सौदी अरब मधील रियाद शहरातील एक रि-डेवलपमेंट प्रोजेक्ट सुरु आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत मुरब्बा नावाचे एक नवे शहर उभारण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. याच दरम्यान, शहरात एक मोठी चौकोनाकृती इमारत बांधली जाणार आहे, जी संपूर्ण शहराच्या केंद्राप्रमाणे दिसून येणार आहे. याच्याच डिझाइनवर आता मुस्लिमांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियत या समुदायातील लोक असे लिहित आहेत की, नवा काबा तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण याला कधीच मान्यता दिली जाणार नाही. (New Murabba City)
सौदी अरबचे प्रिंस मोहम्मद बिन सलमान इस्लामिक संघटनांच्या निशाण्यावर आहेत. लोकांना पवित्र असलेल्या काबा प्रमाणे कलाकृती नकोय. सोशल मीडियात लोक याबद्दल संताप व्यक्त करत आहेत. ही एक महत्वाकांक्षी योजना धोक्यात येण्याची शक्यता आहे. सौदी अरब जगाचे लक्ष आपल्याकडे वळवून घेण्यासाठी हे शहर पर्यटनाचे केंद्र बनवू पाहत आहे. याच प्रोजेक्टचे काही फोटो ही समोर आले आणि त्यानंतर लोकांकडून त्यावर नाराजी व्यक्त केली गेली.
इस्लामिक संघटना नाराज
इस्लामिक संघटना या निर्णयाबद्दल खुप नाराज आहेत. मुकाब किंवा क्युब सारख्या कलाकृतीवरुन खुप वाद सुरु झाले आहे. पवित्र मक्का शहरासा इस्लामामधील सर्वाधिक पाकीजा शहर मानले जाते. तेथेच काबा आहे. या नव्या कलाकृतीचा आकार ही काबा प्रमाणे आहे. यामुळेच जोरदार वाद सुरु झाले आहेत.
निशाण्यावर क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान
क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमानने न्यू मुरब्बा डेवलपमेंट कंपनीच्या लॉन्चिंगची घोषणा केली आहे. या प्रोजेक्टचा उद्देश असा आहे की, रियाद मध्ये जगातील सर्वाधिक मोठे आधुनिक शहर उभारणे. या प्रोजेक्टअंतर्गत रियादच्या ऐतिहासिक अल-मुरब्बा द स्क्वायरला बनवले जाणार आहे.
याची संरचना ही चौकोनाकृती असणार आहे. काबा प्रमाणेच दिसणारी याची कलाकृती असल्याने लोक त्याच्या विरोधात आहेत. किंग अदुलअजीजने जुन्या रियाद शहरातील प्रसिद्ध इमारत मुरब्बा पॅलेसला लँन्डमार्क प्रमाणे वापरले जात आहे. या स्ट्रक्चरमध्ये एक मोठी जागा असणार आहे. कलाकृतीवरुन हे शहर अत्यंत सुंदर असल्याचे बोलले जात आहे.(New Murabba City)
अरबच्या न्यूजच्या एका रिपोर्टनुसार, न्यू मुरब्बा मध्ये एक संग्रहाल., टेक्निकल आणि डिझाइन युनिव्हर्सिटी असणार आहे. येथे विविध प्रकारचे थिएटर आणि दुसरे मनोरंजनात्मक प्रोजेक्ट असणार आहेत. येथे काही सांस्कृतिक स्थल सुद्धा असणार आहेत.
हे देखील वाचा- सौदी अरेबियातील पहिली अंतराळवीर रेयाना बरनावी कोण आहे?
बरपा प्रोजेक्टवरुन वाद का?
न्यू मुरब्बाची वादग्रस्त इमारत खास असणार आहे. ती ४०० मीटर उंच, ४०० मीटर रुंग आणि ४०० मीटर लांबीची असणार आहे. याची कलाकृती चौकोनाकृती असणार आहे. या आकाराची इमारत सत्तारुढ अल-सऊद राजवंशाच्या नज्दी स्थापत्य शैली प्रमाणे असणार आहे. मुकाब न्युयॉर्क मधील एम्पायर स्टेट इमारतीच्या आकाराची २० इमारती ऐवढी विशाल असणार आहे. याच्या मध्यभागी एक मोठे सर्पिल टॉवर असणार आहे. परंतु काबा प्रमाणे दिसत असल्यानेच मुस्लिम नाराज झाले आहेत. यामुळेच वाद निर्माण झाला आहे.