Home » नित्यानंद यांच्या बनावट देश कैलासाचे ३० पेक्षा अधिक अमेरिकन शहरांशी करार

नित्यानंद यांच्या बनावट देश कैलासाचे ३० पेक्षा अधिक अमेरिकन शहरांशी करार

by Team Gajawaja
0 comment
Nityananda Fake Country
Share

स्वयंभू बाबा आणि कोर्टाद्वारे फरार म्हणून घोषित करण्यात आलेल्या नित्यानंद यांच्या संयुक्त राज्य कैलसाने ३० पेक्षा अधिक अमेरिकेतील शहरांसोबत एक सांस्कृतिक भागीदारीचा करार केला आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. हा रिपोर्ट अमेरिकेतील राज्य न्यू जर्सीच्या नेवार्क शहराकडून हे सांगितल्यानंतर समोर आली की, जेव्हा त्यांनी काल्पनिक देशासह सिस्टर सिटी करार निरस्त केला आहे. नेवार्क आणि बनावट देश संयुक्त राज्य कैलासामध्ये सिस्टर सिटी करार याच वर्षात २१ जानेवारीला झाला होता. त्यासाठी नेवार्क स्थित सिटी हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (Nityananda Fake Country)

२०१९ मध्ये नित्यानंद यांनी बनवला कैलासा
नित्यानंद यांनी २०१९ मध्ये संयुक्त राज्य कैलासाची स्थापना करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या एका वेबसाइटनुसार, ३० पेक्षा अधिक अमेरिकन शहरांनी बनावट देश कैलासा सोबत सांस्कृतिक भागीदारी करार केला आहे. वेबसाइटच्या मते, या शहरांमध्ये रिचमंड, वर्जिनिया, ओहायो, डेटन आणि बुएना पार्कसह अन्य देशांचा समावेश आहे.

कैलासावर अमेरिकन मीडियाची नजर
फॉक्स न्यूजच्या एका रिपोर्टनुसार असे सांगितले गेले की, आम्ही सर्वोच्च बनावट बाबांचा शोध घेत आहोत. ज्यांच्याकडे त्या शहरांची मोठी लिस्ट आहे ज्यांना त्यांनी लुटले. नॉर्थ कॅरोलिनाच्या जॅक्सनविलेने फॉक्स न्यूज सोबत असे म्हटले की, कैलासा सोबत आमच्या घोषणा कोणत्याही प्रकारचे समर्थन करत नाही. ते विनंतीला प्रतिसाद आहेत. आम्ही विनंतीसह प्रदान केलेल्या माहितीची पडताळणी करत नाही.

अमेरिकेच्या नेत्यांना सुनावले
रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, ना केवळ महापौर किंवा शहाराचे नगरसेवक तर संघीय सरकार चालवणारे लोक सुद्धा बनावट देशाच्या पाया पडत आहेत. रिपोर्टमध्ये असे ही म्हटले की, बनावट बाबांच्या मते अमेरिकेतील संसदेच्या दोन सदस्यांनी कैलासाला विशेष काँग्रेसनल मान्यता दिली आहे. यापैकी एक काँग्रेस सदस्य कॅलिफोर्नियातील नोर्मा टोरेस आहे. (Nityananda Fake Country)

अमेरिकेतील नेत्यांनी काय म्हटले
फॉक्स न्यूज अँखरने असे म्हटले की, तो व्यक्ती हे ठरवतो की आपण कोणत्या गोष्टीवर आपले पैसे खर्च केले पाहिजे. त्याला एक कथित बलात्कारी बाबाद्वारे बनावट देशाच्या माध्यमातून लुटले जाते. ओहायो येथील रिपब्लिकन नेता ट्रॉय बाल्डरसन यांनी सुद्धा त्यांच्या दिव्य पवित्रता आणि त्यांच्या हिंदू धर्माच्या पूजेमुळे काँग्रेसनला मान्यता दिली.

हे देखील वाचा- ब्रिटीश राजघराण्यालाही अर्थव्यवस्थेची झळ

नेवार्कने रद्द केला करार
याच महिन्याच्या सुरुवातीला नेवार्क शहाराच्या संचार विभागामध्ये प्रेस सचिव सुसान गॅरोफलो यांनी एका ईमेल मध्ये सांगितले की, जसे आम्हाला कैलासाच्या आसपासच्या परिस्थितीबद्दल कळले तेव्हा नेवार्क शहराने लगेच कारवाई केली. सिस्टर सिटी कराराला १८ जानेवारीला रद्द केले. नित्यानंद यांच्यावर भारतात बलात्कार आणि लैंगिक शोषण केल्याची काही प्रकरणे आहेत. परंतु त्यांनी या आरोपांना फेटाळून लावले आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.