Home » Neutron Star : पुणे शहराइतके तारेसुद्धा आपल्या ब्रम्हांडात आहेत.

Neutron Star : पुणे शहराइतके तारेसुद्धा आपल्या ब्रम्हांडात आहेत.

by Team Gajawaja
0 comment
Neutron Star
Share

आपण अनेकदा पुणे शहराचं कनेक्शन पुणेरी पाटीशी जोडून हशा पिकवत असतो. पण पुणे एक असा जिल्हा आहे, ज्याने अंतराळ क्षेत्रात योगदान दिलं आहे. आता तुम्ही म्हणाल अंतराळ आणि पुण्याचा संबंध तरी काय, तर ब्रम्हांडातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजेच ‘सरस्वती सुपरक्लस्टर’चा शोध आपल्या पुण्यातुनच लावण्यात आला आहे. याशिवाय GMRT म्हणजेच जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप आपल्या पुण्यातल्या जुन्नरच्या खोडद गावात आहेत. आता इतक्या सगळ्या गोष्टींना पुण्याने हातभार लावलाय. पण तुम्हाला एक गोष्ट माहितीये का ? आपल्या ब्रम्हांडात असेही काही तारे आहे जे पुणे शहराइतकेच आहेत. आता तुम्ही म्हणाल तारे तर सूर्यापेक्षा मोठाले असतात तर फक्त पुणेच्या आकाराइतका असा कोणता तारा जन्माला आला. तर तो जन्माला आला नाही, आधीपासूनच होता. आज याच ताऱ्यांबद्दल आपण जाणून घेऊ. (Neutron Star)

आपला सूर्य मुळात एक ताराच आहे. आपल्यासाठी जरी तो भयंकर मोठा असला तरी या ब्रम्हांडात त्याची गणना एका अणुइतकी आहे. त्याच्यापेक्षा कोट्यावधी पटीने मोठमोठे तारे ब्रम्हांडात आहेत. उदा द्यायचं झाल तर यू वाय स्कूटी हा तारा सूर्यापेक्षा तब्बल १७०० पटीने मोठा आहे… लागला ना शॉक…  एखादा तारा किती लहान असू शकतो तर साधारणपणे आपण असा अनुमान लावू की तो छोट्या ग्रहाच्या किंवा चंद्राच्या आकाराचा असू शकतो. परंतु या विशाल ब्रम्हांडात काही तारे असे सुद्धा आहेत ज्यांचा व्यास केवळ काही किलोमीटर इतकाच आहे. म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे पुण्याइतकाही… मुंबईचं नाव घेतलं नाही म्हणून मुंबईकरांनी रुसून जाऊ नका. (Astronomy)

या ताऱ्यांना न्युट्रॉन स्टार्स (Neutron Star) म्हणतात. आपण शाळेत इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे तर शिकलेलोच आहोत. यातल्याच न्यूट्रॉनपासून हे तारे तयार झालेले असतात आणि हेच तारे शहरांच्या आकाराचे असतात, ज्यांचा व्यास 25-30 किमी पेक्षाही कमी असतो. पण यांची एक गोष्ट भन्नाट आहे, या न्यूट्रॉन स्टार्सचा आकार जरी लहान असला तरी हे तारे सूर्यापेक्षा तब्बल १.५ पट किंवा त्यापेक्षा जास्त वस्तुमानाचे असतात. म्हणजे बघा आकार पुणेइतका आणि वस्तुमान सूर्याइतका… पडलं ना डोकं सुन्न…

आता हे तारे तयार कसे होतात हे जाणून घेऊया. अनेकांना माहीत नसेल की जसं माणसांना वयोमान असतं तसं ताऱ्यांनाही असतं. ताऱ्यांच्या जन्माच्याही तीन फेज असतात. ताऱ्यांच्या जन्म नेब्युलांमध्ये होत असतो. यांना मराठीत निहारिका म्हणतात. एखाद्या ताऱ्याचा जेव्हा जन्म होतो, तेव्हा ते तप्त निळ्याशार रंगाचे असतात. जेव्हा ते तरुण होतात, तेव्हा ते थोडे पिवळ्या केशरी रंगाचे असतात. आणि जेव्हा ते म्हातारे होतात तेव्हा ते तप्त लाल रंगाचे होतात. याचही उदाहरण देतो/देते. सिरियस किंवा व्याध हा तारा हा आताच जन्मलेला तारा आहे. आपला सूर्य हा तरुण तारा आहे आणि बीटलझीऊस म्हणजे काक्षी हा तारा आता वृद्धावस्थेत आहे. (Neutron Star)

एखाद्या ताऱ्याचा मृत्यू होतो त्याला ‘सुपरनोव्हा’ म्हणतात. हा भयानक सुपरनोव्हा झाल्यानंतर ताऱ्यांच्या दोन गोष्टी होऊ शकतात. एक म्हणजे ब्लॅक होल आणि दुसरं म्हणजे न्यूट्रॉन स्टार… आता एक जाणून घ्या, ज्याचं वस्तुमान खूप जास्त त्याचा ब्लॅक होल होतो आणि ज्याचं वस्तुमान अतिशय कमी त्याचा न्यूट्रॉन स्टार होतो. ताऱ्याच्या सुपरनोव्हा झाल्यानंतर ताऱ्याचा गाभा म्हणून हे न्यूट्रॉन स्टार्स बनलेले आपल्या दिसतात. यामध्ये फक्त न्यूट्रॉन मूलकण शिल्लक असतात. यात क्वार्क मॅटर म्हणजे पदार्थाची इलेक्ट्रॉनरहित अवस्था ज्यात ऊर्जा जास्त प्रमाणात बाहेर पडत असते, असे हे न्यूट्रॉन तारे असतात. थोडस सायंटिफिक आणि डोक्यावरून जाईल. पण समजणारच नाही, अशी ही गोष्ट नाही. (Astronomy)

==============

हे देखील वाचा :  Chhaava Review : ‘छावा’चा सर्वत्र जलवा, जाणून घेऊ चित्रपट कसा आहे ?

==============

या न्युट्रॉन ताऱ्यांमधून बाहेर पडणारी ऊर्जा ही प्रामुख्याने एक्स रे, अल्ट्रा व्हायोलेट रेंज मध्ये असते. याच कारणाने असे तारे सामान्य दुर्बिणीतून दिसत नाहीत. त्यासाठी आपल्याला चंद्रा एक्स रे दुर्बीण, हबल दुर्बीण, जेम्स वेब टेलिस्कोप किंवा इतर रेडिओ दुर्बिणी वापरून असे तारे शोधले जातात. एखाद्या लाईट हाऊस मधून जसे प्रकाशाचा झोत ठराविक दिशेत बाहेर पडतो, तसे या न्यूट्रॉन ताऱ्यांच्या ध्रुवीय क्षेत्रातही वर आणि खालच्या बाजूने अति प्रखर असे एक्स रे आणि रेडिओ सिग्नल बाहेर पडत असतात. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा. अजून एक गंमत सांगू का ? या ताऱ्यांमधला एक टीस्पून न्यूट्रॉन तब्बल माउंट एव्हरेस्टच्या वजनाचा असतो. (Neutron Star)

ताऱ्याच्या वेगाने फिरण्यामुळे हे सिग्नल सतत ऑन-ऑफ सारखे कमी जास्त तीव्र होताना रेडिओ दुर्बिणीने शोधता येतात. तसं या न्यूट्रॉन ताऱ्यांचं विशेष काही काम नसतं. पण हे तारे आपल्या ब्रम्हांडातील एक विशेषताच आहेत. मस्त गोल गोल जबरदस्त स्पीडने फिरत रहायचं, एवढच त्यांचं काम असत. असे हे न्यूट्रॉन तारे आपण ब्रम्हांडात नैसर्गिक रित्या सर्वात लहान समजू शकतो, पण त्यांचा माज सूर्यापेक्षा भला मोठाच असतो.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.