Home » देशाचे एकमेव नेते नीतीश कुमार झाले ८ व्यांदा मुख्यमंत्री, जाणुन घ्या राजकीय प्रवास

देशाचे एकमेव नेते नीतीश कुमार झाले ८ व्यांदा मुख्यमंत्री, जाणुन घ्या राजकीय प्रवास

by Team Gajawaja
0 comment
Nitish Kumar
Share

नीतीश कुमार (Nitish Kumar) यांनी नुकतीच बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ते देशातील असे एकमेव नेते आहेत ज्यांनी आठव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. खरंतर १९९० मध्ये राजकरणात आपली मोठी ओळख बनवणारे नीतीश कुमार यांना राजकरणातील चाणाक्य असे म्हटले जाते. त्यांच्या निर्णयाची कधीच कोणाला भनक सुद्धा लागत नाही. तर जाणून घेऊयात नीतीश कुमार यांचा आजवरच्या राजकिय प्रवासासंदर्भात अधिक.

लालू प्रसाद यादव यांना केले होते बिहारचे मुख्यमंत्री
बिहारच्या राजकणरणातील चाणाक्य म्हणजेच नीतीश कुमार यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाला. नीतीश यांनी मार्च १९९० मध्ये राज्यातील राजकरणात अशा वेळी अधिक चर्चेत आले जेव्हा त्यांना जनता दलाचे वरिष्ठ नेते आणि मित्र लालू प्रसाद यादव यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवून देण्यास मदत केली होती. त्यावेळी नीतीश कुमार हे लालू यांना आपला मोठा भाऊ मानत आणि लालू सुद्धा नीतीश यांना आपला लहान भाऊ मानत होते.

प्रत्येक निर्णय लालू हे नीतीश कुमारांना विचारुन घ्यायचे
काही सुत्रांकडून असे सांगितले जाते की, लालू यांचा पक्ष आणि सरकारमध्ये एखादा मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्याबद्दल नीतीश कुमार किंवा अन्य वरिष्ठ सहकार्यांना विचारत घेऊन घेतले जात होते. परंतु काही वर्षांमध्येच काही राजकीय मुद्द्यांवरुन या दोघांमध्ये मतभेद होऊ लागले. जेव्हा लालू यांच्या इच्छेविरुद्धा १२ फेब्रुवारी १९९४ ला गांधी मैदानात आपल्या जातीमधील लोक, कुर्मी चेतना महारलीच्या रॅलीत सहभागी झाले होते तेव्हा त्यांच्या नात्यात वाद निर्माण झाला होता.

Nitish Kumar
Nitish Kumar

लालूंचा हात सोडून नीतीश यांनी आपला मार्ग निवडला
या रॅलीला संबोधित केल्यानंतर नीतीश यांनी लालू यांचा हात सोडून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. लालूंचा पर्याय म्हणून पुढे येण्याची नितीश यांची इच्छा. त्यांच्या आकांक्षांना मोठा धक्का बसला जेव्हा त्यांच्या नव्याने स्थापन झालेल्या समता पक्षाने 1995 च्या निवडणुका लढवल्या आणि 310 पैकी फक्त सात जागा जिंकल्या.

भाजपच्या मदतीने झाले मुख्यमंत्री
दरम्यान, पक्षाची शक्यता १९९६ च्या लोकसभेत अधिक उज्वल झाली. जेव्हा भाजप सोबत गठबंधन करत त्यांनी एकट्याने बिहारमध्ये आठ जागांवर दणदणीत विजय मिळवला होता. १९९६ मध्ये नीतीश यांनी भाजपसोबत जे गठबंधन केले ते सातत्याने १७ वर्ष टिकले. नीतीश कुमार (Nitish Kumar) वाजपेयी यांच्या सरकारमध्ये रेल्वे मंत्री झाले आणि या दरम्यान भाजपच्या मदतीने तीन वेळा बिहारचे मुख्यमंत्री झाले.

वर्ष २०१३ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना २०१४ च्या लोकसभा निवडणूकीसाठी भाजपचे प्रमुख बनवण्यात आले होते. त्यानंतर जदयू यांनी एनडीएची साथ सोजली. परंतु २०१४ च्या निवडणूकीत एकटेपणाने जाणे नीतीश यांच्यासाठी अत्यंत वाईट झाले कारण जदयू राज्यातील ४० लोकसभा जागांपैकी फक्त दोन जागांवर जिंकले. पण २००९ च्या निवडणूकीत २० जागांच्या तुलनेत पुन्हा जदयूने भाजपसोबत गठबंधन केले.

हे देखील वाचा- सामान्य नागरिकांप्रमाणे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना सुट्टी घेता येते का ?

२०१५ मध्ये महागठबंधनचे नेते झाले, बिहारचे मुख्यमंत्री झाले नीतीश
२०१५ च्या विधानसभा निवडणूकीत राजद आणि काँग्रेससोबत आलेले नीतीश हे जेव्हा कधीही एकटे गेले तेव्हा त्यांना नेहमीच झटका लागला. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्व सातही प्रसंगी फक्त सहकार्यांच्या मदतीने असे करु शकले. पाचव्या वेळेस भाजपच्या मदतीने आणि दो वेळा दुसऱ्यांच्या मदतीने २१०५ मध्ये जेव्हा ते महागठबंधनचे मुख्यमंत्री झाले. परंतु महागठबंधन दोन वर्षांहून अधिक टिकले नाही आणि सरकार कोसळून नीतीश यांनी पुन्हा भाजपचा हात पकडला. त्यानंतर बदलत्या राजकीय परिप्रेक्ष्यात नितीश यांनी पुन्हा महाआघाडी स्थापन केली असून आज ते मुख्यमंत्री झाले आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.