूर्वीचा रहस्यमयी इतिहास जाणता येणार आहे.   

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.