Home » New Year : 2025 होरपळून काढणार !

New Year : 2025 होरपळून काढणार !

by Team Gajawaja
0 comment
New Year
Share

नववर्ष कसं जाणार याची उत्सुकता सर्वानाच असते. अनेक ज्योतिषी या नव्या वर्षाची भविष्यवाणी करतात. राजकीय, आर्थिक, सामाजिक दृष्टीकोनातून नवीन वर्ष कसे जाणार हे सांगितले जाते, मात्र हवामानाच्या दृष्टीने नवीन वर्ष कसे असेल हे पहायला आपण विसरतो. पण मंडळी, हे नवं वर्ष, म्हणजे, 2025 मध्ये हवामान कसे असले याचीही भविष्यवाणी झाली आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या मनात धास्ती निर्माण होणार आहे. कारण 2025 हे आत्तापर्यंतचे सर्वात जास्त उष्ण वर्ष असणार आहे. संपूर्ण जगभर सूर्याचा प्रकोप जाणवणार असून या वर्षात मोठा हवामान बदल होणार आहे. त्यामुळे या वाढलेल्या उष्णतेचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होणार असल्याची भविष्यवाणी हवामानतज्ञांनी केली आहे. (New Year)

नववर्ष सुरु झालं आहे. त्याच्या आगमनाचा पहिला जल्लोष न्युझिलंडमध्ये जोरदार साजरा झाला. या नव्या वर्षाच्या स्वागताचा हा आनंद सर्वत्र साजरा होत असतांना संयुक्त राष्ट्राने एक चिंता व्यक्त केली आहे. ती म्हणजे, या नव्या वर्षात सर्वत्रच कडक उन्हाळा जाणवणार आहे. या कडक उन्हाचा फटका ग्लेशिअर आणि हिमशिखरांनाही बसणार आहे. त्यामुळे वेळीच सावधानता बाळगण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या अमेरिका, युरोपसह संपूर्ण उत्तर भारतात थंडीने कहर केला आहे. मात्र ही थंडी फार थोड्याच दिवसाची पाहुणी असल्याची माहिती जागतिक हवामान खात्याने दिली आहे. जागतिक हवामान खात्यानं याबाबत एक इशारा दिला आहे, त्यानुसार 2025 हे वर्ष विक्रमी तापमानाचे वर्ष म्हणून कायम ओळखले जाणार आहे. (Marathi News)

हरितगृह वायूची पातळी विक्रमी उच्च पातळीवर पोहोचल्यामुळे जगभर उष्णता जाणवणार आहे. यासोबत संयुक्त राष्ट्रानंही याबाबत सावधतेचा इशारा दिला आहे. 2025 मध्ये तीव्र उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. फारकाय, ही उष्णता किती वाढेल, याचीही शाश्वती नसल्याचे संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी सांगितले आहे. गेल्या अनेक वर्षांचा उष्णतेचा विक्रम या नव्या 2025 वर्षात तोडला जाणार आहे. 2024 मध्ये अनेक देशात विषम हवामानाचा फटका बसला आहे. अनेक देशांना पूर आणि वादळाचा सामना करावा लागला. काही देशात अचानक आलेल्या पावसानं हाहाकार केला. ज्या देशात कधीही फारसा पाऊस आणि बर्फ पडतच नाही, त्या देशांनी या 2024 मध्ये वादळी पाऊस आणि बर्फवृष्टीचा सामना केला. (New Year)

सौदी अरेबिया आणि दुबई सारख्या देशांनी या हवामान बदलाचा फटका सहन केला असला तरी ज्या देशातील बर्फ कधी वितळत नाही, अशा देशांमधील हिमनद्याही वितळण्यास सुरुवात झाली आहे. हे सर्व हवामानबदलाचे संकेत असून आता या नव्या वर्षात सर्वच देशांना यापेक्षाही हवामानाचा अधिक फटका बसणार आहे. कारण हे वर्ष हे उष्ण वर्ष ठरणार आहे. यामुळे हिमनद्या मोठ्या प्रमाणात वितळणार असून समुद्रकाठावर असलेल्या देशांना यामुळे मोठा धोका निर्माण होणार आहे. संयुक्त राष्ट्रानं यासंदर्भात चिंता व्यक्त केली असून या नव्या वर्षात वाढलेल्या तापमानानं काय होईल, हे सांगता येणार नाही, पण मानवाला मोठ्या युद्धाला तयार व्हावे लागेल, अशा शब्दात चिंता व्यक्त केली आहे. तसंच या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आता आपल्याकडे वेळच उरला नसल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक हवामान संघटनेनंही असाच इशारा देत आपली पृथ्वी सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक माणसानं प्रयत्न करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. (Marathi News)

====================

हे देखील वाचा : 

America : ट्रम्पना हवा आहे बर्फाचा देश !

Uttar Pradesh : महाकुंभमध्ये 12 ज्योतिलिंग !

====================

2025 हे हवामानासाठी रेड डिग्रीचे वर्ष असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. या नव्या वर्षात अनेक देशांमध्ये तापमानाचा पारा हा 50 अंशांच्या पुढे जाणार असल्याची भीतीही जागतिक हवामान संघटनेनं व्यक्त केली आहे. जागतिक हवामान संघटना हिमनद्यांवर विशेष लक्ष ठेवून आहे. तसेच ग्लेशियर्सच्या संरक्षणासाठी काम करीत आहे. हे ग्लेशिअर वितळण्याचे प्रमाण 2025 मध्ये वाढणार असून त्यामुळे समुद्रकाठच्या शहरांना धोका असल्याची इशाराही संघटनेनं दिला आहे. ऐन उन्हाळ्यात उष्णतेचा असा कहर होईल की लोकांना तो सहन करणे कठीण होणार आहे. 2024 मध्येही अनेक देशांना उष्णतेचा सामना करावा लागला आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये उष्णतेची लाट आली. मात्र त्यापेक्षा अधिक उष्णता या नव्या वर्षात येणार असून त्यामुळे उष्णतेच्या विकारांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (New Year)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.