Home » फक्त सफरचंदच नाही तर त्याचा रसही आरोग्यदायी…

फक्त सफरचंदच नाही तर त्याचा रसही आरोग्यदायी…

by Team Gajawaja
0 comment
Healthy Apple
Share

सर्वच फळं ही आरोग्यदायी आहेत. मात्र या सर्वात सफरचंदाचा वरचा नंबर लागतो.  त्यामुळेच एक सफरचंद (Healthy Apple) रोज खा आणि डॉक्टरांना दूर ठेवा असे सांगितले जाते.  पण फक्त सफरचंदच नाही तर सफरचंदापासून तयार केलेला रसही तेवढाच उपयोगी असल्याचे आता एका संशोधनात निष्पन्न झाले झाले.  सफरचंद (Healthy Apple) हे फळ पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. यामध्ये प्रथिने, फायबर, लोह यांचे प्रमाण मुबलक आहे.  सफरचंदाच्या नियमीत सेवनानं फायदे होतातच पण त्याचा रसही रोज घेतल्यास फायदेशीर ठरु शकते.  पोटावरील चरबी कमी करण्यासाठी या सफरचंदाच्या रसाचा उपयोग होतो.  अलीकडेच यासंदर्भात केलेले संशोधन जर्नल ऑफ ओलिओ सायन्समध्ये प्रकाशीत झाले आहे. त्यात हा सफरचंदाचा रस चरबी घटवण्यासाठी सर्वोत्तम उपाय असल्याचे सांगण्यात आले आहे.  

काश्मिरचे फळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सफरचंदाला (Healthy Apple) आहारात मानाचे स्थान आहे.  ‘रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांना दूर ठेवा’,  हे कायम सांगितलं जातं. तथापि, सफरचंद जितके फायदेशीर आहे तितकाच फायदेशीर सफरचंदाचा रस देखील आहे. ज्यांना आपल्या शरीरातील चरबी कमी करायची आहे, त्यांच्यासाठी हा सफरचंदाचा रस वरदान ठरणार आहे. ज्यांच्या पोटाची चरबी वाढत आहे, अशा लोकांसाठी सफरचंदाचा रस फायदेशीर ठरतो. अनेक जण पोटाची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम करतात. डायट पाळतात.  मात्र त्यांना अपेक्षित असे परिणाम मिळत नाहीत.अशांसाठी हा सफरचंदाचा रस फायदेशीर ठरणार आहे. अलीकडेच जर्नल ऑफ ओलिओ सायन्समध्ये यासंदर्भात केलेले संशोधन प्रकाशित झाले आहे. त्यात सफरचंदाच्या रसाबाबत माहिती देण्यात आली आहे. सफरचंदाचा रस नियमीत घेतल्यास काही आठवड्यांतच  पोटावरील चरबी मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो. संशोधकांनी सफरचंदांपासून (Healthy Apple) पॉलिफेनॉलच्या दीर्घकालीन वापराच्या परिणामाची तपासणी करण्यासाठी काही जणांवर सफरचंदाच्या रसाचा प्रयोग केला, त्यातूनच हे अनुमान काढण्यात आले.  एकूण 124 नागरिकांवर हा प्रयोग करण्यात आला. त्यांना दोन गटांमध्ये विभागले गेले.  दररोज, एका गटाला सफरचंदाचा (Healthy Apple) रस सुमारे 340 ग्रॅम देण्यात आला.  त्यात पॉलीफेनॉलचा समावेश होता.  दुसऱ्या गटाने पॉलिफेनॉल नसलेले अन्य पेय घेतले. 12 आठवड्यांनंतर, ज्या गटाने सफरचंदाचा रस घेतला होता त्या गटाचा व्हिसेरल फॅट एरिया,  थोडक्यात चरबीमध्ये लक्षणीय घट दिसली.  पॉलीफेनॉल हे विविध फळे आणि भाज्यांमध्ये आढळते.  सफरचंदामध्ये (Healthy Apple)त्याचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. सफरचंद केवळ शरीर निरोगी ठेवत नाही तर पोटाची चरबी देखील कमी करते,  हेच त्यातून स्पष्ट झाले आहे. फक्त शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठीच नाही तर शरीरातील अन्य व्याधींवरही सफरचंदाचा वापर औषधासारखा होतो.  

मात्र सफरचंद किंवा त्याचा रस कधी घ्यावा याबाबतही काळजी घ्यावी लागते.  रिकाम्या पोटी सफरचंद खाण्याचे अनेक फायदे असले तरी काही तोटेही आहेत.  रिकाम्या पोटी सफरचंद (Healthy Apple) किंवा त्याचा रस घेतल्यास फायदेशीर ठरते. सफरचंदात लोह, प्रथिने, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असतात. त्यात कार्बोहायड्रेट्स देखील असतात. त्यामुळे सकाळी आहारात सफरचंद आल्यास दिवसभर शरीराला आवश्यक उर्जा मिळते. सफरचंदामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे भूक लागत नाही. परिणामी वजनही कमी करण्यास याचा फायदा होतो. रोज सकाळी एक सफरचंद (Healthy Apple) खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते. सफरचंद खाणे डोळ्यांसाठी फायदेशीर मानले जाते, कारण सफरचंदात व्हिटॅमिन ए असते, त्यामुळे रोज सकाळी रिकाम्या पोटी सफरचंदाचे सेवन केल्यास  किंवा त्याचा रस घेतल्यास डोळ्यांची दृष्टी वाढते. रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने हृदय निरोगी राहते, असेही सांगण्यात येते. सफरचंदात असलेले फायबर रक्तदाब नियंत्रित ठेवते. याशिवाय सफरचंदात (Healthy Apple) व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम असते. हे घटक हृदयविकाराचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी करतात.

========

हे देखील वाचा : जगातील ‘हे’ मासे मानले जातात सुपर हेल्दी

========

एकूण सफरचंद (Healthy Apple) आणि त्याचा रस हे आरोग्यासाठी वरदान आहेत. मात्र ते कधी घ्यावे आणि किती प्रमाणात सेवन करावे याचेही प्रमाण आहे.  सकाळी रिकाम्या पोटी मोठ्या प्रमाणात सफरचंद (Healthy Apple) खाल्ल्याने गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.  तसेच रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोक असतो.  त्यामुळे सफरचंद आणि त्याच्या रसाचे कितीही फायदे असले तरी मर्यादीत प्रमाणात त्यांचे सेवन करण्याचेही सांगण्यात येते.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.