Home » नेपाळमध्ये कशा पद्धतीने होते संसद आणि विधानसभेची निवडणूक?

नेपाळमध्ये कशा पद्धतीने होते संसद आणि विधानसभेची निवडणूक?

by Team Gajawaja
0 comment
Nepal Elections
Share

नेपाळ मध्ये नवे संसद आणि प्रांतीय विधानसभांसाठी मतदान सुरु झाले आहे. नेपाळ मध्ये एकूण २७५ जागा या संसदेसाठी आणि ५५० जागा विधानसभेसाठी आहेत. अशातच येथील नागरिकांना अशी अपेक्षा आहे की, दीर्घ काळापासून देशात सुरु असलेली राजकीय अस्थिरता आता संपुष्टात येऊ शकते. स्थानिक प्रशासनाच्या मते, नेपाळमध्ये एकूण २२ हजारांहू अधिक मदतान केंद्रांवर मतदान करण्यात आले. संसदेच्या निवडणूकीसाठी २४१४ उमेदवार हे रिंगणात उतरले आहेत. (Nepal Elections)

नेपाळ मधील मतदान संपल्यानंतर लगेच मतमोजणी ही सुरु केली जाणार आहे. निवडणूकीचा अंतिम निकाल येण्यासाठी एका आठवड्याचा कालावधी लागू शकतो असे सांगण्यात आले आहे. नेपाळमध्ये संघीय संसदेच्या २७५ जागा आणि सात राज्यांच्या विधानसभेच्या ५५० जागांसाठी निवडणूक होत आहे. नेपाळच्या सात प्रांतात १.७९ कोटींहून अधिक लोक मतदानासाठी पात्र आहेत. नेपाळच्या संघीय संसदेत एकूण २७५ सदस्यांपैकी १६५ सदस्य फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टिमच्या माध्यमातून निवडले जातील. तर ११० सदस्य हे समानुपातिक निवडणूक पद्धतीद्वारे निवडले जातील. अशातच जाणून घेऊयात नेपाळ मधील निवडणूक पद्धतीबद्दल सविस्तर.

Nepal Elections
Nepal Elections

नेपाळमध्ये निवडणूकीची प्रक्रिया वेगळी
सात राज्यांच्या विधानसभांसाठी एकूण ५५० सदस्यांपैकी ३३० फर्स्ट पास्ट द पोस्टच्या माध्यमातून तर २२० हे समानुपातिक निवडणूक पद्धतीद्वारे निवडले जाणार आहेत. पुन्हा एकदा असा अंदाज लावला जात आहे की, नेपाळमध्ये त्रिशंकु संसद असेल आणि निवडणूकीनंतर स्थिरता मिळणार नाही. नेपाळमध्ये जवळजवळ एक दशक राहिलेले माओवादी यांच्या खात्मा केल्यानंतरतच्या काळापासून संसदेत राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. २००६ मध्ये स्वदेशी युद्ध संपल्यानंतर कोणत्याही पंतप्रधानाने आपला कार्यकाळ येथे पूर्ण केलेला नाही. नेतृत्वात वारंवार बदल आणि राजकीय पक्षांमध्ये आपापसातील वादामुळे देशाचा आर्थिक विकास मंदावल्याचे सांगितले जाते.(Nepal Elections)

हे देखील वाचा- पाकिस्तानात सत्तेसाठी नेहमीच राहिला संघर्ष… इमरान ते भुट्टो यांच्यावर झालेत जीवघेणे हल्ले

कशा पद्धतीने मतदान करतात नागरिक?
नेपाळमध्ये मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदाराला चार बॅलेट दिले जातात. हे सर्व बॅलेट पेपर विविध बॉक्समध्ये टाकले जातात. यापौकीन दोन-दोन संसदीय निवडणूक आणि विधानसभा निवडणूकीसाठी असतात. यामध्ये प्रत्येक निवडणूकीसाठी एका-एकावर फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टिम आणि दुसऱ्यावर रेप्रजेंटेशनल वोटिंगच्या माध्यमातून मतदान करायचे असते. प्रत्येत पक्षाला मिळणाऱ्या मतदानाच्या आधारावर जागांची संख्या ठरवली जाते. रेप्रेंटेशनल सिस्टिम अंतर्गत अधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाची सत्ता स्थापन होते.

दरम्यान, १९९० ते आतापर्यंत नेपाळमध्ये ३२ वेळा सरकार बदलले गेले आहे. वर्ष २००८ नंतर ते आता पर्यंत १० वेळा सरकार बदलले गेले आहे. नेपाळच्या निवडणूक आयोगाने सर्व ७७ जिल्ह्यांच्या निवडणूकीसाठी २,७६,००० कर्मचाऱ्यांना तैनात केले आहे. शांतीपूर्ण मतदानासाठी जवळजवळ ३ लाख सुरक्षा रक्षक सु्द्धा असणार आहेत.

नेपाळच्या निवडणूकीच्या रिंगणात दोन प्रमुख राजकीय गठबंधन आहे, सत्तारुढ नेपाळ काँग्रेसच्या नेतृत्वाखालील लोकतांत्रिक आणि वामपंथी गठबंधन. तर दुसरा सीपीएन-युएमएल (कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ-युनिफाइड मार्क्ससिस्ट-लेनिनिस्ट) च्या नेतृत्वाखालील वामपंथी, हिंदू आणि राजेशाही समर्थकांचे गठबंधन. मात्र आता पुढील सरकारच्या समोर एक स्थिर राजकीय प्रशासन कायम टिकवून ठेवणे, टुरिज्म इंडस्ट्रीला प्रोत्साहन देणे, आपल्या शेजारील देश चीन, भारतासह संबंधित नियंत्रित ठेवणे अशी आव्हाने असणार आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.