Home » Neha Kakkar : भावंडांमधील Sibling Divorce म्हणजे काय?

Neha Kakkar : भावंडांमधील Sibling Divorce म्हणजे काय?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Neha Kakkar
Share

सध्या अनेकदा आपल्या कानावर ‘डिवोर्स’ हा शब्द पडत असतो. आपल्या आजूबाजूला जरी अशी प्रकरणं जास्त होत नसली तरी बॉलिवूडमुळे तर ‘डिवोर्स’ हा शब्द लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच ओळखीचा झाला आहे. पूर्वी डिवोर्स, घटस्फोट, काडीमोड या गोष्टींबद्दल अगदी हळू आवाजात चार भिंतींच्या आतच बोलले जायचे. पण काळानुसार हे देखील बदलले आणि चार भिंतीच्या आतल्या गोष्टी बाहेर आल्या. त्यामुळे आज डिवोर्स काही आपल्यासाठी नवीन नाही. (Neha Kakkar)

मात्र ‘डिवोर्स’ हा शब्द ऐकला की, लगेच डोळ्यासमोर येते ती नवरा बायकोची जोडी. कोणत्याही विवाहित जोडप्यामध्ये काही गोष्टी किंवा सर्वच काही ठीक नसेल तेव्हा ते डिवोर्स घेतात. मात्र आजच्या आधुनिक काळात डिवोर्स हा शब्द फक्त विवाहित लोकांपर्यंत मर्यादित राहिलेला नाही. डिवोर्स हा फक्त नवरा बायकोपुरता सीमित न राहता भावाबहिणींच्या नात्यापर्यंत येऊन पोहचला आहे. चक्रावलात….? अहो पूर्वी नवरा बायकोमध्ये होणारा डिवोर्स आता भावाबहिणींमध्ये देखील होऊ लागला आहे. म्हणजे काय…? चला सांगतो.(Marathi News)

काही दिवसांपासून नेहा कक्कर आणि तिचे भावंडं कमालीचे गाजताना दिसत आहे. बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय गायिका म्हणून नेहा कक्कर प्रसिद्ध आहे. तिच्यासोबतच तिची बहीण सोनू कक्कर आणि भाऊ टोनी कक्कर देखील लोकप्रिय गायकांमध्ये येतात. तर झाले असे की, काही दिवसांपूर्वी गायिका सोनू कक्करने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने लिहिले होते की, ती तिच्या भावंडांसोबत अर्थात नेहा आणि टोनीसोबत असलेले नातं तोडत आहे.(Social News)

Neha Kakkar

या पोस्टनंतर ‘सिबलिंग डिव्होर्स’ हा शब्द सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल झाला. या शब्दाला हॅशटॅग करून देखील अनेक पोस्ट शेअर केल्या गेल्या. मात्र थोड्यावेळातच तिने ती पोस्ट डिलीट केली. पण तेव्हापासून ‘सिबलिंग डिवोर्स’ हा शब्द खूपच गाजताना दिसत आहे. नवरा बायको मधला डिवोर्स तर माहिती आता हा सिबलिंग डिवोर्स म्हणजे काय? अशा अनेक पोस्ट सोशल मीडियावर चांगल्याच फिरत आहेत. आज आपण या लेखातून याच सिबलिंग डिवोर्सबद्दल जाणून घेऊया.(Marathi Latest News)

Sibling Divorce म्हणजे काय?

नवरा बायकोमधील डिवोर्स सर्वांना माहीत आहे, पण आता भावा बहिणींमध्ये येणाऱ्या दुराव्यासाठी ‘सिबलिंग डिवोर्स’ असा शब्द रूढ होताना दिसत आहे. किंवा या दुराव्यासाठी असा शब्द वापरला जात आहे. भाऊ आणि बहिणींचे एकमेकांशी असणारे नाते संपुष्टात येते. जेव्हा भाऊ-बहिणींमधील नाते बिघडते आणि ते एकमेकांपासून शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या दूर जातात तेव्हा त्याला भावंडांचा घटस्फोट म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड गायक अमाल मलिकने देखील सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट शेअर करत सांगितले होते की, तो डिप्रेशनमध्ये असून त्याने त्याचा भाऊ अरमान मलिक आणि आई-वडिलांसोबतचे सर्व संबंध तोडले आहेत. (Marathi Trending News)

=======

हे देखील वाचा : Longest Flights : ‘हा’ आहे जगातील सर्वात लांब आणि वेळ खाऊ विमान प्रवास

Sunglasses : उन्हाळासाठी सनग्लासेस खरेदी करायचे…? त्याआधी हा लेख नक्की वाचा

=======

सोनुने कक्करने तिच्या पोस्टमध्ये म्हटले?
सोनुने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते, “तुम्हाला सर्वांना कळवताना खूप दुःख होत आहे की मी आता टोनी कक्कर आणि नेहा कक्कर या दोन प्रतिभावान सुपरस्टार यांची बहीण नाही. माझा हा निर्णय भावनिक वेदनांमधून आला आहे आणि आज मी खरोखर निराश झाले आहे.” असे म्हणत तिने पोस्ट शेअर केली आहे. मात्र सोनुने केलेली पोस्ट काही इन्स्टा अकाऊंटवरून डिलीट करण्यात आली. मात्र नंतर तिच्या या पोस्टचे स्क्रिनशॉट खूपच व्हायरल झाले आहे. (Marathi Top News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.