जसा नोव्हेंबर महिना सुरु होतो तेव्हा संपूर्ण सोशल मीडियात ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ च्या पोस्ट आणि हॅशटॅग दिसून येऊ लागतात. खरंतर हे असे संपूर्ण महिनाभर चालते. परंतु तुम्हाला माहियेत का, नो शेव्ह नोव्हेंबर म्हणजे काय? याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात. (No Shave November)
2009 मध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर नो शेव्ह नोव्हेंबरचे कॅम्पेन सुरु करण्यात आले होते. कॅम्पेनच्या आधारावर याची सुरुवाच झाली होती. यामध्ये कॅन्सरवर रिसर्च आणि दानासाठी पैसे जमा करणे आणि जागृकता निर्माण करण्यासाठी या कॅम्पेनची सुरुवात केली होती. हे अभियान शिकागो मध्ये राहणाऱ्या एका हिल परिवाराने सुरु केली होती. या परिवाराने आपले वडील मॅथ्यू हिल यांच्या सन्मानार्थ याची सुरुवात केली होती. ज्यांचा 2007 मध्ये कोलोन कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता.
नोव्हेंबरलाच का नो शेव्ह नोव्हेंबर साजरा केला जातो?
नो शेव्ह नोव्हेंबर केवळ एक ट्रेंन्ड किंवा हॅशटॅश नसून ते एक कॅम्पेन आहे. याचा माध्यमातून कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजाराप्रति समाजात जागृकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो.
महिनाभर चालणाऱ्या या कॅम्पेनमध्ये पुरुष मंडळी शेविंग करत नाही. त्यामुळे त्यांच्या ग्रुमिंगमधून वाचणारे पैसे हे चॅरिटीला दान केले जाते. जे कॅन्सरच्या रुग्णांच्या उपचारासाठी आणि अन्य गरजांसाठी मदत म्हणून दिले जातात. हे सोशल कॅम्पेन या आजाराला लागलेला कलंक दूर करण्याचा प्रयत्न करते.
हा महिना आपल्या केसांवर प्रेम करणे आणि त्यांना वाढू देण्याचा आहे. दुसऱ्यांचे आयुष्य वाचवण्यासाठी जागृक निर्णय घेण्याचा महिना आहे. कॅन्सरबद्दल लोकांमध्ये जागृकता वाढवण्याचा हा महिना आहे. (No Shave November)
तुम्ही सुद्धा होऊ शकता सहभागी
या कॅम्पेनचा हिस्सा कोणीही होऊ शकतो. केवळ तुम्हाला या महिन्यात आपली दाढी वॅक्स किंवा शेव करायची नाही. तुम्हाला केवळ रेजर पासून दूर रहायचे आहे. ग्रुमिंगसाठी होणाऱ्या खर्चाचे पैसे वाचवून चॅरिटी अथवा ऑफिशियल नो शेव्ह नोव्हेंबरच्या चॅरिटीला दान करू शकता.
या व्यतिरिक्त तुम्ही या कॅम्पेन मधील लोकांना सपोर्ट करू शकता. त्याचसोबत तुम्ही चॅरिटीही करू शकता. हे त्या एनजीओसाठी चॅरिटी आहे जी, कॅन्सर प्रति जागृकता वाढवण्याचे काम करतात. सध्या नो शेव्ह नोव्हेंबरची कॉन्सेप्ट जगभरात प्रसिद्ध झाली आङे. मात्र काही लोकांना अद्याप यामागील नेमके कारण माहिती नसते. तर काही लोक शौकसाठी नोव्हेंबर मध्ये केस आणि दाढी कापत नाही.
हेही वाचा- विमानाच्या इंजिनवर ‘या’ कारणास्तव फेकल्या जातात कोंबड्या