Home » २०१९ रोजी कशा प्रकारे टळले भारत-पाकिस्तान परमाणु युद्ध? अखेरच्या त्या क्षाणाची कथा

२०१९ रोजी कशा प्रकारे टळले भारत-पाकिस्तान परमाणु युद्ध? अखेरच्या त्या क्षाणाची कथा

by Team Gajawaja
0 comment
Never Give an Inch
Share

जेव्हा मला कळले की, पाकिस्तान भारतावर परमाणू हल्ल्याच्या तयारी करत आहे तेव्हा मी लगेच उठलो आणि सुषमा स्वराज यांच्यासोबत बोललो. मीच त्यांना बालाकोट एअरस्ट्राइकचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान भारतावर हल्ला करणार असल्याचे सांगितले होते. २७-२८ फेब्रुवारीला अमेरिका-उत्तर कोरिया शिखर संम्मेलनासाठी आम्ही हनोईत होतो. त्यांच्या टीमने या संकटाला टाळण्यासाठी नवी दिल्ली आणि इस्लमाबाद अशा दोघांसोबत मिळून रात्रभर काम केले. अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांच्या नव्या पुस्तकात हे दावे करण्यात आले आहेत. ‘नेवर गिव एन इंच: फाइटिंग फॉर द अमेरिकाल आय लव्ह’ (Never Give an Inch) नावाने हे पुस्तक काढले गेले आहे.

पॉम्पिओ यांनी असे म्हटले की, मला वाटत नाही जगाला माहिती सुद्धा असेल भारत-पाकिस्तान दरम्यान वाद ऐवढा चिघळला गेला होता की, फेब्रुवारी २०१९ मध्ये परमाणू युद्धासारखी स्थिती निर्माण झाली होती. खरंतर असे की, मला याचे योग्य उत्तर सुद्धा माहिती नाही. मला केवळ हेच माहिती आहे की, हे अगदी जवळ होते. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या उत्तरात फेब्रुवारी २०१९ मध्ये पाकिस्तानच्या बालकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी प्रशिक्षण शिबिरावर भारताने एअर स्ट्राइक केले होते. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते.

मी केवळ काही मिनिटांचा वेळ मागितला
त्यांनी असे म्हटले की, भारत आणि पाकिस्तानने उत्तर सीमा (कश्मीर) वर दशकांपासून चालू असलेल्या वादाच्या कारणास्तव एकमेकांना धमक्या देणे सुरु केले होते. पुस्ताकात लिहिले आहे की, पाकिस्तानी लोकांनी हल्ल्यासाठी आपले परमाणू हत्यारांची तयारी केली होती. पाकिस्तान्यांनी असे म्हटले की, भारत आणखी पुढे जाऊ शकतो. मी त्यांना काहीच न करण्यास सांगितले आणि काही गोष्टी सोडवण्यासाठी एक मिनिटांचा वेळ मागितला.

संपूर्ण रात्र सुरु होती बैठक
पॉम्पिओ यांनी पुढे लिहिले की, मी राजदीत बोल्टेन यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली होती. ते माझ्यासोबत हॉटेल मध्ये थांबले होते. मी पाकिस्तानच्या सैन्याचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याजवळ गेलो, त्यांच्यासोबत बैठक केली. मी त्यांना भारतीयांनी जे सांगितले तेच सांगितले. जसी की, तुम्ही परमाणू हल्ल्याची तयारी करत आहात. त्यांनी यावर उत्तर देत म्हटले की, हे खरं नाही आहे.

दोन्ही देश जवजवळ तयारच होते
दोन्ही देशांना वाटत होते की, परमाणू हल्ला होऊ शकतो. त्यामुळे दोन्ही देश पूर्णपणे तयारीत होते. काही तासंचा वेळ लागला आणि नवी दिल्ली आणि इस्लामाबाद दरम्यान, आमच्या टीमने काम केले. आम्ही दोन्ही पक्षांना समजण्यास यशस्वी झालो. अशा प्रकारे हा महाविनाश टळला. पॉम्पिओ यांच्या दाव्यावर परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया दिली गेली नाही.(Never Give an Inch)

आम्ही जे केले ते कोणीही करु शकले नसते-पॉम्पिओ
पुस्तकात असे लिहिले होते की, त्या दिवशी रात्री आम्ही जे काही केले ते एका भयंकर स्थितीतून बचाव करण्यासाठी केले. त्यासारखे कोणत्याही राष्ट्र करु शकला नसता. जसे की, सर्व एका मुत्सद्देगिरी सोबत होते. काहीही करुन हा विनाश टाळायचा होता. मी भाग्यवान होतो की, भारतातील केन जस्टर आमचे राजदूत तैनात होते. केन भारत आणि तेथील लोकांवर प्रेम करतात. माझे सर्वाधिक वरिष्ठ राजकीय नेते डेविड हेल हे पाकिस्तानात अमेरिकेचे राजदूत होते. त्यांना माहिती होते की, भारताच्या संबंधांना आपण प्राथिमिकता दिली पाहिजे.

हे देखील वाचा- राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी कशा पद्धतीने निवडले जातात मुलं?

मुत्सद्देगिरीचे मास्टर-पॉम्पिओ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांनी निवडणूकीदरम्यान America and American First Policy चा नारा दिला. त्यांचा हा नारा अमेरिकन लोकांना खुप आवडला आणि ट्रंम्प यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेले. त्यांनी परराष्ट्र नितीची जबाबदारी माइक पॉम्पिओ यांच्यावर सोपविली. जागतिक प्रकरणांमधील जाणकार असे म्हणतात की, पॉम्पिओ यांनी कसे चीन, नॉर्थ कोरिया सारख्या देशांशी अमेरिकेची संबंध सुधारण्यास प्रयत्न केला. त्यांच्या या पुस्तकाने आता सर्वांना धक्का बसला आहे. यामध्ये खुलासा करण्यात आला आहे की, बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तान भारतावर परमाणू हल्ल्याची तयारी करत होता.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.