सीमेच्या पलीकडे आणि या बाजूला सुद्धा शोक आहे. लोकप्रिय पाकिस्तानी गायिका नय्यारा नूर (Nayyara Noor) यांच्या चाहत्यांच्या एक मोठा वर्ग भारतात सुद्धा आहे. का नसावा? संगीतासाठी सीमा कुठे महत्वाच्या असतात. आणि त्यांचा भारताशी सखोल संबंध राहिला आहे. दिग्गज गायिका नूर यांचा जन्म हा भारतातच झाला होता. आपल्या आयुष्याची सुरुवात भारतात झाली पण आपला अखेरचा श्वास पाकिस्तानातील कराची मध्ये घेतला. त्या ७१ वर्षाच्या होत्या.
पाकिस्तानातील दिग्गज गायिका राहिलले्या नय्यारा नूर यांचा जन्म आसाम मधील गुवाहटी मध्ये झाला होता. १९५० मध्ये जन्मलेल्या नूर यांचे वडिल एक उद्योगपती होते आणि त्यांचा थेट संबंध ऑल इंडिया मुस्लिम लीग सोबत होते. नय्यारा यांचे लहानपण हे गुवाहटी मध्ये गेले. जवळजवळ वयाच्या ७ व्या वर्षापर्यंत त्या तेथेच वाढल्या.
जेव्हा त्या ७ वर्षाच्या होत्या तेव्हा त्या संपूर्ण परिवारासह पाकिस्तानात गेल्या. ही बाब सर्वांना आश्चर्यचकित करु शकते की, त्यांनी संगीताची कोणतीही ट्रेनिंग घेतली नव्हती. त्यांना लहानपणापासूनच गायनाची आवड होती. त्या सुरुवातीपासूनच भजन गायिका कानन देवी आणि गजल गायिका बेगम अख्तर यांची गाणी ऐकायच्या.

कोणतेही औपचारिक प्रक्षिण न घेतल्याशिवाय त्या गायनाच्या क्षेत्रात आल्या आणि धम्माल केली. पाकिस्तानात त्यांना सुरांची मालिका असे म्हटले गेले. फैज अहमद फैज ते गालिब यांच्यापर्यंतच्या नज्मांसाठी त्यांनी आपला आवाज दिला. त्यांनी अहमद रुश्दी आणि मेहंदी हसन सारख्या प्रसिद्ध गायकांसोबत सुद्धा परफॉर्म केले होते.
हे देखील वाचा- देशाच्या राष्ट्रपतींच्या मृत्युचाच उलगडा करु शकला नाही पाकिस्तान, नक्की काय झाले होते?
तर २००६ मध्ये पाकिस्तानच्या राष्ट्रपतींकडून नय्यारा नूर (Nayyara Noor) यांना प्राइड ऑफ परफॉर्मेन्स अवॉर्डसह बुलबुल-ए-पाकिस्तानची उपाधीने सन्मानित केले होते. रविवारी जेव्हा त्यांच्या निधनाची बातमी आली तेव्हा पाकिस्तानातच नव्हे तर हिंदुस्तानात सुद्धा लोक दु:खी झाले. त्यांना नेहमीच आपल्या गाण्यांशी आणि गजल यांच्यासाठी नेहमीच आठवले जाईल.
जेव्हा नय्यारा यांनी गाणार नसल्याचे जाहीर केले…
२०१२ मध्ये लग्नानंतर नय्यारा नूर यांनी अधिकृतपणे घोषणा करत त्या आता प्रोफेशनलच्या आधारावर गाणार नाही असे म्हटले होते. त्यांना आई आणि पत्नी होण्याची जबाबदारी सांभाळणे अधिक महत्वाचे वाटले आणि हा मोठा निर्णय घेतला. त्यांनी असे ही म्हटले की, संगीत त्यांचे पॅशन आहेच पण प्राथमिकता नाही.