आपले आयुष्य सुरळीत सुरु रहावे यासाठी प्रत्येक जण काही ना काही धडपड करत असतो. उत्तम आयुष्यासाठी काही लोक व्यवसाय करतात तर काही लोक नोकरी करतात. मात्र अशातच काही लोक अशी असतात की, त्यांच्या आयुष्यातील समस्यांमुळे त्यांना नाइट शिफ्टमध्ये काम करावे लागते. परंतु जेव्हा नाइट शिफ्टमध्ये आपण पाहतो प्रत्येकच जण हा सातत्याने काम करत नाही. काही जण त्या दरम्यान झोपतात तर काहीजण जागून काम करत असतात. अशा प्रकारच्या रुटीनमुळे आरोग्यासंबंधित समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. मात्र तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीचे रुटीन फॉलो करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत यामुळे कोणते कोणते आजार किंवा आरोग्यासंबंधित समस्या तुम्हाला उद्भवू शकतात त्याबद्दल अधिक. (Night Shift Working)
-मानसिक स्वास्थ बिघडते
काही रिसर्चनुसार समोर आले आहे की, जी लोक रात्री जागून काम करतात त्यांचे दुसऱ्यांच्या तुलनेत मानसिक स्वास्थ हे बिघडलेले असते. तज्ञांच्या मते नाइट मध्ये काम करणाऱ्यांचा माइंड केमिकवलवर वाईट परिणाम होतो. बिघडलेल्या मानसिक स्वास्थामुळे त्याचा कामावर ही परिणाम होऊ शकतो. या रुटीनची दररोज सवय झाली असेल तर दररोज १० मिनिटे तरी मेडिटेशन केल्यास तुमचे मानसिक आरोग्य सुरळीत काम करु शकत.
-हृदयासंबंधित आजार
वेबएमडी मध्ये छापून आलेल्या एका वृत्तानुसार, जे लोक नाइट शिफ्ट वर्क कल्चर फॉलो करतात त्यांना हृदयासंबंधित आजार होण्याची अधिक शक्यता असते. अभ्यासात असे सांगितले गेले आहे की, नाइट मध्ये काम करणाऱ्याला प्रत्येक पाच वर्षानंतर हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता असते. खरंतर बिघडलेल्या लाइफस्टाइलमुळे बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाम वाढते आणि अशातच हृदयासंबधित आजार होऊ लागतात.(Night Shift Working)
-मेटाबोलिक सिंड्रोम
नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना मेटाबोलिक सिंड्रोमचा धोका असतो. या स्थितीत उच्च रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे, वजन वाढणे आणि कोलेस्ट्रॉलचे संतुलन बिघडणे अशा गंभीर आरोग्यासंबंधितच्या समस्या उद्भवू लागतात. रात्री काम करणाऱ्यासाठी भले जागे रहावे लागते पण तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याची काळजी सुद्धा घेतली पाहिजे. यासाठी रात्रीच्या वेळी एकदा तरी गरम पाणी प्या.अधिकाधिक हायड्रेट राहण्याचा प्रयत्न करा.
हे देखील वाचा- साउंड थेरपी काय आहे? जाणून घ्या फायदे
-विटामिन डी ची कमतरता
नाइटमध्ये काम करणाऱ्यांना उन मिळत नाही. उन्हामध्ये विटामिन डी असते. त्यामळे शरिरात जर विटामिन डी ची कमतरता असेल तर काही समस्या सुरु होऊ लागतात. अशातच प्रयत्न करा की, काही मिनिटे का होईना सूर्याच्या किरणांमध्ये रहा.