Home » नीतू कपूर विरुद्ध कतरीना कैफची आई सुझान या युद्धाची चर्चा

नीतू कपूर विरुद्ध कतरीना कैफची आई सुझान या युद्धाची चर्चा

by Team Gajawaja
0 comment
Neetu Kapoor
Share

रणबीर कपूर आणि कतरीना कैफ या दोघांचेही बॉलिवूडमध्ये स्वतंत्र स्थान आहे. कपूर घराण्याचा वारस म्हणून बघितले जाणा-या रणबीर कपूरची गाडी आता स्थिरावली असली तरी त्याची अनेक प्रेम प्रकरणं होती. आलिया भट्ट बरोबर लग्न करण्यापूर्वी रणबीरचे नाव अनेक अभिनेत्रींबरोबर जोडले गेले. या सर्वात कतरिना कैफचे नाव सर्वात वर आहे. सलमान खान सोबत कतरीनाचे नाव जोडले गेले होते, तेव्हाच या नात्यात रणबीर आला आणि कतरीना आणि रणबीर यांचे प्रेम प्रकरण सुरु झाले. जवळपास सात वर्ष हे प्रेम प्रकरण टिकले. यावेळी या दोघांचे लग्न होणार अशा बातम्याही सुरु होत्या. मात्र रणबीरचे सात वर्षाच्या या नात्यानंतर दिपिका पादुकोणवर मन जडले. कतरीनाला या नव्या नात्याची जाणीव झाल्यावर तिनं रणबीरपासून स्वतःला दूर केले. वास्तविक रणबीर आणि कतरीना यांच्या नात्याला रणबीरची आई नीतू कपूरचा विरोध असल्याचीही चर्चा होती. त्यामुळे हे नाते लग्नापर्यंत पोहचू शकले नाही. दरम्यान रणबीरनं दिपिकालाही दूर करत आलियाबरोबर लग्न केले. इकडे कतरीनाही विक्की कौशलबरोबर लग्न करुन स्थिरावली आहे. आता या सर्वात एका मुलीचा बाप झालेल्या रणबीरचा आणि कतरीनाची पुन्हा एकदा सोशल मिडीयावर चर्चा चालू झाली आहे. कारण हे दोघंही आपापल्या आयुष्यात स्थिरावले असले तरी या दोघांच्या आयांच्या मनात मात्र किंतू अजून आहे आणि यातूनच सध्या या दोघांच्याही आयांचे सोशल मिडीयावर एक युद्धच सुरु झाले आहे. अर्थात या रणबीर कपूरची आई, नीतू कपूर आणि कतरीनाची आई, सुझान या दोघीही सोशल मिडीयावर ब-याच लोकप्रिय आहेत. नीतू कपूरनं या युद्धाची पहिली सुरुवात करीत कतरीनाला टोमणा मारला. याचे प्रत्युत्तर तेवढ्याच चोख शब्दात कतरीनाच्या आईनं देत, नीतूला तिची जागा दाखवली आहे. मुख्य म्हणजे या सोशल वॉरमध्ये नीतू कपूरला जबरदस्त ट्रोल करण्यात येत आहे आणि सुझान कैफची वाहवा होत आहे.  

नीतू कपूर विरुद्ध कतरीना कैफची आई सुझान या युद्धाची चर्चा सर्वत्र आहे. रणबीर कपूर आणि कतरीना कैफ यांचे सात वर्ष प्रेमप्रकरण होते. पण हे नाते लग्नापर्यंत पोहचू शकले नाही. यासंदर्भात सोशल मीडियावर नीतू कपूरने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिनं, कोणीतरी तुम्हाला 7 वर्षांपासून डेट केले आहे याचा अर्थ तो तुमच्याशी लग्न करेल असे नाही. ही पोस्ट शेअर करताना नीतू कपूरनं कतरीनाचा उल्लेख केलेला नव्हता. पण ती पोस्ट कतरीनासाठीच होती आणि त्याची चर्चा सुरु झाली. या पोस्टला मग कतरीनानं उत्तर न देता, तिच्या आईनं दिलं आहे.   

कतरीना कैफची आई सुझान यांनी या पोस्टला उत्तर देताना म्हटले आहे की, माझे पालनपोषण अशा प्रकारे झाले आहे की, मी प्रत्येकाचा सारखा मान ठेवते. अगदी घरचा एक सदस्य ते घरी काम करणारे रखवालदार…या सर्वांचा सारखा मान ठेवण्याचे संस्कार माझ्यावर आहेत.  सुझानच्या या पोस्टला कतरीनाच्या चाहत्यांनी डोक्यावर घेतले आहे. शिवाय नीतू कपूरला रोखठोक बोल सुनवले आहेत. संबंधित दोन्ही व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी आहेत, मग यावर टिपणी करण्याची काय गरज आहे, अशी टिपणी एका युजरनं केली आहे. तर आणखी एका युजरनं तुम्ही आणि तुमची मुलगी किती प्रतिष्ठित आहात हे दिसून येते. शेम ऑन यू नीतू सिंग..मला आलिया भट्ट आणि तिच्या मुलीबद्दल वाईट वाटते,  असे म्हणत नीतू कपूरलाच सुनवले आहे.  

=======

हे देखील वाचा : ‘सिंहासन’ची बदलेली ४४ वर्ष… जेव्हा शरद पवार प्रीमियर शो ला येतात

=======

एकूण बॉलिवूडमधील कलाकारांचे सोशल मिडीयावर असे वाद होत असतात, पण आता त्यांच्या आयाही या सोशल युद्धात उतरल्या आहेत.  मुळात नीतू कपूरनं आपल्या कपूर खानदानाच्या आड कोणालाही टोमणे मारण्याची सवय आतातरी सोडली पाहिजे, असाच सल्ला तिला दिला गेलाय. यातून नीतूनं कतरीनाला मारलेला बाण तिच्यावर उलटल्याचे स्पष्ट झालंय….

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.