Home » नवविवाहित कपल्सने ‘अशा’ पद्धतीने करा महिन्याभराचे आर्थिक प्लॅनिंग

नवविवाहित कपल्सने ‘अशा’ पद्धतीने करा महिन्याभराचे आर्थिक प्लॅनिंग

by Team Gajawaja
0 comment
Financial Planning Tips
Share

लग्न हे आयुष्यातील सर्वाधिक मोठा निर्णय असतो. कारण आपल्यावर नव्या जबाबदाऱ्या येतात आणि त्याचसोबत आपण एका नव्या आयुष्याला सुद्धा सुरुवात करतो. खरंतर लग्नानंतर सुरुवातीला काही समस्या येऊ शकतात. त्या कोणत्याही असो, आर्थिक किंवा घरातील कोणत्याही कारणासंबंधित असो. तेव्हा आपण कशा पद्धतीने त्या हाताळतो हे फार महत्वाचे असते. परंतु आर्थिक गोष्टींसंदर्भात काही समस्या उद्भवतात तेव्हा आपण त्यासाठी आपल्याकडे पुरेशी सेव्हिंग्स किंवा पैसे आहेत का याचाच विचार आधी मनात येतो. तसे नसेल तर आपल्याला दिवस रात्र झोप लागत नाही. त्यामुळे नवविवाहित कपल्सने कशा पद्धतीने आपल्या महिन्याभराचे आर्थिक प्लॅनिंग (Financial Planning Tips) केले पाहिजे याबद्दलच्या पुढील काही टीप्स तुमच्या नक्कीच फायद्याच्या ठरतील.

-प्री-प्लॅनिंग करा
कपडे, दागिने किंवा लग्नातत करण्यात आलेल्या डेकोरेशन संदर्भात झालेला खर्च बाजूला ठेवत जर तुमचे हनीमून, घराचे सेटअप, घराचे इंटिरियर किंवा महिन्याभराचा खर्च कसा करायचा असा प्रश्न उभा राहतोच ना? यासाठीच तुम्ही आपले महिन्याभराचे आर्थिक प्लॅनिंग आधीच केले पाहिजे. कारण महिन्याभरात एकूण खर्च किती होईस किंवा किती पैशांची सेव्हिंग्स करायची हे तुम्हाला कळेल. महिन्याभराचे एक बजेट ठरवा आणि त्यानुसारच काही खर्च करण्यावर भर द्या.

-एकाच दिवसात खुप खर्च करणे टाळा
नव्याचे नऊ दिवस अशी आपल्याकडे जशी म्हण आहे ना ती नवविवाहित कपल्सला अगदी ती लागू पडते. कारण सुरुवातीचे दिवस आपण खुप आनंदात घालवतो तेव्हा पैसे कसे आणि कुठे खर्च करतोय याचा विचार करत नाही. मात्र जेव्हा काही दिवसांनी आपले जसे खर्च वाढतात तेव्हा अधिकच टेंन्शन यायला लागतो. आपले पुढचे खर्च कसे करायचे आणि त्यासाठी आपली सेव्हिंग्स वापरायची का असे विविध प्रश्न पडू लागतात. त्यामुळे एकाच दिवसात खुप खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा.(Financial Planning Tips)

हे देखील वाचा- स्वतःच्याच करोडोंच्या मालमत्तेची माहिती महिलेला नव्हती; घर विकणार होती, तेव्हाच सापडला दडलेला खजिना

Financial Planning Tips
Financial Planning Tips

-EMI वर पूर्णपणे निर्भर राहू नका
ईएमआयला सध्या एक सोप्पा पर्याय म्हणून पाहिले जाते. काही बँका ते ज्या ठिकाणी तुम्ही काम करता ते सुद्धा तुम्हाला आता ईएमआयची सुविधा देतात. महागड्या वस्तू घेऊन त्या वेळी कामचलाऊपण कराल पण जेव्हा तुम्हाला प्रोसेसिंग फी आणि महिन्याभराच्या इंटरेस्टचा रेट पहाल जसे हिडन कॉस्ट पाहून घाबराल. दरम्यान, ईएमआयचा जरी ऑप्शन तुम्ही निवडलात तरीही तुमचे तुमच्या खर्चावर नियंत्रण असले पाहिजे.

-बचत करण्याची सवय लावा
नेहमीच पाहिले जाते की, लग्नानंतर कपल्स लगेच टेंन्शन फ्री होतात. लग्नात मिळालेल्या गिफ्टसह आहेरात मिळालेले पैसे सुद्धा आपल्या हवे तसे खर्च करण्याचा विचार करतात. मात्र तेव्हा जर तुम्ही भरपूर खर्च केलात तर तुमचे पैसे कधी संपतील हे तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे महिन्याभराचा खर्चाचा जरी बजेट ठरवत असाल तरीही तुम्ही स्वत: बचतीची सवय लावून घ्या.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.