Home » आता १८० फूट खाली जाऊन बघता येणार नायगारा धबधब्याचे अप्रतिम सौंदर्य

आता १८० फूट खाली जाऊन बघता येणार नायगारा धबधब्याचे अप्रतिम सौंदर्य

by Team Gajawaja
0 comment
Niagara Tunnel Project
Share

कॅनडातील ओंटारियो आणि अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या सीमेवर पसरलेला नायगारा धबधबा बघण्यासाठी लाखो पर्यटक जातात. सर्व ऋतुंमध्ये या धबधब्याचे सौदर्य बघण्यासारखे असते. या धबधब्याच्या सौंदर्याला आता पर्यंटकांना अधिक जवळून बघता येणार आहे.  (Niagara Tunnel Project)

पर्यटकांसाठी या धबधब्याच्या परिसरात 2,200 फूट लांबीचा बोगदा तयार करण्यात आला आहे (Niagara Tunnel Project). बोगद्यात काचेच्या लिफ्टमधून 180 फूट खाली जाऊन नायगरा धबधबा आता बघता येणार आहे. या धबधब्याचे अतिविक्राळ रुप बघण्यासाठी आणि त्याचे तुषार अंगावर घेण्यासाठी पर्यटक आतूर असतात.  अशावेळी थेट पाण्याचा लोट जिथे पडतो, तिथेच उतरुन धबधब्याचे सौदर्य बघता येणार असल्यामुळे पर्यटक खूष झाले आहेत.  

नायगारा धबधबा हा जगातील सर्वात मोठा धबधबा आहे आणि त्याची उंची 167 फूट आहे.  जगातील सर्वात प्रसिद्ध धबधबा आता अधिक आकर्षक झाला आहे.  धबधबा पाहण्यासाठी नवीन बोगदा सुरू करण्यात आला असून त्याद्वारे पर्यटकांना धबधब्यात शिरता येणार आहे.  अगदी अनोखी वाटणारी ही संकल्पना स्मार्ट इंजिनिअरिंगचे प्रतिक ठरणार आहे.  

2,200 फूट लांबीच्या या बोगद्यातून पर्यटकांना नायगारा धबधब्याच्या व्ह्यूपॉईंटवर जाऊन या संपूर्ण धबधब्याचे सौंदर्य बघता येणार आहे.  पर्यटक हवा तेवढा वेळ धबधब्याच्या या नव्या ह्यूपॉईंटवर थांबू शकतील.  यासाठी काचेच्या लिफ्टची सुविधा उपलब्ध असेल. ही लिफ्ट नायगारा पार्क पॉवर स्टेशनच्या खाली म्हणजे तब्बल 180 फूट बोगद्यात घेऊन जाते.  कॅनडातील ओंटारियो आणि अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या सीमेवर पसरलेल्या या धबधब्याच्या सौदर्याचा लाभ अधिक पर्यटकांनी घ्यावा म्हणून येथे सतत प्रयत्न सुरु असतात. त्यातच पर्यटकांची ओघही भरपूर असतो. (Niagara Tunnel Project)

 या धबधब्यामुळे या संपूर्ण भागात पर्यटन व्यवसाय जोमात असतो. अमेरिका आणि कॅनडा राज्यांच्या सिमांवर हॉटेल व्यवसायही या धबधब्यामुळे बहरला आहे. याद्वारे रोज करोडो रुपयांची उलाढाल होत असते.  आता या नव्या बोगद्यामुळे त्यात अधिक भर पडणार आहे.  याशिवाय येथे  वाहणाऱ्या 3 धबधब्यांपैकी सर्वात मोठा म्हणजे हॉर्स शू फॉल्स, ज्याला कॅनेडियन फॉल्स असेही म्हणतात.  अमेरिकन फॉल्स आणि ब्राइडल वेल हे अन्य दोन धबधबे बघण्यासाठी पर्यटक बोटीने जाऊ शकतात.  ‘मेड ऑफ द मिस्ट’ असे या बोटीचे नाव आहे. 

नायगारा धबधबा जलविद्युत उर्जेचा एक मौल्यवान स्त्रोत आहे. त्याचेही आधुनिकीकरण करण्यात आले आहे. जलविद्युत उर्जेच्या उद्देशाने धबधब्याच्या वरच्या पाण्याच्या मोठा  स्त्रोत  वळवल्यामुळे धूप होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. अमेरिकन आणि कॅनडा सरकारच्या मध्यस्थीमधून या योजना राबवण्यात येत आहेत.  (Niagara Tunnel Project

=======

हे देखील वाचा – मान्सूनमध्ये ‘या’ ठिकाणी जाणे टाळा, अन्यथा तुमचेच होईल नुकसान

=======

आता नव्यानं झालेला 2200 फूटाचा बोगदा आणि 180 फूट खाली जाणारी काचेची लिफ्ट या योजना अत्यंत महत्त्वकांक्षी होत्या. या योजना प्रत्यक्षात आणणेही तेवढेच आव्हानात्मक होते. त्यामुळेच एक स्मार्ट इंजिनिअरिंगची योजना म्हणूनही याचा उल्लेख होतोय.  यावर लवकरच एक लघूचित्रफित येणार आहे. (Niagara Tunnel Project)

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.