नॉर्थ कोरिया हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अशातच नॉर्थ कोरियाचा (North Korea) हुकूमशाह किंग जोंग उन याने जनतेला नवे आदेश दिले आहेत. तो आदेश अगदी विचित्र आणि न पटण्यासारखाच आहे. त्यानुसार नॉर्थ कोरियाच्या अधिकाऱ्यांनी पालकांना असे सांगितले की, आपल्या मुलांची नावे ही बॉम्ब, पिस्तुल आणि सॅटेलाइट अशी ठेवावीत. अशी नावे जी देशभक्तीशी संबंधित असतील. तर उत्तर कोरियाला त्या नावांच्या वापरावर कडक कारवाई करायची आहे, ज्यांना सरकार अतिशय मवाळ मानते. यापूर्वी कम्युनिस्ट सरकारने लोकांना दक्षिण कोरियासारखीच A Ri (लव्ज वन) Su Mi (सुपर ब्युटी) सारख्या प्रेमण नावांचा वापर करण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र आता सरकारने लोकांना असा आदेश दिला आहे की, अशा नावांच्या लोकांना अधिक देशभक्त आणि वैचारिक नावे ठेवावी लागणार आहेत.
न मानणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई
हुकूमशाह किंम जोंग याला असे हवे आहे की, पालकांनी आपल्या मुलांची अशी नावे ठेवावीत. परंतु त्याच्या आदेशाचे पालन न केल्यास त्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. या नावांमध्ये Pok II (बॉम्ब), Chung Sim (निष्ठा) आणि Ui Song (सॅटेलाइट) चा समावेश आहे. रेडियो फ्री एशियासोबत बातचीत मध्ये एका नागरिकाने असे म्हटले की, लोक अशी तक्रार करत आहेत की, अधिकारी लोक ती नाव ठेवण्यासाठी दबाव टाकत आहेत, ज्यांना सत्ता हवी आहे. गेल्या महिन्यांपासून लोकांना नोटीस पाठवण्यात येत आहे. नावात बदल करण्यासाठी त्यांच्याकडे यंदाच्या वर्षाअखेर पर्यंतची वेळ आहे.
पालक आदेशामुळे नाराज
नागरिकांनी आदेशात असे सांगण्यात आले आहे की, क्रांतिकारी मानक पूर्ण करण्यासाठी त्यांच्या नावांचे राजकीय अर्थ निघाले पाहिजेत. सरकारच्या या आदेशामुळे आई-वडिल अधिक नाराज झाले आहेत. तसेच नाव बदलण्यास ही घाबरत आहेत. नागरिक असे प्रश्न उपस्थितीत करत आहेत की, एखाद्या व्यक्तीला नाव ठेवण्याचे स्वातंत्र्य का मिळू शकत नाही. नॉर्थ कोरियाच्या अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, देशातील नागरिकांना नाव ही दक्षिण कोरियाशी मिळतीजुळती नसावीत. नॉर्थ कोरिया बहुतांश वेळा बॉर्डर परिसरात क्षेपणस्रांची चाचणी करत राहतो, त्यामुळे दोघांमध्ये तणाव सातत्याने वाढत आहे.(North Korea)
हे देखील वाचा- साउथ कोरियात हॅलोविन पार्टीत मृत्यू तांडव, गर्दीमुळे शंभराहून अधिक बळी
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच किम जोंग उन याच्या मुली जगभरात चर्चेचा विषय ठरल्या होत्या. तर त्याची मुलगी किम जू एई हिचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी त्याच्या दुसऱ्या मुलीचे फोटो समोर आले होते. या मुलीला चीनच्या तज्ञांनी किमची दुसरी मुलगी असल्याचे म्हटले. पण नॉर्थ कोरियाच्या शासकीय टीव्हीवर दाखवण्यात आलेल्या फुटेजमधून मुलीचे फोटो हटवण्यात आले. ही घटना अत्यंत सर्वांना आश्चर्य करणारी होती. तर ज्यावेळी टेलिकास्ट करण्यात आल्यानंतर फोटो हटवला तर गेला. पण पुन्हा जेव्हा चॅनलने तोच प्रोग्राम टेलिकास्ट केला तेव्हा त्या मुलीच्या ठिकाणी एखाद्या दुसऱ्याच मुलीचा चेहरा लावला गेला होता. यावरुन कळते की, मुलींच्या फोटो संदर्भात नॉर्थ कोरिया किती संवेदनशील आहे.