2025 हे वर्ष सुरु होण्यापूर्वीच हे वर्ष किती भयानक आहे, याची भविष्यवाणी होऊ लागली होती. पूर, अवेळी पाऊस, युद्ध, आग, भूकंप, त्सुनामी अशा अनेक घटना या वर्षात होणार असल्याची भविष्यवाणी करण्यात आली होती. मात्र दरवर्षी नवं वर्ष सुरु होतांना अशा भविष्यवाणी होतात, हे सांगून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. (Nicholas Aujula)
अर्थातच 2025 हे वर्ष अशाच सर्व घटनांनी भरलेले आहे. आता फक्त सहा महिने होत असतांना या सर्व घटनांनी जगभर अस्थिरता निर्माण झाली आहे. पण 2025 या वर्षाच्या शेवटच्या महिन्यांबाबत जी भविष्यवाणी झाली आहे, ती थरकाप उडवणारी आहे. ही भविष्यवाणी आहे, महायुद्धाची. 2025 च्या शेवटच्या महिन्यामध्ये महायुद्ध, सायबर युद्ध, हिंसाचार आणि नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढणार असल्याची भविष्यवाणी एका नाही तर तब्बल चार भविष्यवक्त्यांनी केली आहे. यात बाबा वांगा, नोस्ट्राडेमस, एथोस सॅलोम आणि निकोलस औजुला यांचा समावेश आहे. या भविष्यवाणीला जोड म्हणून की काय, समुद्रातील सर्वात दुर्मिळ प्रजातींपैकी एक महाकाय ओअरफिश ऑस्ट्रेलियातील टास्मानियामधील स्ट्रहानजवळील समुद्रकिनाऱ्यावर आढळून आला. हा मासा अपशकुनी मासा म्हणून ओळखला जातो. हा मासा दिसला तर ते भूकंप किंवा नैसर्गिक आपत्तींचे सूचक मानले जाते. त्यामुळे पुन्हा या चार भविष्यवाणी चर्चेत आल्या आहेत. (International News)
सध्या चार भविष्यवक्त्यांनी 2025 वर्षातील शेवटच्या चार महिन्यांचे जे भविष्य सांगितले आहे, त्याची चर्चा होत आहे. यात पहिला नंबर आहे, तो नवीन नोस्ट्राडेमस म्हणून ओळखले जाणारे, लंडनचे हिप्नोथेरपिस्ट निकोलस औजुला. 38 वर्षाच्या निकोस यांच्या मते, या वर्षाच्या मध्यात जगात एक मोठे युद्ध सुरू होऊ शकते. शिवाय धर्म आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली हिंसाचाराच्या मोठ्या घटना होणार आहेत. यामध्ये दुसरा नंबर येतो तो बाबा वांगा यांचा. 1911 मध्ये जन्म झालेल्या बाबा वांगा यांना त्यांच्या अचूक भाकितांमुळे ‘बाल्कनचा नोस्ट्रेडॅमस’ म्हटले जाते. त्यांनी अमेरिकेतील 9-11 हल्ला, राजकुमारी डायनाचा मृत्यू आणि अलीकडील म्यानमार भूकंपाबाबत सांगितलेले भाकित खरे ठरले आहे. त्यांनी 2025 च्या अखेरीस युरोपमध्ये एक भयानक युद्ध सुरू होईल असेही भाकित केले आहे. हे युद्ध म्हणजे, मानवतेच्या पतनाची सुरुवात असेल, असेही बाबा वांगा यांनी सांगितले आहे. बाबा वांगा यांच्यासारखे भाकित जगप्रसिद्ध नॉस्ट्राडेमस यांनी केले आहे. राणीच्या देशात भयानक युद्ध होईल, शिवाय अंतर्गत वादही वाढतील असे भाकित नॉस्ट्राडेमस यांनी केले आहे. (Nicholas Aujula)
प्रसिद्ध मध्ययुगीन फ्रेंच भविष्यवक्ता नोस्ट्राडेमस यांनी 2025 या वर्षाचा विनाशकारी वर्ष म्हणून उल्लेख केला आहे. त्यांच्या लेस प्रोफेटीज या पुस्तकात लिहिले आहे की, 2025 मध्ये इंग्लंडमधील लोक मोठा गोंधळ पाहतील. इंग्लंडच्या किनाऱ्यावर क्रूर लढाया होतील. ही युद्धे इतकी क्रूर असतील की देशाच्या सीमेवर आणि देशाच्या आतही त्याची मोठी झळ लागणार आहे. शिवाय कोविड सारख्या साथीच्या आजाराचे पुनरागमन होण्याची भविष्यवाणीही त्यांनी केली आहे. 38 वर्षीय ब्राझिलियन एथोस सॅलोम, यांना जिवंत नोस्ट्राडेमस म्हणून ओळखले जाते. त्याने राणी एलिझाबेथच्या मृत्यूसह अनेक महत्त्वाच्या घटनांचे भाकित त्यांनी केले आहे. एथोस सॅलोम यांच्या मते, तिसरे महायुद्ध आपल्या दाराशी आहे. गेल्या कित्येक वर्षापासून पाहिला नाही, असा संघर्ष पुढच्या काही महिन्यात होणार आहे. फक्त मानवामध्येच युद्ध होणार नाही, तर विनाशकारी शस्त्रेही यात वापरण्यात येणार असल्याचे भाकित एथोस सॅलोम यांनी केले आहे. (International News)
===============
हे देखील वाचा : Kim Jong Un : किमची युद्धनौका फुस्स !
Trump And Musk : एकमेकांना शिव्या, शाप देऊ लागले !
===============
जगभर सध्या तिस-या युद्धाची भीती व्यक्त होत असतांना या चार भविष्यवाणीही गाजत आहेत. मात्र यासोबतच अशा काही घटना घडत आहेत, त्यामुळे अधिक थरकाप होत आहे. त्यातील एक घटना ऑस्ट्रेलियातील टास्मानियामधील स्ट्रहानजवळील समुद्रकिनाऱ्यावर घडली. येथे सुमारे तीन मीटर लांबीचा ओअरफिश नावाचा मासा आढळून आला. हा मासा अपशकुनी मानला जातो. हा दिसल्यावर भूकंप किंवा नैसर्गिक आपत्ती येणार असे मानले जाते. जपानमध्ये या माशाला धोक्याचा अग्रदूत म्हटले जाते. खोल समुद्रात मोठा भूकंप झाला तरच तो समुद्राच्या किना-यावर येतो, असे सांगितले जाते. अर्थात या चार भविष्यवाणी आणि हा ओअरफिश यांचा संबंध आता रशियावर युक्रेननं केलेल्या हल्ल्यावर लावण्यात येत आहे. या हल्ल्यात युक्रेनला इंग्लडनं सहाय्य केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या सर्वाचा परिणाम जागतिक युद्धात होऊ शकतो, असा कयास लावण्यात येत आहे. (Nicholas Aujula)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics