Home » लँन्ड होताच झाले असते प्रमोशन, १६ वर्षांपूर्वी पतीचा मृत्यू; अशी आहे अंजूची कथा

लँन्ड होताच झाले असते प्रमोशन, १६ वर्षांपूर्वी पतीचा मृत्यू; अशी आहे अंजूची कथा

by Team Gajawaja
0 comment
Nepal Plane Crash
Share

नेपाळ मध्ये नुकताच एक विमान अपघात झाल्याने सर्वांना मठा धक्का बसला आहे. लँन्डिंगपूर्वी विमानाचा अपघात झाला असून त्यात ६८ प्रवाशांसह एकूण ७२ लोक होते. या विमान दुर्घटनेत को-पायलट अंजू हिचा मृत्यू झाला आहे. योगायोग असा की १६ वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने नवऱ्याचा मृत्यू झाला होता त्याच पद्धतीने तिचा ही मृत्यू झाला. को-पायलट अंजू अतिवडा हिला काही प्रमोशन मिळण्यासाठी काही अवधी बाकी होता. पण काही सेकंदात तिचे आयुष्य संपले. अंजू खतिवडा नेपाळ मधील पोखरा येथे अपघात झालेले येति एअरलाइन्स ATR-72 मध्ये ७२ प्रवाशांना घेऊन जाणारी को-पायलट होती.ज्या दिवशी ही दुर्घटना घडली त्या दिवसाच्या १६ वर्षांपूर्वी नवऱ्याचा ही विमान अपघातात मृत्यू झाला होता. (Nepal Plane Crash)

नवऱ्याचा ही विमान अपघातात मृत्यू
अंजूने १६ वर्षांपूर्वी २१ जून २००६ रोजी आपल्या नवऱ्याला विमान अपघातात गमावले. तर नवरा सुद्धा येति एअरलाइन्समध्ये को-पायलट होते. १६ वर्षापूर्वी येति एअरलाइन्सचा 9N AEQ विमान नेपाळगंज येथून सुरखेटच्या मार्गाने जात होते, त्यामध्ये सहा प्रवासी आणि चालक दलाच्या चार जणांना मृत्यू झाला होता. मृतांमध्ये अंजूचा नवरा सुद्धा होता.

प्रमोशन होणार होते
को-पायलटच्या रुपात अपघातातील विमानातून अंजूचे अखेरचे उड्डाण होते. या विमानाच्या यशस्वी लँन्डिंन नंतर अंजूला कॅप्टन व्हायचे होते. तर याच उद्देशाने मंजूने आपल्या सीनियर पायलट आणि आपल्या ट्रेनी कमल केसी यांच्यासोबत उड्डाण केले. पायलट बनण्यासाठी कमीत कमी १०० तासांचा फ्लाइंग अनुभव असणे गरजेचे असते. को-पायलट अंजूने यापूर्वी नेपाळच्या जवळील सर्व विमान तळांवर यशस्वीपणे विमानाचे लँन्डिंग केले होते. (Nepal Plane Crash)

चीफ पायलटच्या सीटवर बसली होती
पोखरासाठी उड्डाण करतेवेळी कॅप्टन कमल केसी यांनी त्यांना मुख्य पायलटच्या सीटवर बसवले होते. यशस्वी लँन्डिंग नंतर अंजूला चीफ पायलटचा परवाना मिळणार होता. मात्र आपल्या लक्ष्यापासून केवळ १० सकंद दूर असतानाच विमानाचा अपघात झाला आणि तिचे स्वप्न भंग पावले. त्याच विमानात असलेल्या कॅप्टनला पायलटिंगचा ३५ वर्षांचा अनुभव होता. कमल केसी यांनी आपल्या करियर मध्ये काही पायलटला प्रशिक्षण ही दिले होते. त्यांच्या द्वारे प्रक्षिशित काही पायलट आजच्या तारखेला यशस्वी पायलट म्हणून ओळखले जातात.

हे देखील वाचा- येणाऱ्या पुढील काही वर्षात ‘ही’ शहरं पूर्णपणे पाण्याखाली जाणार?

सर्व ७२ प्रवाशांचा मृत्यू
येति एअरलाइन्स ATR-72 विमानला सीनियर कॅप्टन कमल केसी चालवत होते आणि अंजू विमानात को-पायलट होती. हे विमान आपल्या जुन्या विमानतळावर आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान वाहणारी सेती नदीच्या किनाऱ्याला असणाऱ्या जंगलात अपघात झाला. नेपाळच्या येति एअरलाइन्सच्या मते विमानात ४ चालकांचे दल आणि पाच भारतीयांसह एकूण ६८ प्रवासी होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.