Home » नीरजच्या समोर मोठ आव्हान !

नीरजच्या समोर मोठ आव्हान !

by Team Gajawaja
0 comment
Neeraj Chopra VS Arshad Nadeem
Share

नीरज चोप्रा सध्या भारताच्या क्रीडा इतिहासातलं सर्वात मोठं नाव. हे नाव ऐकताच आपल्याला आत्मविश्वास असतो की, भारत आता जिंकणारच ! २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वांचा विश्वास होता की नीरज पुन्हा एकदा गोल्ड आणून इतिहास घडवेल, कारण क्वालीफिकेशन राऊंडमध्येच त्याने ८९.३४ मीटर लांब भाला फेकत क्वालीफिकेशन राऊंड मध्ये टॉप केलं होता. पण, क्वालीफिकेशन राऊंड मध्ये चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या पाकिस्तानचा अर्शद नदीम थेट ऑलिम्पिक रेकॉर्ड मोडत गोल्ड जिंकेल, हे कोणाच्या मनातही आलं नसेल. टॉकीयो ऑलिम्पिकमध्ये पाचवा येणार अर्शद नदीम पॅरिसमध्ये ऑलिम्पिक रेकॉर्डतोड कामगिरी करून गोल्ड कसा जिंकला? आणि आता येणाऱ्या स्पर्धांमध्ये नीरजसाठी अर्शद नदीम मोठं आव्हान असेल का?

पाकिस्तानचा अर्शद नदीम अत्यंत गरिबीतून पुढे आलाय. त्याचे वडील बांधकाम मजूर होते आणि घरात ७ भावंडं होती, त्यामुळे एकावेळचं अन्न मिळण त्यांच्यासाठी मोठी गोष्ट होती. आवडीचं अन्न खायचं असेल तर त्यांना ईदची वाट पाहावी लागायची, असं त्याच्या भावाने मीडियाला सांगितलं होतं. अशा परिस्थितीत क्रीडा प्रशिक्षण घ्यायच म्हणजे आर्थिकदृष्ट्या सोपं काम नाही. अर्शदने चांगल्या ठिकाणाहून प्रशिक्षण घ्यावं म्हणून त्याच्या गावातल्या लोकांनी आणि नातेवाइकांनी वर्गणी काढून पैसे गोळा केले होते. सुरुवातीला स्पोर्ट्स कोट्यातून सरकारी नोकरी मिळवणं हेच अर्शदच ध्येय होतं. पण पाकिस्तानी जॅवेलीन थ्रोअर सय्यद हुसेन बुखारीनं अर्शदच्या टॅलेंटला ओळखलं आणि त्याच्या करिअरला नवी दिशा दिली. पाकिस्तानाच्या इतिहासात वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिलं ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून देणारा अर्शद नदीम हा पहिलाच खेळाडू ठरला. पाकिस्तानच्या पुढच्या अनेक पिढ्यांसाठी अर्शद नदीम हा आयडियल असेल, यात वादच नाही. (Neeraj Chopra VS Arshad Nadeem)

पण आपला स्टार नीरज चोप्रा याचा सुद्धा सुरुवातीचा प्रवास सोपा नव्हता. नीरज लहानपणी खूप जाडजुड होता, त्याच्या याच लठ्ठपणाची गावात खिल्ली उडवली जायची. त्याच्या वाढत्या वजनामुळे त्याचं कुटुंबही अस्वस्थ झालं होत. म्हणून कुटुंबीयांनी नीरजला जिममध्ये भरती करण्याचा निर्णय घेतला. गावात ज्या जिममध्ये तो जात होता, ती जिम काही कारणांमुळे बंद पडली. आणि आजूबाजूच्या गावात जवळपास कुठेच जिम नव्हती. त्यामुळे घरच्यांनी एक निर्णय घेतला ११ वर्षाच्या नीरजला पानिपतच्या शिवाजी स्टेडियमवर पाठवण्याचा. जिथे धावून त्याच वजन कमी होईल असं त्यांना वाटलं होतं. पण घडलं काहीतरी वेगळचं. नीरज तिथे गेला, पण आळसामुळे धावण्याऐवजी तो वारंवार चालायला लागला. एके दिवशी त्याची भेट राष्ट्रीय स्तरावरील जॅवेलीन थ्रोअर जय चौधरी ऊर्फ जयवीरशी झाली. त्याने नीरजला भाला फेकण्यासाठी सांगितलं. नीरजने पहिल्याच थ्रोमध्ये भाला ३५-४० मीटर अंतरावर फेकला. वजन जास्त असूनही नीरजचं शरीर अतिशय लवचिक होतं आणि त्याची नजर एखाद्या अनुभवी खेळाडूसारखी होती. त्या दिवशी नीरजला त्याच्या आयुष्याच ध्येय मिळालं. (Neeraj Chopra VS Arshad Nadeem)

जसं अर्शदला सय्यद हुसेन बुखारीनं भालाफेककडे वळवलं, तसचं नीरजला जय चौधरी यांनी भालाफेक कडे वळवलं. अर्शदने २०१६ ला भारतात झालेल्या साऊथ एशियन गेम्स मध्ये ७८.३३ मीटर लांब भालाफेकत नॅशनल आणि पर्सनल रेकॉर्ड बनवला होता, पण त्याला ब्रॉन्झ मेडल वर समाधान मानावं लागलं होत. पण ही त्याची सुरुवात होती. २०१८ च्या एशियन गेम्स मध्ये पुन्हा त्याने ब्रॉन्झ मेडल जिंकत नवा पर्सनल आणि नॅशनल रेकॉर्ड बनवला, जो ८०.७५ मीटर होता. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक अँड फील्ड इवेंट मध्ये पोहचणारा तो पहिला पाकिस्तानी ठरला.

पण त्याला या ऑलिम्पिकमध्ये ५व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. आणि त्यानंतर स्वत:वर प्रचंड मेहनत घेत, त्याने २०२२ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये खांद्याची आणि गुडघ्याची दुखापत असूनही ९०.१८ मीटर लांब भाला फेकला, जे अशक्य होतं. ९० मीटर च्या पुढे भाला फेकणारा तो पहिला साऊथ एशियन ठरला. आणि २०२४ मध्ये त्याने जे केलं आहे, ते पाकिस्तानच्या क्रीडा इतिहासात अजरामर झालं आहे. ९२.९७ मीटर लांब भाला फेकून त्यांने ऑलिम्पिक रेकॉर्ड मोडत गोल्ड मेडल स्वतच्या नावावर केलं. (Neeraj Chopra VS Arshad Nadeem)

=================

हे देखील वाचा : शूटिंग प्रकारात पदक जिंकणारी भारताची पहिली महिला !

================

आता हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे, हाच अर्शद नदीम पुढे येणाऱ्या सर्व महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये नीरज समोर मोठा प्रतिस्पर्धी म्हणून उभा आहे. सर्वात जास्त मेडल आणि वर्ल्ड चॅम्पियनशीप नीरजकडे असून सुद्धा नीरजचा एकही भाला अजून पर्यंत ९० मीटर पार गेलेला नाही. त्याचा Highest थ्रो चा रेकॉर्ड ८९.९४ मीटर इतका आहे. म्हणूनच येणाऱ्या काळात अर्शद नदीम हा नीरजच्या समोर एक मोठं आव्हान असेल. सकारात्मक गोष्ट म्हणजे नीरज ने थ्रो मध्ये ठेवलेली Consistency गेल्या काही स्पर्धांमध्ये त्याचा एकही थ्रो ८८ मीटरच्या खाली आलेला नाहीये. नीरजच्या स्वत:च्या म्हणण्यानुसार “जरी मी अद्याप 90 मीटर ओलांडली नाही आणि सर्वांना वाटेल की मी असे बोलत आहे, परंतु माझ्या मनात असही होतं की मी आज हे करेन. पण आजही तसं झालं नाही. त्यामुळे आता ते कधी होणार हे बघूया. त्यामुळे आता जरी समोर आव्हान मोठ असलं तरी ते हिंमतीने आणि मेहनतीने नीरज पार करेलच याची खात्री आहे. (Neeraj Chopra VS Arshad Nadeem)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.