Home » नेस्लेच्या यशाचा प्रवास…

नेस्लेच्या यशाचा प्रवास…

by Team Gajawaja
0 comment
Nestle Success Story
Share

जर तुम्ही खाण्या,पिण्याचे शौकीन असाल आणि मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जात असाल तर तुम्ही नेस्लेचे नाव ऐकलेच असेल. कंपनी गेल्या दीडशे वर्षांपासून फूड मार्केटमध्ये राज करत आहे. याला जगातील सर्वाधिक मोठी फूड कंपनी म्हटले जाते. ही एक मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन असून ज्याचे मुख्यालय स्विर्त्झलँन्ड येथे आहे. नेस्ले काही प्रसिद्ध ब्रँन्डमध्ये नेस्कॅफे, निडो, मिलो, नेस्टिया, मॅगी, बियर ब्रँन्ड सुद्धा असून जी आपल्या गोडव्यासाठी ओळखळी जाते.(Nestle Success Story)

नेस्ले कंपनीच्या मालकांनी पहिले आणि दुसऱ्या महायुद्धातील विनाश पाहिला. असे सांगितले जाते की, त्या दरम्यान नेस्लेच्या प्रोडक्ट्सची मागणी वाढली होती. युद्धात सहभागी झालेल्या जवानांना याचे प्रोडक्ट्स पुरवले जायचे. लहान मुलांसाठी आहार ते दूध प्रोडक्ट्समध्ये विस्तार केला गेला. भारताने सुद्धा सुद्धा नेस्लेचे प्रोडक्ट्स आपल्या क्वालिटीसाठी प्रसिद्ध आहे.

नेस्लेची सुरुवात एक अँग्ल-स्विस कंपनीसोबत सन् १९०५ मध्ये झाली होती. त्याचे संस्थापक होते जॉर्ज, चार्ल्स पेज आणि हेनरी. याच्या फाउंडर्स बद्दल असे मानले जाते की, ते सर्व विज्ञानाच्या विविध पैलूंकडे विशेष लक्ष द्यायचे. खाण्यापिण्यासंदर्भातील त्यांची शुद्धता आणि पौष्टिकतेची पुर्णपणे काळजी घेतली जायची. हेच कारण आहे की, नेस्लेचे प्रोडक्ट्सनी क्लास सोसायटीमध्ये स्थान बनवले. लोकांचा त्यावर विश्वास बसला.

गुणवत्ता पाहून रेल्वेने सुद्धा नेस्लेला जगभरातील बाजारात पोहचवण्याचा विचार करत त्यामध्ये मोठे योगदान दिले. कंपनीने जनतेपर्यंत पोहचण्यासाठी आणि लोकांना शिक्षित करण्यासाठी मॉर्डन जाहिरातींच्या माध्यमांचा खुप वापर केला. वृत्तपत्र,होर्डिंग्स, फ्लायर्स आणि पोस्टरच्या माध्यमातून जाहिरातील दिल्या.(Nestle Success Story)

नेस्लेच्या यशाच्या अनेक कथा आहेत. त्यापैकी एक म्हणजे महायुद्धादरम्यान सैनिकांसाठी पौष्टिक आणि शुद्ध आहार ते तयार करायचे. १९४० च्या दशकाच्या अखंर पर्यंत लोकांना नेस्कॅफे सोबत आपल्या दिवसाची सुरुवात करण्याची सवय लागली होती. खरंतर कंपनीने जगातील पहिलीच इंस्टंट कॉफी तयार केली होती. त्याची टेस्ट उत्तम होती आणि गरम पाणी टाकल्यानंतर ती लगेच तयार ही व्हायची. नेस्कॅफेने नेस्कक्विक सुद्धा लॉन्च केले. त्यामध्ये कोको पावडर असायची. ती थंड दुधात अगदी सहज मिक्स व्हायची. १९६० च्या अखेरपर्यंत नेस्लेने कॅनमध्ये तयार केलेले जेवण लॉन्च केले. मॅगी, पास्ता असे प्रोडक्ट्स होते आणि त्यांना यश ही मिळाले. घराघरात लोकप्रिय ही झाले.

हे देखील वाचा- रविवार हा सुट्टीचा दिवस का मानला जातो?

नेस्लेकडे आजच्या तारखेला २ हजारांहून अधिक प्रोडक्ट्स आहेत. ज्यामध्ये कॉफी, मिल्कशेक, चॉकलेट, सूप. नेस्लेचा सर्वाधिक प्रसिद्ध ब्रँन्ड नेस्कॅफे असून जो १९४० च्या दशकाच्या अखेर पर्यंत लॉन्च केला होता. नेस्ले नेहमीच आपल्या उद्योगात विविध आणण्याचा प्रयत्न करत राहिला. वर्, १९७३ मध्ये कंपनीने आपला चॉकलेट ब्रँन्ड किटकॅट लॉन्च केला. याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद ही मिळाला.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.