Home » जगातील ‘या’ देशांत विचित्र पद्धतीने New Year सेलिब्रेशन करतात

जगातील ‘या’ देशांत विचित्र पद्धतीने New Year सेलिब्रेशन करतात

by Team Gajawaja
0 comment
New Year Celebration
Share

नवं वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. अशातच लोक नवं वर्षाच स्वागत करण्यासाठी आतापासूनच तयारी करत आहेत. जगभरात नवं वर्षाचे स्वागत करण्यासाठी विविध कार्यक्रम, पार्ट्यांचे आयोजन केले जाते आणि त्याचे अगदी आनंदाने स्वागत करतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का, जगभरातील काही देशांमध्ये अगदी विचित्र पद्धतीने नवं वर्षाचे सेलिब्रेशन केले जाते. तर जाणून घेऊयात संपूर्ण जगात कशाप्रकारे नव्या वर्षाचे सेलिब्रेशन केले जाते त्याबद्दलच अधिक. (New Year Celebration)

ब्राजील
ब्राजील मध्ये नव्या वर्षाचे सेलिब्रेशन अनोख्या पद्धतीने केले जाते. येथील लोकांचे असे मानणे आहे की, न्यू ईयरच्या दिवशी स्पेशल अंडरवेयर घातली जाते. जेणेकरुन येणाऱ्या काळात नशीबात उत्तम गोष्टी घडतील. या दरम्यान, लाल रंग घातला जातो. असे मानले जाते की, लाल रंगाची अंडरवेयर घातल्याने प्रेम व्यक्त करण्याची भावना दिसते. तर पिवळ्या रंगाची असेल तर ती पैशांसंदर्भातील आहे.

ग्रीस
ग्रीसमध्य कांद्याचा गुच्छा दरवाज्याबाहेर लावलेला दिसणे सामान्य बाब आहे. असे मानले जाते की, ते संपूर्ण वर्षभर सौभाग्य घेऊन येते. कांद्याची मुळं वाढल्यास जीवनात वृद्धि येते.

New Year Celebration
New Year Celebration

तुर्की
रात्रीचे १२ वाजतात तेव्हा तुर्कीतील लोक आपल्या दरवाज्यावर मीठ टाकतात. कारण असे केल्यास घरात संपूर्ण वर्षभर समृद्धि आणि शांति येते.

स्पेन
स्पेनमध्ये नव्या वर्षाच्या मध्यरात्री १२ वाजता द्राक्ष खाण्याची परंपरा आहे. येथे प्रत्येक द्राक्षाचा असा अर्थ होते की, येणारे काही महिने हे गुड लक असतील. तर मॅड्रिड, बार्सेलोनासह काही मोठ्या शहरात लोक स्कायरवर एकत्रित येतात आणि एकत्रित द्राक्ष खातात.

डेन्मार्क
डेन्मार्कमध्ये शेजारील मित्र आणि परिवार दरवाज्यावर जुनी प्लेट आणि काचा फेकून नव्या वर्षाचे स्वागत करत शुभेच्छा देतात. येथे असे मानले जाते की, दरवाज्यावर जेवढे तुटलेली भांडी जमा होती तेवढेच तुमचे पुढील वर्ष उत्तम असेल. लोक मध्यरात्री खुर्चीवर उभे राहून त्यावर उड्या ही मारतात. त्यामुळे आयुष्यात गुड लक येते असे मानले जाते. (New Year Celebration)

हे देखील वाचा- जगातील ‘या’ देशांमध्ये राहतात सर्वाधिक भारतीय

कोलंबिया
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी कोलंबियात अगदी वेगळे सेलिब्रेशन केले जाते. या परंपरेला अगुएरो असे म्हटले जाते. या अंतर्गत परिवारातील प्रत्येक घरातील व्यक्तीच्या बेड खाली तीन बटाटे ठेवले जातात. एफ्ला म्हणजे सोललेला बटाटा, दुसरा म्हणजे न सोललेला बटाटा आणि तिसरा म्हणजे अर्धवट सोललेला बटाटा. रात्रीच्या वेळी प्रत्येक व्यक्ती डोळे बंद करुन बटाटा काढतात. ज्याच्या हाती बटाटा लागतो त्यावरुन कळते की व्यक्तीचे येणारे आयुष्य नशीब घेऊन येणार आहे की आर्थिक संघर्ष किंवा दोन्ही गोष्टी सुद्धा होऊ शकतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.