Home » आपल्याला वाईट स्वप्न का पडतात माहितेय का?

आपल्याला वाईट स्वप्न का पडतात माहितेय का?

by Team Gajawaja
0 comment
nightmares
Share

प्रत्येक व्यक्तीला कोणती ना कोणती स्वप्न पाहतो. जर चांगली स्वप्न पडली तर मूड ही उत्तम राहतो. मात्र वाईट आणि भीतीदायक स्वप्न पडल्यास आपल्याला त्याचा त्रास होते. अशी स्वप्न काही वेळेस आपल्या नेहमीच लक्षात राहतात आणि त्यामुळे आपला संपूर्ण दिवस खराब जातो. कधी-कधी या स्वप्नांमुळे झोप सुद्धा पूर्ण होत नाही. परंतु तुम्हाला माहिती आहे का स्वप्न आपल्याला का पडतात याबद्दल वैज्ञानिकांना सुद्धा शोध लावता आलेला नाही. परंतु भीतीदायक स्वप्नांमागे काही कारणे असल्याचे ही सांगितले जाते.(Nightmares)

कधी-कधी होणाऱ्या तणाव किंवा मानसिक दबावामुळे वाईट स्वप्न पडतात. शाळा किंवा कामाबद्दल अधिक चिंता व्यक्त केल्याने अशा पद्धतीची स्वप्न पडतात. आयुष्यात एखादा मोठा बदल जसे की, आपलं माणूस आपल्यापासून दूर निघून जाणे किंवा त्याच्या मृत्युमुळे आपल्याला घाबरवणारी स्वप्न पडू शकता. त्याचसोबत मानसिक आघात किंवा सदम्यामुळे वाईट स्वप्न पडू शकतात. जसे की, शारिरीक शोषण, सेक्शुअल अब्युज किंवा अपघाताचा परिणाम आपल्या डोक्यावर अधिक होते. अशातच जेव्हा आपण रात्रीच्या वेळी झोपतो तेव्हा आपल्याला वाईट स्वप्नांच्या रुपात आपण ती आठवत असतो. काही लोकांना पोस्ट ट्रॉमॅटीक स्ट्रेस डिसऑर्डरची समस्या असते. या लोकांना वाईट स्वप्न पडणे किंवा भीतीदायक स्वप्न पडणे सामान्य बाब आहे.

हे देखील वाचा- भारतातील ‘या’ अफवांमुळे उडाली होती खळबळ

nightmares
nightmares

काही वेळेस असे ही होते की, एखाद्या प्रकारचा मानसिक आजार जसे की, बाइपोलर डिसऑर्डर, वारंवार तणाव येणे, सिजोफ्रेनिया सारखे आजा झाल्यास आपल्याला वाईट स्वप्न पडण्याची शक्यता वाढते. अशावेळी डॉक्टर तुम्हाला तुमचा तणाव कमी करण्यासंदर्भात काही गोष्टी सांगतात. जेणेकरुन वाईट स्वप्न कमी पडतात. या व्यतिरिक्त काही औषध खाल्ल्यानंतर सुद्धा वाईट स्वप्न पडतात जसे की, अँन्टीडिप्रेसन्ट, अँन्टीमाइक्रोबियल्स, बीटा-ब्लॉकर्स, ब्लड प्रेशरची औषधे, पार्किंसन आजाराची औषधं आणि धुम्रपान थांबवण्यासाठी खाल्ली जाणारी औषधे. जर तुम्हाला अशा औषधांमुळे वाईट स्वप्न पडत असतील तर त्याबद्दल डॉक्टरांशी जरुर चर्चा करा. परंतु प्रत्येक दिवशी घेतली जाणारी औषधं अचानक बंद केल्यास त्याचा परिणाम आपल्या डोक्यावर होतो आणि त्यामुळे सुद्धा वाईट स्वप्न पडू शकतात.(Nightmares)

या व्यतिरिक्त उत्तम झोप न लागल्याने वाईट स्वप्न येतात. खासकरुन आपल्या दैनंदिन शेड्युलमध्ये बदल झाल्याने असे होऊ शकते. जसे की, अशावेळी उठता ज्याची तुम्हाला सवय नसते. अशातच तुमची झोप सुद्धा पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. अर्धवट झोपेमुळे ही तुम्हाला वाईट स्वप्न पडू शकतात. तर काही लोकांना स्लीप एपनियाची समस्या असते. अशातच वाईट स्वप्न पडतात. काही संशोधनानुसार, स्लीपप एपनियामुळे निर्माण होणाऱ्या तणावामुळे वाईट स्वप्न पडतात. त्याचसोबत कधी-कधी आपण हॉरर पुस्तक किंवा सिनेमा पाहतो तेव्हा आपल्याला त्याच प्रकारचे स्वप्न पडू शकते. खासकरुन जर तुम्ही या गोष्टी करत असाल तर त्याचा थेट परिणाम डोक्यावर होतो. काही व्हिडिओ गेम्स आणि टीव्ही शो सुद्धा आपल्या डोक्यावर परिणाम करतात. झोपण्यापूर्वी अशा प्रकारच्या गोष्टी करणे टाळावे असा सल्ला दिला जातो.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.