उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन हा किती क्रुर आहे ते सर्वांनाच माहिती आहे. अशातच आता किमने आणखी एक नवा कारनामा केला आहे. तो म्हणजे उत्तर कोरियाच्या शेजारील देश साउथ कोरियाला आपला शत्रू असल्याचे मानत असल्याने त्याने १६-१७ वर्षाच्या दोन मुलांची हत्या केली. या मुलांचा गुन्हा ऐवढाच होता की, ते चोरी-छुप्या पद्धतीने साउथ कोरियातील सिनेमे आणि वेबसीरिज पहायचे. रिपोर्ट्सनुसार या तरुणांना किमने खुलेआम मारुन टाकले.(North Korea Leader)
साउथ कोरियातील सिनेमे आणि वेब सीरिज संपूर्ण जगात नेहमीच चर्चेत असतात. गेल्याच वर्षात आलेल्या Squid Game सीरिजला भारतासह जगातील अन्य देशातील प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. किम जोंग उनच्या उत्तर कोरियात मात्र कोरियन ड्रामा आणि अमेरिकेतील सिनेमे पाहणे किंवा एकमेकांना ते शेअर करण्यावर बंदी आहे. हाच गुन्हा त्या दोन मुलांनी केला. या बदल्यात त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
खुलेआम ठार केले
रिपोर्ट्सनुसार, १६-१७ वर्षातील ही दोन मुले हायस्कूलमध्ये शिकायचे. ते दोघे उत्तर कोरियातील रयांयांग येथे राहणारे होते. असे सांगितले गेले आहे की, या दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर दोघे एकत्रितपणे कोरियन सिनेमे आणि अमेरिकन ड्रामा पाहू लागले. छुप्या पद्धतीने सिनेमे पाहत असल्याचे किम जोंग उनच्या प्रशासनाला कळले. तेव्हा त्या दोन मुलांना एका एयरफील्डमध्ये लोकांच्या समोर खुलेआम पद्धतीने ठार केले.(North Korea Leader)
हे देखील वाचा- हुकूमशाहाचा हुकूम : मुलांची नावे बॉम्ब, तोफा आणि सॅटेलाईट ठेवा…
खरंतर ही घटना ऑक्टोंबर महिन्यातील आहे. पण किम जोंग उन याचे असे म्हणणे आहे की, ती मुलं गुन्ह्यांच्या हालचाली करत होते. त्यामुळेच अन्य लोकांना संदेश देण्यासाठी त्यांना खुलेआम मारुन टाकले. तर किम जोंग याच्या क्रुरतेबद्दल बोलावे तितके कमीच आहे. पण गेल्या वर्षात जेव्हा किमचे वडिल किम जोंग इल यांची पुण्यतिथी होती तेव्हा त्याने ११ दिवसांचा शोकची घोषणा केली होती. या ११ दिवसात देशात सामान्य नागरिकांना हसणे, शॉपिंग करणे, दारु पिण्याची सुद्धा परवानगी नव्हती.
दुसऱ्या बाजूला किम जोंग याच्या वडिलांनी एक साउथ कोरियन अभिनेत्री आणि तिचा दिग्दर्शक नवरा याचे अपहरण केले होते. कारण नॉर्थ कोरियात सुद्धा उत्तम सिनेमे तयार करता येऊ शकतात. खरंतर ही गोष्ट १९६६ मधील आहे. जेव्हा किम जोंग इल हे उत्तर कोरियाचे आर्ट डिविजनचे डायरेक्टर बनले होते. त्यांना सिनेमांचे फार वेड होते. सुरुवातीला त्यांनी असे सिनेमे तयार केले ज्याच्या माध्यमातून त्यांच्या परिवाराची तारीफ केलेली असेल.