Home » RBI कडून बँक लॉकरच्या नियमांत बदल

RBI कडून बँक लॉकरच्या नियमांत बदल

by Team Gajawaja
0 comment
New Rules for bank locker
Share

भारतीय रिजर्व बँकेने ग्राहकांच्या सुरक्षा आणि सुविधेकडे लक्ष देत बँक लॉकर संदर्भातील नियमात बदल केला आहे. आरबीआयच्या नोटीफिकेशननुसार, हे नियम नव्या वर्षाच्या सुरुवाती पासूनच लागू झाले आहेत. अशातच तुम्हाला एखाद्या बँकेत लॉकर घेण्याचा विचार करत असाल तर त्या बद्दलच्या एग्रीमेंट संदर्भात जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. (Bank locker new rules)

आरबीआयने सर्व बँक ग्राहकांना लॉकर एग्रीमेंट्स रीन्यू करण्याचे आदेश दिले आहेत. ते रीन्यू करण्याची अखेरची तारीख ३१ डिसेंबर २०२२ होती पण अद्याप ही प्रक्रिया सुरु आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, ग्राहकांना नवे लॉकर एग्रीमेंट बनवावे लागणार आहे. या बद्दल बँकेकडून ग्राहकांना रजिस्टर मोबाईलवर एसएमएस पाठवला जात आहे. या व्यतिरिक्त फोन करुन ही सुचना देत आहे.

आरबीआयने कोणते नियम बदलले?
आरबीआयने सर्वात प्रथम मोठा बदल एग्रीमेंट संदर्भात केला आहे. त्यांनी असे म्हटले की, लॉकरमध्ये ग्राहक जे काही सामान लॉकर मध्ये ठेवतो त्याची माहिती बँकेला देत नाही. मात्र आता नव्या नियमानुसार असे होणार नाही. ग्राहकाला लॉकरमध्ये ठेवण्यात आलेल्या सामानाची लिस्ट बँकेला द्यावी लागणार आहे. दरम्यान, ही माहिती ग्राहकाच्या कागदपत्रांसह गोपनिय ठेवली जाणार आहे. खरंतर बँकेत एखादी घटना घडल्यास अधिक नुकसान भरपाईसाठी ग्राहक आपल्या लॉकरमध्ये अधिक सामान असल्याचे सांगतो. अशातच बँकेला फार मोठे नुकसान होते.

कशा पद्धतीने कराल लॉकरसाठी एग्रीमेंट?
लॉकर एग्रीमेंट अंतर्गत बँक ग्राहकांला एक करार करावा लागतो. दोन्ही पक्षांद्वारे हस्ताक्षर केल्यानंतर लॉकर एग्रीमेंटची एक कॉपी ग्राहकाला दिली जातो. तर एक बँकेकडे असते. या एग्रीमेंटमध्ये अधिकार आणि जबाबदाऱ्यांबद्दल सांगितले जाते. त्याचसोबत ग्राहकाला असा ही सल्ला दिला जातो की, कमीत कमी एकदा तरी लॉकरचा वापर करावा. (Bank locker new rules)

हे देखील वाचा- TAN Card म्हणजे काय? पॅन कार्डपेक्षा किती वेगळे आहे जाणून घ्या

बँक लॉकर संबंधित अन्य नियम
-कोणत्याही ग्राहकाला नुकसान होण्याच्या स्थितीत बँक नियमांनुसार माघार घेऊ शकत नाही. त्याला नुकसान भरपाई द्यावीच लागते. आग लागली, इमारत पडली किंवा तिजोरीतील सामान चोरी झाल्यास बँकेला १०० टक्के नुकसान भरपाई ग्राहकाला द्यावी लागते.
-बँकेला हे सुनिश्चित करावे लागते की, त्याच्या द्वारे केलेल्या लॉकर एग्रीमेंटमध्ये कोणत्याही अनुचित अटीचा समावेश नाही ज्यामुळे ग्राहकाला नुकसान होण्याच्या स्थितीत अटींचा हवाला देत बँक अगदी सहज बाजूला करु शकतो.
-आरबीआयच्या नव्या नियमानुसार सर्व बँकांना रिकाम्या असलेल्या लॉकरची लिस्ट आणि वेटिंग लिस्ट दाखवावी लागणार आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.