Newborn Baby Care in Winter : हिवाळ्यात त्वचा कोरडी, निस्तेज होते. अशातच नवजात बालकांची हिवाळ्यात अधिक काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. खरंतर नवजात बालकांची त्वचा नाजूक, संवेदनशील आणि मऊ शकते. अशातच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे थोडे मुश्किल होते, कारण त्यांच्या काळजीत जरा देखील चूक झाल्यास ते आजारी पडू शकतात.
हिवाळ्यात हानिकारक बॅक्टेरिया आणि व्हायरस वेगाने वाढतात. अशातच नवजात बालकांच्या आरोग्यावर याचा परिणाम पटकन होऊ शकतो. खरंतर नवजात बालकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते. अशातच त्यांची हिवाळ्यात अधिक काळजी कशी घ्यावी याबद्दलच्याक काही टिप्स जाणून घेऊया…..
-हिवाळ्यात तुमच्या मुलाचे आरोग्य हेल्दी राहण्यासाठी त्याच्या शरीराचे तापमान योग्य आहे की नाही याकडे लक्ष द्या. नवजात बालकांना हिवाळ्यात हाइपोथर्मिया होण्याचा धोका अधिक असतो. यामध्ये शरिराचे तापमान कमी होते. अशातच तुम्ही मुलांना उबदार कपडे घालावेत.
-हिवाळ्यात अधिक गारवा वाढला जात असल्याने मुलाला दररोज आंघोळ घालू नका. पण तुम्ही मुलाचे अंग कोमट पाण्याने पुसून काढू शकता. याशिवाय बाळापर्यंत बॅक्टेरिया पोहोचणार नाहीत याचीही काळजी घ्या.
-हिवाळ्यात मुलांची त्वचा अधिक कोरडी होते. अशातच त्यांच्या अंगावर लाल डाग, खाज येणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे लहान मुलांना दररोज स्किन केअर लोशन किंवा मॉइश्चराइजर लावा. जेणेकरुन त्यांची त्वचा सॉफ्ट आणि हेल्दी राहिल. (Newborn Baby Care in Winter)
-हिवाळ्यात नवजात बालकाला दररोज आंघोळ घालत नसाल तर त्याच्या स्वच्छतेकडे जरुर लक्षात ठेवा. मुलाला मसाज केल्यानंतरही त्याचे अंग व्यवस्थितीत पुसून घ्या. लक्षात ठेवा, हिवाळ्यात दररोज बाळाला मसाज करा, जेणेकरुन त्याचे शरीर गरम राहिल, ब्लड सर्कुलेशन वाढेल आणि स्नायूही मजबूत होतील.
-बाळ हेल्दी राहावे असे वाटत असल्यास त्याला ब्रेस्टफीड करणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरुन त्याची शरीराचा व्यवस्थितीत विकास होण्यास मदत होईल. याशिवाय मुलं हिवाळ्यात आजारी पडण्यापासून दूर राहिल.
(टीप : या लेखातील माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)