Home » Nobel Prize : जाणून घ्या नोबेल पुरस्काराची संपूर्ण माहिती

Nobel Prize : जाणून घ्या नोबेल पुरस्काराची संपूर्ण माहिती

by Jyotsna Kulkarni
0 comment
Nobel Prize
Share

ट्रम्प तात्यांना जोरदार धक्का बसला आहे. ज्या पुरस्कारासाठी ते स्वतःच स्वतःचे कौतुक करत होते आणि ते या पुरस्कारासाठी कसे पात्र आहे हे सांगत आहे, तो शांततेसाठी दिला जाणारा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या प्रमुख विरोधी नेत्या आणि औद्योगिक अभियंता मारिया कोरिना मचाडो ( Maria Corina Machado) यांना जाहीर झाला आहे. या घोषणेमुळे जागतिक स्तरावर या प्रतिष्ठित पुरस्काराबाबतच्या अटकळांना पूर्णविराम मिळाला आहे. (Marathi)

नोबेल पुरस्कार हा जागतिक स्तरावरील अतिशय मानाचा आणि सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार म्हणून ओळखला जातो. दर वर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सहा श्रेणींमध्ये दिला जातो. यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांमध्ये जागतिक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिग्गजांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. (Nobel Prize)

शांततेचा नोबेल पुरस्कार हा अनेक देशांमध्ये मैत्री वाढवण्यासाठी सर्वोत्तम काम केलेल्या किंवा देशांतर्गत तणाव कमी करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला किंवा संघटनेला दिला जातो. १९६८ मध्ये अर्थशास्त्र या विषयातही नोबेल पारितोषिक दिले जाऊ लागले. स्वेरिजेस रिक्सबँक प्राइझ इन इकॉनॉमिक सायन्स इन मेमरी ऑफ अल्फ्रेड नोबेल हे या पुरस्काराचे अधिकृत नाव आहे. हा नोबेल पुरस्कार नाही. स्वेरिजेस रिक्सबँक या स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने त्याची सुरुवात केली होती. (Marathi News)

नोबेल पुरस्काराची स्थापना कशी झाली याबद्दल देखील एक खास कहाणी आहे. २७ नोव्हेंबर १८९५ रोजी स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांनी त्यांचे शेवटचे इच्छापत्र आणि मृत्युपत्र तयार केले होते. त्यात त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग शांतता, साहित्य, शरीरविज्ञान किंवा मेडिसीन, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या क्षेत्रातल्या व्यक्तींना पुरस्कारांसाठी देण्यात यावा, असे नमूद करण्यात आले होते. नोबेल शांतता पुरस्कार हा एकमेव पुरस्कार आहे जो नॉर्वेजियन संसदेने निवडलेल्या पाच सदस्यांच्या समितीद्वारे ठरवला जातो. अल्फ्रेड नोबेलच्या हयातीत, स्वीडन आणि नॉर्वे एका संघाचा भाग होते. (Todays Marathi Headline)Nobel Prize

नोबेल हे स्वीडिश निर्माता, शास्त्रज्ञ आणि इंजिनीअर होते. डायनामाइटची निर्मिती करण्यासाठी ते प्रामुख्याने ओळखले जातात. त्यांचा जन्म २१ ऑक्टोबर १८३३ रोजी स्वीडनमध्ये स्टॉकहोम येथे झाला होता. ते बहुभाषिक होते आणि त्यांना कविता आणि नाटकाची आवड होती. त्या काळी नोबेल यांची मतं पुरोगामी मानली जात होती. १८९६ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या संपत्तीचा मोठा वाटा पाच श्रेणीतल्या नोबेल पुरस्कारांची सुरुवात करण्यासाठी वापरला गेला. त्यांच्या इच्छेनुसार नोबेल पुरस्कार सुरू करण्यात आले. पहिला नोबेल पुरस्कार १० डिसेंबर १९०१ रोजी देण्यात आला होता. पुरस्कार विजेत्यांना दिली जाणारी रक्कम ही काही कालावधीनंतर वाढवली जाते. (Top Marathi Headline)

जेव्हा अल्फ्रेड नोबेल यांचे निधन झाले, तेव्हा त्यांनी नोबेल पारितोषिके स्थापन करण्यासाठी त्यांची बहुतेक मालमत्ता सोडली. त्यांनी अट घातली की हे पैसे एका निधीत रूपांतरित करावेत आणि सुरक्षा बाँडमध्ये गुंतवावेत. आज, त्या पैशावर मिळणारे व्याज नोबेल पारितोषिकांसाठी निधी म्हणून वापरले जाते. संपूर्ण नोबेल पारितोषिकाची बक्षीस रक्कम सध्या प्रति पुरस्कार ११ दशलक्ष स्वीडिश क्रोनर (SEK) आहे, जी २०२३च्या अखेरीस अंदाजे १.२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. विजेत्यांना बक्षीस रक्कम, डिप्लोमा आणि १८ कॅरेट सुवर्णपदक मिळते. (Latest Marathi News)

नोबेल पारितोषिक जास्तीत जास्त तीन व्यक्ती विभागून दिले जाऊ शकते. शांतता पुरस्काराच्या बाबतीत, ते एका व्यक्तीला किंवा संस्थेला देखील दिले जाऊ शकते. नोबेलच्या मृत्युपत्राच्या या सर्व उद्देशांची पूर्तता करण्यासाठी जबाबदार असलेल्या नोबेल फाउंडेशनच्या कायद्यातूनच हा पुरस्कार दिला जाऊ शकतो हा नियम आला आहे. त्यात स्पष्टपणे म्हटले आहे की, “कोणत्याही परिस्थितीत पुरस्काराची रक्कम तीनपेक्षा जास्त व्यक्तींमध्ये विभागली जाऊ नये.” (Top Marathi News)

२०२० मध्ये ही रक्कम १ कोटी स्वीडिश क्रोनर होती. तर २०१७ मध्ये ती ९० लाख स्वीडिश क्रोनर होती. २०१२ बद्दल बोलायचे तर त्यावेळी नोबेल विजेत्यांना ८० लाख स्वीडिश क्रोनर देण्यात आले होते. म्हणजे कालांतराने बक्षीस म्हणून मिळणाऱ्या रकमेतही वाढ झाली आहे. जेव्हा १९०१ मध्ये पहिल्यांदा नोबेल पारितोषिक देण्यात आलं तेव्हा प्रति श्रेणी पुरस्काराची रक्कम दीड लाख स्वीडिश क्रोनर होती. म्हणजेच, जर ती सध्याच्या भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित केला तर ती ११ लाख रुपयांपेक्षा जास्त होईल. नोबेल पारितोषिकाचं पहिले बक्षीस ११ लाख रुपये होते, जे आता ८ कोटींहून अधिक झालं आहे. (Latest Marathi Headline)

पैसे आणि पदकापेक्षाही या सन्मानाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागतिक मान्यता. नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर, व्यक्तीची विश्वासार्हता आणि प्रभाव वेगाने वाढतो. जगभरातील विद्यापीठे, संस्था आणि सरकार अशा व्यक्तींना त्यांचे विचार शेअर करण्यासाठी आमंत्रित करतात. जरी या पुरस्कारासोबत कोणतेही अतिरिक्त सरकारी फायदे किंवा सुरक्षा मिळत नसली तरी, त्यामुळे मिळणारी ओळख आणि मान्यता इतकी महत्त्वाची आहे की ती विजेत्याच्या आयुष्यात असंख्य संधी उघडते. त्यांचे कार्य जगभरात ओळखले जाते आणि ते येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणास्थान बनतात. (Top Marathi Headline)

========

Nobel Peace Prize : ट्रम्प तात्यांचे नोबेल मिळवण्याचे स्वप्नभंग करणाऱ्या मारिया कोरिना मचाडो आहेत तरी कोण?

========

प्रत्येक पुरस्कार समिती थोडी वेगळी असते, परंतु शेवटी ते सर्व अल्फ्रेड नोबेलची इच्छा पूर्ण करण्यासाठी काम करतात. त्यांच्या मृत्युपत्रानुसार, नोबेल पारितोषिक ‘मानवजातीसाठी सर्वात मोठे कल्याण’ करणाऱ्यांना दिले पाहिजे. दरवर्षी १० डिसेंबर रोजी साजरा केला जाणारा नोबेल दिन हा अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त साजरा केला जातो. या दिवशी विजेत्यांना नोबेल पारितोषिक प्रदान केले जातात. (Top Trending News)

नोबेल पारितोषिक मरणोत्तर दिले जाऊ शकत नाही. जर पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विजेत्याचा मृत्यू झाला, तर त्याला किंवा तिला हा पुरस्कार प्रदान केला जाऊ शकतो. नोबेल पारितोषिक समारंभ दर डिसेंबरमध्ये स्वीडनमधील स्टॉकहोम येथे आयोजित केला जातो, तर शांतता पुरस्कार ओस्लो, नॉर्वे येथे प्रदान केला जातो. या कार्यक्रमात राजेशाही, राजकारणी, शास्त्रज्ञ आणि प्रमुख व्यक्ती उपस्थित असतात. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.