राजस्थान केडरच्या महिला अधिकारी नीना सिंह (Neena Singh) आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे नेतृत्व करणार आहेत. त्यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच CISF चे DG म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नीना सिंह हे नाव सर्वसामान्यांना नवीन असले तरी गुन्हेगारांच्या मनात या नावाची मोठी दहशत आहे. नीना सिंग यांनी अनेक हायप्रोफाईल प्रकरणांचा तपास केला आहे. आर्थिक घोटाळ्यांच्या प्रकरणांच्या तपासात त्यांचा हातखंडा आहे. आर्थिक विषयाच्या त्या अभ्यासकही आहेत. एक लेखिका म्हणूनही त्यांची ओळख आहे. यासोबत कठोर पोलीस अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. राजस्थान केडरच्या नीना सिंह, राजस्थानकी शेरनी म्हणूनही प्रसिद्ध आहेत. आता याच नीना सिंह (Neena Singh) यांच्या हातात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची जबाबदारी आली आहे. देशभरातील विमानतळ, दिल्ली मेट्रो, सरकारी इमारती आणि मोक्याच्या आस्थापनांच्या सुरक्षेसाठी जबाबदारी आता त्या पार पाडणार आहेत.
नीना सिंग (Neena Singh) या सीआयएसएफ प्रमुख बनणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. नीना सिंह यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच CISF च्या प्रमुख बनून इतिहास रचला आहे. आयपीएस अधिकारी नीना सिंग सध्या सीआयएसएफच्या विशेष महासंचालक आहेत. आता नवी जबाबदारी मिळाल्यामुळे देशभरातील विमानतळ, दिल्ली मेट्रो, सरकारी इमारती आणि मोक्याच्या आस्थापनांच्या सुरक्षेची जबाबदारी नीना यांच्या खांद्यावर आली आहे.
नीना सिंग (Neena Singh) या राजस्थान केडरमध्ये वाटप झालेल्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत. 1989 च्या बॅचच्या नीना सिंग सध्या शिल्वर्धन सिंग यांच्या निवृत्तीनंतर CISF महासंचालकपदाचा अतिरिक्त पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. आता 31 जुलै 2024 पर्यंत म्हणजेच सेवानिवृत्तीच्या तारखेपर्यंत नीना या याच जबाबदारीवर राहणार आहेत. राजस्थानमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. 2013-18 दरम्यान त्यांनी सीबीआयमध्ये सहसंचालक म्हणून काम केले आहे. यावेळी नीना यांनी अनेक उच्च-प्रोफाइल प्रकरणांचा तपास केला आहे. त्या 2021 पासून CISF मध्ये कार्यरत आहेत.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या या पदावर पोहोचणाऱ्या नीना सिंह या पहिल्या महिला अधिकारी आहेत. याआधी नीना सिंह यांनी राजस्थानमध्ये अनेक मोठ्या पदांवर काम केले आहे. डीजी होण्यापूर्वी नीना सिंह सीआयएसएफच्या अतिरिक्त महासंचालक किंवा एडीजी होत्या. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना 2005 मध्ये पोलीस पदकही देण्यात आले आहे. नीना सिंग (Neena Singh) या मूळच्या बिहारची राजधानी पाटणा येथील आहेत. त्यांनी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. नीना सिंह यांचे पती, रोहित कुमार सिंह हे देखील राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत.
============
हे देखील वाचा : नागरीवस्तीचा समावेश असलेली नगरी म्हणजेच नागरी शैली
============
नीना सिंह (Neena Singh) यांनी अनेक हायप्रोफाईल प्रकरणांचा तपास केला आहे. सीबीआयमध्ये असताना नीना सिंह यांनी भ्रष्टाचार, आर्थिक गुन्हे, बँक फसवणूक आणि क्रिकेट बेटींग संबंधित अनेक प्रकरणे हाताळली आहेत. PNB घोटाळा आणि नीरव मोदीसह महत्त्वाच्या प्रकरणांच्या तपासाचाही त्यांच्याकडे होता. प्रशासनात विशेष भूमिका बजावलेल्या नीना सिंग यांना लेखनाचीही विशेष आवड आहे. त्यांनी अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी आणि एस्थर डुफ्लो यांच्यासोबत संशोधन निबंधांचे सह-लेखन केले आहे. याशिवाय त्या राजस्थान राज्य महिला आयोगाच्या सदस्य-सचिवही होत्या. कोरोना महामारीच्या काळात सिंह यांनी राजस्थानमध्ये प्रधान सचिव, आरोग्य विभागाची जबाबदारी सांभाळली आहे.
राजस्थानच्या नीना सिंह यांना राजस्थानकी शेरनी या नावानं ओळखण्यात येतं. अत्यंत कुशल प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची संपूर्ण कमान त्यांच्याकडे आहे.
सई बने