नुकतेच एक पुस्तक प्रदर्शित झाले असून त्याचे नाव ‘द सिस्टर’ असे आहे. या पुस्तकात असे लिहिले गेले आहे की, कशा प्रकारे उत्तर कोरियाचा शासक किम उन जोंगची लहान बहिण जगातील सर्वाधिक खतरनाक महिला बनली आहे. पुस्तकात असे सुद्धा लिहिण्यात आले आहे की, किम यो जोंग ऐवढी निष्ठूर आणि वेगवान महिला आहे, जर इतिहासातील सर्वाधिक खरतनाक महिला म्हणून विचारले तर तिचे नाव घेणे चुकीचे ठरणार नाही. (North Korea)
खरंतर याआधी जोंग याच्या मुलीचा ९० च्या दशकातील एक फोटो समोर आला होता. जेव्हा ती अंतरमहाद्वीप बॅलिस्टिक मिसाइलच्या प्रक्षेपणासाठी दिसली होती. ही लहान मुलगी दुसरी कोणी नसून किम यो जोंग होती. तेव्हा ती १० वर्षांची होती. आता उत्तर कोरियात राहिलेले आणि अमेरिकेत राहिलेले लेखक सुंग यूं ली यांनी एक पुस्तक लिहित असे म्हटले की, कशाप्रकारे ती सध्या जगासाठी खरतनाक महिला बनली आहे.
पुस्तकाला त्यांनी ‘द सिस्टर- नॉर्थ कोरियाज किम यो जोंग, द मोस्ट डेंजरस वूमन. नेहमीच अशी सुद्धा चर्चा होते की, सध्या किम जोंग उन हा लठ्ठ होत चालला आहे आणि त्याचे हेल्थ ही बिघडलेले असते. अशातच शासनाच्या दोऱ्या बहिणीकडे येऊ शकतात. किम जोंग उन याची एकमेव आणि लहान बहिण किम यो जोंगला उत्तर कोरियातील शासनात फार ताकदवान मानले जाते.
खरंतर ती भावासोबत नेहमी त्याच्या मागे असते. अलीकडे ती किम जोंग सोबत रशियाला सुद्धा गेली होती. तेथे तिने रशियासोबत करार करण्यास त्याची मदत केली होती. पुस्तकाचे लेख आणि वुडरो विल्सन इंटरनॅशनल सेंटर फॉर स्कॉलर्सचे फेलो सुंग यू ली यांनी पुस्तकात लिहिले आहे की, जर उत्तर कोरियात एखाद्या कारणास्तव भावाची शासकीय गादी रिकामी झाल्यास तर लगेच त्या पदावर बहिणीला बसवले जाऊ शकते. ऐवढी ती कुशल झाली आहे.
गेल्या काही काळात किमला त्याच्या बहिणीने वेळोवेळी साथ दिली आहे. तिला आपल्या भावाची सर्व गुपिते माहिती आहेत. काकांच्या हत्येमध्ये सुद्धा तिने भावाची बाजू घेतली आणि त्याचसोबत ठामपणे उभी राहिली होती. दुसरी सर्वाधिक मोठी गोष्ट अशीकी, सध्या ती भावाची वास्तविक सहयोगी, विश्वासपात्र, मुख्य विदेश-निती सल्लागारासह तंत्रावर मजबूत पकड असणारी महिला आहे. (North Korea)
या व्यतिरिक्त ती आपल्या भावाप्रमाणेच अतिशय क्रूर असल्याचे ही पुस्तकात म्हटले आहे. जणू की, तिला ही क्रुरता विसारत मध्ये मिळाली असावी. तिने उच्च रँकिंग अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा देणे ते अन्य गुन्हेगारांना त्यांच्या परिवारासह जेल शिबिरांमध्ये संभाव्य मृत्यूच्या शिक्षेसाठी सुद्धा पाठवले आहे. पुस्तकानसार तिला बहुतांशजण मागून ‘शैतान महिला’, ‘खुनी प्यासी दानव’ असे सुद्धा म्हणतात. त्याचसोबत उत्तर कोरियातील २५ मिलिन नागरिकांना किम परिवाराची पूजा करण्यास शिकवले जाते. मात्र त्या लोकांना या लोकांचे वागणे, सेक्स, भ्रष्टाचार याच्याबद्दल काहीच माहित नसते.
हेही वाचा- कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांना आयलँन्डवर पार्टी करण्यासाठी मागावी लागली होती माफी