नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी ‘क्लीन चिट’ दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. आर्यन खानला एनसीबीने गेल्या वर्षी मुंबईत क्रूझ छाप्यादरम्यान इतर अनेकांसह अटक केली होती आणि त्यांच्याकडून ड्रग्ज जप्त केल्याचा दावा केला होता. अनेक आठवडे तुरुंगवास भोगल्यानंतर आर्यन खानला कोर्टातून जामीन मिळाला.
ड्रग-ऑन-क्रूझ प्रकरणात एनसीबीने शुक्रवारी विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले, ज्यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला आरोपी बनवले गेले नाही. एनसीबीचे डीडीजी (ऑपरेशन) संजय कुमार सिंह यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आर्यन आणि मोहक वगळता सर्व आरोपींकडून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
एनसीबी अधिकाऱ्याच्या निवेदनात म्हटले आहे की एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांतर्गत 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पुराव्याअभावी उर्वरित 6 जणांविरुद्ध तक्रार नोंदवली जात नाही.
====
हे देखील वाचा: करण जोहरच्या पार्टीत ब्रालेटवर ब्लेझर घालून आलेल्या मलायकाला नेटकऱ्यांनी केले ट्रोल
====
काय होते संपूर्ण प्रकरण, आर्यनला का करण्यात आली अटक?
आर्यन खानला 2 ऑक्टोबर 2021 च्या रात्री मुंबईतील क्रूझ शिप टर्मिनलमधून एनसीबी टीमने पकडले होते. आर्यन खानसोबत त्याचा मित्र अरबाज मर्चंटलाही एनसीबीने पकडले.
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावर ड्रग पार्टी होणार होती आणि आर्यन खान या पार्टीत सहभागी होणार असल्याचा आरोप एनसीबीने केला आहे. एनसीबीला आर्यनजवळ अमली पदार्थ सापडले नसले तरी अरबाजच्या शूजमधून ड्रग्ज पकडण्यात आले.
या प्रकरणी आर्यन खान 26 दिवस आर्थर रोड तुरुंगात होता
आर्यन खान काही दिवस एनसीबीच्या कोठडीत होता, त्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. आर्यनला मुंबईतील आर्थर रोल जेलमध्ये ठेवण्यात आले असून त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने दोनदा फेटाळला होता.
====
हे देखील वाचा: 21 वर्षीय बंगाली मॉडेल-अभिनेत्रीची आत्महत्या, भाड्याच्या फ्लॅटमध्ये सापडला मृतदेह
====
26 दिवस आर्थर रोड तुरुंगात राहिल्यानंतर 28 ऑक्टोबर 2021 रोजी आर्यन खानला कोर्टातून जामीन मिळाला होता. आर्यन खान व्यतिरिक्त या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अन्य 19 आरोपींपैकी 2 वगळता सध्या सर्वजण जामिनावर बाहेर आहेत.