देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मे २०२३ रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले. त्यावेळी सर्व देशवासीयंचे लक्ष या नव्या संसद भवनावर लागून होते. अशातच आता जुन्या संसद भवनाऐवजी लोकशाही संबंधित सर्व निर्णय हे आता नव्या आणि भव्य अशा संसद भवनात केले जाणार आहेत. नव्या संसद भवनाच्या निर्मितीवेळी वास्तुशस्राचा अभ्यास करुनच ते उभारले गेलेय. ऐवढेच नव्हे तर नवे संसद भवन हे जुन्या संसद भवनासारखे गोलाकर नव्हे तर त्रिभुजाकार बनवण्यामागे काही धार्मिक कारणं सुद्धा आहेत. (New parliament and vastu)
खरंतर याचे वैदिक संस्कृति आणि तंत्रशास्राशी सखोल नाते आहे. तर पाहूयात संसद भवन त्रिभुजाकार नक्की का बनवले गेले आणि त्याच सोबत याच्या धार्मिक महत्वाबद्दल अधिक.
नव्या संसद भवनात आधुनिक सोईसुविधा आहेत. यामध्ये जुन्या संसद भवनापेक्षा विधायकांसाठी मोठे कक्ष असणार असून लोकसभेत राष्ट्रीय पक्षी मोर याच्या आकृतीवर बनवलेल्या ८८८ सीट्सची व्यवस्था केली गेलीय. तर राज्यसभेत ३४८ जागांसाठी राष्ट्रीय फूल कमळाची आकृति तयार केली गेलीय.
मीडिया रिपोर्ट्स आणि नव्या संसद भवनाची वास्तुकलेची निर्मिती करणारे बिमल पटेल यांच्या मते नवे संसद भवन त्रिकोण आकारात डिझाइन केले गेले आहे. असा आकार करण्यामागील संबंध हा वैदिक संस्कृती आणि तंत्रशास्र आहे. त्रिकोणीय भुखंडावर स्थित नवे संसद भवनाचे तीन प्रमुख भाग- लोकसभा, राज्यसभा आणि एक सेंट्रल लाउंज. तर त्रिकोण आकार हा देशातील विविध धर्म आणि सांस्कृतीतील पवित्र भुमितीचे प्रतीक आहे.

वास्तुकार बिमल पटेल यांच्या मते, याचे धार्मिक महत्व सुद्धा आहे. खरंतर याच्या त्रिकोण आकारामध्ये सर्व प्रकारचे धार्मिक समायोजन सुद्धा आहे. ऐवढेच नव्हे तर काही पवित्र धर्मात त्रिभुज आकाराचे महत्व आहे. श्रीयंत सुद्धा त्रिभुजाकार असून तीन देवता किंवा त्रिदेव म्हणजेच ब्रम्ह, विष्णू आणि महेश यांचे त्रिभुज असे प्रतीक आहे. अशातच त्रिभूज आकाराचे नवे संसद भवन अत्यंत पवित्र आणि शुभ आहे. (New parliament and vastu)
हेही वाचा- ‘या’ मंदिराच्या आकारात आहे नवे संसद भवन…
दरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या कम्युनिस्ट पार्टीचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने भारताच्या नव्या संसद भवनावरुन पीएम मोदी यांचे कौतुक केले आहे. त्यात असे म्हटले गेले की. भारत वसाहती काळातील सर्व निशाण मिटवत आहे. वृत्तपत्राने आपल्या एका संपादकीय लेखात असे म्हटले की, चीनला भारताची प्रतिष्ठा राखायची असून आपले स्वातंत्र्य कायम ठेवण्याची इच्छा ठेवतो. तसेच भारताने विकास करावा असे ही त्यांना वाटते. तर नव्या संसद भवनाला मोदी सरकारच्या सेंट्रल विस्टा प्रोजेक्टचा मुख्य हिस्सा मानला जात आहे. याचा उद्देश भारताच्या राजधानीला गुलामगिरीच्या निशाण्यांपासून मुक्त करणे आहे.