दिव्यांग असून माउंट एवरेस्टवर यशस्वी चढणे शक्यच नाही असे कोणीही म्हणेल. पण हे हरि बुद्धा मागर यांनी करुन दाखवत इतिहास रचला आहे. त्यांनी केलेल्या या कामगिरीमुळे त्यांचे कौतुक केले जातेय पण त्यांच्यासारख्या अनेक जणांना प्रेरणा सुद्धा त्यांच्याकडून मिळणार आहे. हरि बुद्धा मागर ब्रिटिश सैन्यातील रियाटर्ड गोरखा जवान आहेत. माउंट ऐवरेस्ट सर केल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त करत म्हटले की, माझ्यासारख्या अनेक लोकांना त्यांचे समाजातील अस्तित्वाबद्दल विचार बदलेल. (No legs no limits)
हिमालयन स्की ट्रेक कंपनीचे अधिकारी यांच्या मते, 43 वर्षीय हरि बुद्धा मागर यांनी आपल्या कृत्रिम पायांच्या मदतीने 8848 मीटर ऐवरेस्टची चढाई केली आहे. त्यांच्या कामगिरीने सर्वांना चकित केले आहे. खरंतर हैराण करणारी गोष्ट अशी की, हरि बुद्धा मागर यांना दोन्ही ही पाय नाहीत. अफगाणिस्तानात तैनात केले होते तेव्हा हरि बुद्धा मागर यांना आपले दोन्ही पाय गमवावे लागले होते.
हरि बुद्धा मागर यांचा जन्म 1979 मध्ये पश्चिम बंगाल मधील नेपाळच्या एका गावात झाला होता. सुरुवातीचे शिक्षण रोलपा जिल्ह्यात झाले. जररोज अनवाणी ते 45 मिनिटे चालून शाळेत जायचे. कागद, पेन यांची सोय नसल्याने त्यांनी लाकडावर दगडाने लिहिण्यास शिकले. वयाच्या 11 व्या वर्षात मागर यांचे लग्न झाले.
हरि बुद्धा मागर यांनी 1999 मध्ये ब्रिटिश सैन्यात एन्ट्री केली. रॉयल गोरखा राइफल्सच्या माध्यमातून ते ब्रिटिश सैन्यात दाखल झाले. तेव्हा ते केवळ 19 वर्षांचे होते. त्यांनी पाच ही महाबेटांवर काम केले आहे. एवरेस्टवरील त्यांच्या या चढाईला ‘नो लेग्स, नो लिमिट’ असे नाव दिले गेले होते.
माउंट एवरेस्टवर चढण्याचे मागर यांचे आयुष्यातील अखेरचे लक्ष्य होते. 2017 मध्ये नेपाळ सरकाराने गिर्यारोहकांना माउंट ऐवरेस्टवर चढण्यास बंदी घातली होती. त्यानंतर 2018 मध्ये हरि मागर यांनी दिव्यांग संघटनांच्या प्रयत्नाने कोर्टात धाव घेतली. तेव्हा नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यावरील बंदी हटवली. (No legs no limits)
हेही वाचा- महाराणी एलिजाबेथच्या अंत्यसंस्कारासाठी ब्रिटेनने खर्च केली ऐवढी रक्कम
मागर यांच्यासोबत घडली ती घटना
2010 ची गोष्ट असेल. हरि बुद्धा मागर यांना अफगाणिस्तानात तैनात करण्यात आले होते. त्याच दरम्यान त्यांचे दोन्ही पाय IED विस्फोटकांवर पडले. एक जोरदार स्फोट झाला. सुदैवाने ते बचावले पण त्यांना त्या स्फोटात आपले पाय गमावावे लागते. हरि बुद्धा मागर असे म्हणतात की, दोन्ही पाय गमावल्यानंतर त्यांना फार त्रास झाला होता. हिमालयन स्की ट्रेक कंपनीच्या मदतीने त्यांना कृत्रिम पाय मिळाले. त्यानंतर त्यांनी चालणे-फिरणे सुरु केले होते.
ऐवरेस्टवर चढण्याचे त्यांचे स्वप्न होते. मागर असे म्हणतात की, त्यांना त्यांच्यासोबत झालेली घटना कोणासोबतच होऊ नये असे वाटते. तर माउंट एवरेस्ट सर केल्यानंतर लोकांच्या मनात एक वेगळेच धाडस निर्माण होणार आहे.