Home » नोटिस टू एअर मिशन म्हणजेच काय?

नोटिस टू एअर मिशन म्हणजेच काय?

by Team Gajawaja
0 comment
NOTAM 
Share

NOTAM…. NOTAM….जगावर राज्य करणारा देश म्हणजे अमेरिका…या अमेरिकेत बुधवारी एकच गोंधळ उडाला.  अमेरिकेत बुधवारी पहाटे 7000 हजार उड्डाणे रद्द करण्यात आली. विमानतळावर लाखो प्रवासी अडकून पडले.  देशभरात 7000 विमाने प्रभावित झाली.  या NOTAM मुळे सर्व अमेरिका जमिनीवर आली.  यंत्रणेतील मोठ्या त्रुटीमुळे अमेरिकेतील हजारो प्रवासी विमानतळावर अडकून पडले होते.   नोटिस टू एअर मिशन म्हणजेच NOTAM ही एक प्रकारची सूचना प्रणाली आहे, ज्यामध्ये विमान उड्डाण करण्याबाबतची आवश्यक माहिती समाविष्ट असते.  ही सर्व प्रणालीच ठप्प झाल्यानं अमेरिकेत एकच खळबळ उडाली. त्यासोबत NOTAM  म्हणजे काय याची चर्चा सुरु झाली आहे.  

अमेरिकेत बुधवारी पहाटे 7000 हजार उड्डाणे रद्द करण्यात आली. विमानतळ यंत्रणेतील मोठ्या त्रुटीमुळे देशभरातील हजारो प्रवासी अमेरिकेतील सर्वच विमानतळावर अडकून पडले.  त्याचवेळी यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने, नोटिस टू एअर मिशन म्हणजेच NOTAM विमानाच्या प्रमुख पायलटला देण्यात येणा-या सूचना प्रणालीतील त्रुटीमुळे उड्डाणे रद्द करण्यात आल्याची घोषणा केली.  नोटिस टू एअर मिशन म्हणजे एक सूचना प्रणाली आहे, ज्यामध्ये विमान उड्डाण करण्याशी संबंधित कर्मचार्‍यांसाठी आवश्यक माहिती दिलेली असते.  NOTAMS प्रत्येक पायलटला हवाई क्षेत्रात विमान उडवताना खरी वेळ सांगण्याचे काम करते. या प्रणालीत कोणत्याही असामान्य परिस्थितीबद्दल देखील वैमानिकाला सूचना दिल्या जातात.  NOTAMS प्रणालीमध्ये कोणत्याही प्रकारच्या सुविधा, सेवेची स्थापना, स्थिती किंवा अति महत्त्वाच्या संबंधी माहिती उपलब्ध असते. पायलट जेव्हा विमान उडवतो तेव्हाच ही प्रणालीत कार्यान्वित होते  आणि पायलट आपल्या प्रवासाला सुखकर करतो.  NOTAM प्रणाली ही एक विशिष्ट प्रकारची भाषा असते.  पायलटला ही विशेष प्रकारची भाषा शिकवण्यात येते.  यात अनेक तांत्रिक गोष्टींबद्दल माहिती असते.   NOTAM मध्ये संभाव्य धोके किंवा सुरक्षिततेवर परिणाम करू शकणार्‍या गोष्टी पायलटला शिकवण्यात येतात.  

वैमानिक, हवाई वाहतूक नियंत्रक आणि इतर पायलट व्यावसायिकांद्वारे उड्डाण ऑपरेशनमधील बदलांबद्दल माहिती ठेवण्यासाठी नोटिस टू एअर मिशन NOTAM वापरले जाते.  मात्र जेव्हा नोटीस टू एअर मिशन NOTAM जारी केली जाते, तेव्हा ती नोटीस विमान उड्डानासंबंधी सॉफ्टवेअर, आणि अन्य साधनांवर सामायिकरित्या पाठवली जाते.  अमेरिकेत बुधवारी झालेला हा प्रकार 9/11 च्या हल्ल्यानंतर पहिल्यांदाच झाला.  जगातील सर्वात जास्त हवाई वाहतूक होत असलेल्या अमेरिकेमध्ये  NOTAM या प्रणालीत बिघाड झाल्यानं  1000 उड्डाणे रद्द करावी लागली आणि 6700 हून अधिक उड्डाणे उशीरा झाली.  याचा फटका लाखो प्रवाशांना बसला.  

=====

हे देखील वाचा : देशात घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ, उत्तर प्रदेश सर्वाधिक पुढे

=====

अमेरिकेत 9/11 नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात उड्डाणांना उशीर होण्याची ही पहिलीच वेळ आहे.  NOTM प्रणालीमधील समस्येमुळे पायलट आणि ग्राउंड स्टाफ यांचा एकमेकांबरोबर असणारा संपर्क तुटला.   त्यामुळे विमानाच्या लॅंडींग आणि टेकऑफला धोका होण्याची शक्यता निर्माण झाली.  आता अमेरिकेतील विमान सेवा पूर्ववत होत असून किमान दोन दिवस तरी या बिघाडाबाबत झालेला गोंधळ निस्तारण्यासाठी लागणार आहे.  सध्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकन सरकारची वाहतूक एजन्सी आहे विमान सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत आहे.  दरम्यान NOTAM प्रणाली ठप्प झाल्यानं प्रथम सायबर हल्ला झाल्याची चर्चा सुरु झाली.  याबाबतही अमेरिकेतील गुप्तचर संघटना तपास करीत आहेत.   जागतिक शक्ती म्हणून ज्या अमेरिकेचा उल्लेख केला जातो, त्या अमेरिकेतला बुधवार खास ठरला. या दिवशी सर्व अमेरिका जमिनीवर होती.  

सई बने…


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.