दिवसेंदिवस बिग बॉस मराठीची रंगात वाढत जात आहे. बिग बॉस मधील स्पर्धकांमध्ये होणारे वाद, तंटे, विविध टास्क यांमुळे सतत हा शो प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर देखील या शोची जोरदार चर्चा होताना दिसते. यावर्षी बिग बॉस पर्वाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे रितेश देशमुख. पहिल्यांदाच रितेश बिग बॉसचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. रितेशने या शोला आपल्या अनोख्या अंदाजने चार चांद लावले आहे.
मात्र हे बिग बॉसचे पर्व विविध वाद देखील निर्माण करत आहे. आताच घरातील सदस्यांनी एका नवीन वादाला तोंड फोडले आहे. झाले असे की, बिग बॉसने तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच स्पर्धकांना एक नवीन आणि भन्नाट टास्क दिला आहे. या टास्कसाठी बिग बॉसच्या घरात लहान पाहुण्यांचे आगमन झाले. त्या पाहुण्यांना सांभाळण्याची जबाबदारी घरातील सदस्यांना देण्यात आली होती.
या टास्कसाठी दोन टीम करण्यात आल्या होत्या. निक्की-अरबाज आणि अंकिता-वर्षाताई या दोन्ही टीम बाळांचा सांभाळ करत होते. बिग बॉसच्या आदेशानुसार बाळांसोबत बोलताना केवळ मराठी भाषेतच बोलायचे होते. अशातच अंकिता, बाळासोबत मालवणी भाषेत बोलत होती. तिच्या या भाषेवर वैभव, निक्की आणि अरबाज यांनी आक्षेप घेतला.
View this post on Instagram
वैभवने अंकिता आणि वर्षाताई यांच्या टीमचे पाच हजार बीबी करन्सी कापले. त्यावर अंकिता म्हणाली, “मी तुला आधीच विचारले होते मालवणी चालेल की नाही.” यावर वैभव म्हणाला, “बिग बॉस’ने म्हटले फक्त मराठी भाषा बोलायची.” तर, अरबाजने “मालवणी ही मराठी भाषा नाही… ही नॉन महाराष्ट्रीयन भाषा आहे” असे म्हटले आहे. यावर अंकिताने ही भाषा मराठीची उपभाषा असल्याचे सांगितले. मात्र अंकिताचे कोणीही ऐकून घेतले नाही. अरबाज, वैभव, निक्की, जान्हवी कोणीच तिचे ऐकत नसल्याचे दिसले. आता या गोष्टीवरून घरात दोन्ही टीम्समध्ये वाद निर्माण झाले आहेत. शिवाय सोशल मीडियावरही आता नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया येणार दिसत आहेत.
अंकिता, बाळासोबत बोलत असते आणि तिच्या शेजारी निखिल, वैभव बसलेले असतात. अंकिता, बिग बॉसला विचारते, ‘मालवणी नाही चालणार का?’ त्यावर निखिल म्हणतो, ‘नको तू मराठीमध्येच बोल’. अंकिता बाळाशी बोलताना म्हणते, ‘माझो झील मालवणी नाय बोलतलो तर कोणाचो बोलतोलो. मालवणी ही मराठीची उपभाषा आहे.’ हे ऐकून वैभव उठून निघून जातो. तेव्हा अंकिता त्याला विचारते, ‘काय रे चालणार नाही का?’ पण तो काहीही उत्तर देत नाही. वैभव बाहेर येतो आणि सगळ्यांना सांगतो, ‘मालवणी भाषेचा उपयोग झालेला आहे.’ अरबाज म्हणतो, ‘मालवणी ही नॉन महाराष्ट्रीयन भाषा आहे’ निक्की सर्वांना सांगते, ‘बेबीला मालवणी नाही समजत’ त्यावरून सर्व सदस्यांमध्ये वाद होतो.
=======
हे देखील वाचा : तेजश्री प्रधानचे ग्लॅमरस फोटोशूट
======
यानंतर आता सोशल मीडियावर अनेकांना ही बाब आवडली नाही. त्यांनी कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत लिहिले, ‘मालवणी ही Non -Maharashtrain भाषा आहे का? महाराष्ट्रात राहून इतकं समजत नसेल तर बिग बॉस मराठीमध्ये येण्यास खरंच पात्र आहेत का?’ एकाने लिहिले, “आणि तो अरबाज त्याला तर नीट मराठी बोलता येत नाही.. वळू नुसता माजलाय.. बिग बॉस त्या पत्रात असा कुठेही उल्लेख नव्हता कि तुम्ही तुमच्या माय भाषेत बोलू शकत नाही’, ‘मालवणीचा त्रास होतो का त्यांना? बिग बॉस पण बायस आहे असं वाटायला लागलं आहे आता”.
आता यावर बिग बॉस आणि रितेश काय निर्णय घेतात हे बघणे महत्वाचे असणार आहे.