अमेरिकेमध्ये कॉस्मेटिक कंपन्यांच्या उत्पादनावर लगाम आणण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आला आहे. येथील अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एफडिए विभागानं यासंदर्भात एक प्रस्ताव ठेवला होता, आणि त्याला मंजूरी मिळाली आहे. टॅल्क आणि टॅल्कयुक्त पदार्थांपासून कॅन्सर होण्याची भीती असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. गेल्या काही वर्षापासून अमेरिकेत बेबी पावडरच्या वापरामुळे गर्भाशयाच्या कर्करोग वाढल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. याबाबत प्रसिद्ध कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन विरुद्धही काही महिलांनी खटला दाखल केला होता. त्यामुळे कॉस्मेटिक कंपन्यातील तयार होणा-या उत्पादनावर अंकुश ठेवण्यासाठी काही नियमावली आवश्यक असल्याची मागणी होत होती. (America)
आता यासंदर्भात अमेरिकेनं प्रथम पाऊल टकले आहे. मात्र जगभरात अशा अनेक कॉस्मेटिक कंपन्या आहेत, ज्या स्वतःच्या फायद्यासाठी ग्राहकांच्या आरोग्याला घातक ठरत आहेत. बहुतांश कॉस्मेटिक उत्पादनांचा वापर महिला किंवा लहान मुलांकडून करण्यात येतो. शरीराच्या त्वचेवर लावण्यात येणा-या या उत्पादनच्या माध्यामातून घातक केमिकल शरीरात जातात, आणि त्यातून अनेक रोगांचाही शिरकाव होतो. यासाठीच कॉस्मेटिक कंपन्यांना अटकाव होईल असे नियम सर्व देशात असावे अशीही मागणी सोशल मिडियाच्या माध्यमातून होत आहे. याशिवाय या मान्यताप्राप्त कंपनीच्या कॉस्मेटिक उत्पादनांची ठराविक काळानंतर तपासणी करण्यात यावी, अशीही मागणी आहे. (International News)
अमेरिकेतील कॉस्मेटिक कंपन्यांसाठी नवा नियम लागू करण्यात आला आहे. यापासून जगभरातील महिलांनही अशाच प्रकारचे नियम सर्वत्र लागू करावे अशी मागणी होत आहे. गेल्या काही वर्षापासून महिलांमधील कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. दरवर्षी जगभरातील सुमारे 2.1 दशलक्ष महिला स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त होतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, हा महिलांमध्ये सर्वात सामान्य कर्करोग आहे. यासर्वात महिला वापरत असलेल्या सौंदर्य साधनांचाही हातभार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं कॉस्मेटिक कंपन्यांवर नियंत्रण आणण्याचे काम हाती घेतले आहे. (America)
एफडीएने टॅल्क आणि टॅल्क-युक्त कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये एस्बेस्टोस शोधण्यासाठी नवीन चाचणी तंत्र आवश्यक केले आहे. टॅल्क आणि टॅल्कयुक्त पदार्थांपासून कॅन्सर होण्याची भीती असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. यासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनानं प्रस्तावित केलेल्या नवीन नियमानुसार, टॅल्क असलेली कोणतीही उत्पादने एस्बेस्टोसपासून मुक्त आहेत याची खात्री करण्यासाठी कंपन्यांना काळजी घ्यावी लागणार आहे. याबाबत आवश्यक चाचण्या करुन त्याची माहिती संबंधित ग्राहकांना देणे बंधनकारक राहणार आहे. या सर्वात बेबी पावडर बनणा-या कंपन्याही असून त्यांच्या प्रत्येक उत्पादनावर यासंदर्भात माहिती गरजेची करण्यात आली आहे. कारण जॉन्सन अँड जॉन्सन आणि अन्य काही कंपन्यांविरुद्ध महिलांनी खटले दाखल केले आहेत. या कंपन्यांची उत्पादने वापरल्यानं कॅन्सर हा रोग झाल्याचे या महिलांचे म्हणणे आहे. (International News)
अमेरिकेच्या न्यायालयात अशाप्रकारे दाद मागणा-या महिलांची संख्या वाढल्यानं येथील प्रशासनानं कॉस्मेटिक कंपन्यांनाच नवीन कायद्याच्या बंधनात अडकवलं आहे. आता आवश्यकता भासल्यास अन्न आणि औषध प्रशासन संबंधिक कंपनीचे कुठलेही उत्पादन परत मागवू शकणार आहे. तसेच कॉस्मेटिक उत्पादनांनी प्रत्येक सुगंधी ऍलर्जीची माहितीही द्यावी लागणार आहे. याशिवाय मेकअप, शॅम्पू, नेलपॉलिश यांसारख्या सौंदर्य उत्पादनांची विक्री करतांना कंपनीनं ज्या ठिकाणी ही उत्पादने तयार होत आहेत, त्या ठिकाणाची माहिती, तेथील संपूर्ण पत्ता देणे गरजेचे आहे. यासर्वात महत्त्वाचे म्हणजे, कॉस्मेटिक उत्पादन तयार करतांना त्यात जे घटक वापरण्यात आले आहेत, त्यांची सविस्तर माहितीही देणे बंधनकारक राहणार आहे. (America)
=======
हे देखील वाचा : America : ट्रम्पना हवा आहे बर्फाचा देश !
Salman Rushdie : पुन्हा ‘सॅटनिक व्हर्सेस’ चे वादळ !
=======
अमेरिकेत अशापद्धतीनं कॉस्मेटिक कंपन्यांवर अंकुश ठेवण्यासाठी नियम केला आहे. पण असेच नियम जगभरातील कंपन्यांवर लागू करावेत अशी मागणी महिलांमार्फत कऱण्यात येत आहेत. कारण कॉस्मेटिक उत्पादने जगभरातील देशांमध्ये बदलली जातात. कंपनी एकच असली तरी तेथील हवामानानुसार त्यातील घटकांमध्ये फरक होतो. पण हा घटकांमधील फरक गुणवत्तेतही होत असल्याची कायम ओरड होते. हाच धोक टाळण्यासाठी जगभरातील कॉस्मेटिक कंपन्यांना एकाच नियमाखाली आणावे अशी मागणी होत आहे. युरोप आणि अमेरिकेमध्ये ज्या दर्जाची उत्पादने मिळतात, त्या दर्जाची उत्पादने आशिया आणि अफ्रिकेत मिळत नाहीत. त्यातील घटक हे आरोग्यास अपायकारक ठरतील असे माहित असतांनाही त्याचा वापर होतो. आता अशाच विषमतेबाबत आवाज उठवण्यात येत आहे. (International News)
सई बने