Home » Navratri : जाणून घ्या घटस्थापनेत धान्य पेरण्याचे महत्व

Navratri : जाणून घ्या घटस्थापनेत धान्य पेरण्याचे महत्व

by Jyotsna Kulkarni
0 comment
ghatasthapana
Share

आजपासून शारदीय नवरात्राची सुरुवात झाली आहे. आज अनेक सार्वजनिक मंडळांमध्ये देवीच्या मूर्तीची स्थापना झाली असेल. यासोबतच घरांमध्ये देखील घट बसवले गेले असतील. नवरात्रीमध्ये घट बसवण्याला मोठे महत्व आहे. काळ्या मातीवर कलश ठेऊन त्यावर ताम्हण ठेवले जाते. या ताम्हनामध्ये श्रीफळ ठेवतात आणि त्यावर फुलांची किंवा विड्याच्या पानाची माळ लावली जाते. आता घट बसवण्याच्या पद्धतीमध्ये देखील अनेक बदल दिसून येतात. याशिवाय अखंड दिवा आणि नऊ दिवसाचे उपवास देखील ठेवले जातात. मुख्य म्हणजे घटामध्ये कलशाखाली असलेल्या काळ्या मातीमध्ये धान्य टाकले जाते. (Ghatasthapana)

घटस्थापना म्हणजे काय तर, घटस्थापनेतील नारळ हा स्त्रीच्या गर्भाशयाचे आणि पृथ्वीतत्वाचे प्रतीक मानला गेला आहे. आपल्या हिंदू संस्कृतीनुसार स्त्री आणि जमीन यांना मातेचा दर्जा दिला आहे. ज्याप्रकारे स्त्रीच्या उदरातून एक नवा जीव जन्माला येतो त्याचप्रमाणे घटामध्ये पेरलेले धान्याचे बीज जमीनीच्या पोटात अंकुरित होते. म्हणूनच घटस्थापना करताना धान्य देखील पेरली जातात. धान्य पेरण्याची प्रथा अतिशय प्राचीन असून तिला बीजारोपण किंवा नवधान्य पेरणी असेही म्हणतात. नऊ दिवसांच्या या नवरात्रोत्सवामध्ये हे पेरलेले धान्य उगवते. हे धान्य पेरण्यामागे देखील एक शास्त्र आहे ते कोणते चला जाणून घेऊया. (Marathi News)

अनेक घटांमध्ये घट बसवल्यानंतर त्यात नऊ प्रकारचे मिक्स धान्य पेरले जाते. गहू, ज्वारी, तांदूळ, मटकी, हरभरा, तूर, मूग, तीळ आणि चणा ही नऊ धान्ये सर्वसाधारणपणे पेरली जातात. प्रदेशानुसार धान्ये थोडीफार बदलतात. ही नऊ धान्ये नऊ ग्रह आणि पंचमहाभूतांचे प्रतीक मानली जातात. काही ठिकणी कोणतेही एकच धान्य पेरले जाते. (Navratri 2025)

शास्त्रानुसार धान्य हे ब्रह्मदेवाचे रूप मानले जाते. घटस्थापना करताना धान्य लावले जाते. धान्य भविष्यातील संकेत दर्शवतात. असे मानले जाते की जेव्हा नवरात्रीत धान्याची पेरणी केली जाते आणि जेवढे धान्य वाढते तेवढी देवी आशीर्वाद देते. यावरुन एखाद्याच्या घरातही सुख आणि समृद्धी टिकून असते हे दिसते. असे म्हणतात की जर धान्याचे अंकुर २ ते ३ दिवसात आले तर ते खूप शुभ आहे. (Todays Marathi Headline)

ghatasthapana

बर्‍याच वेळा असे घडते की जरी आपण नीट धान्य पेरले नाही तही धान्य उगवत नाही. याशिवाय, असेही म्हटले जाते की धान्याचा रंग देखील शुभ आणि अशुभवर अवलंबून असतो. जर धान्याचा वरचा अर्धा भाग हिरवा असेल परंतु खालचा भाग पिवळा असेल तर दर्शविते की त्या व्यक्तीचे अर्धे वर्ष चांगले आहे आणि बाकीचे सर्व त्रासांनी भरलेले आहे. त्याच वेळी, जर धांन्याचा रंग पूर्णपणे हिरवा किंवा पांढरा असेल तर हे दर्शविते की त्या व्यक्तीचे संपूर्ण वर्ष खूप चांगले असेल. तसेच, जीवनात अफाट आनंद आणि समृद्धीची चिन्हे आहेत. (Top Marathi Headline)

अनेक ठिकाणी घटाच्या मातीमध्ये ‘जव’ पेरली जाते. यामागचे कारण म्हणजे जवाला अन्नपूर्णा देवीचा मान दिला गेला आहे. देवीसोबत अन्नपूर्णा देवीची देखील पूजा व्हावी असा यामागचा हेतू आहे. मान्यतेनुसार सृष्टीच्या प्रारंभानंतर सर्वात आधी जवाचे पीक घेतले गेले होते. जव किंवा गहू या अन्नाला हिंदूशास्त्रात ब्रम्ह देवतेचा मान दिला जातो. यामुळे नवरात्रीत याची पूजा केली जाते. (Marathi Headline)

जेव्हा जेव्हा देवी देवतांना साक्षी माणून यज्ञ करण्यात येते तेव्हा जवाला खूप महत्व दिले जाते. जवाच्या वाढीवरून भविष्यातील घटनांचा अंदाज बांधला जाऊ शकतो, असा एक मतप्रवाह आहे. असे म्हटले जाते की, जर जवाची वाढ योग्य प्रकारे नाही झाली तर पाऊस कमी प्रमाणात पडेल आणि त्यावर्षी पिक कमी प्रमाणात होईल. यामुळे भविष्यावर परिणाम होऊ शकतो. (Latest Marathi News)

========

Navratri : पहिली माळ : नवदुर्गेचे प्रथम स्वरुप- शैलपुत्री देवी

Navratri : ‘या’ मंदिरात देवीला प्रसन्न करण्यासाठी चक्क दिल्या जातात शिव्या

========

काही ठिकाणी सातूचे धान्य पेरले जाते. धार्मिक मान्यतानुसार सातूचे धान्य हे धान्याचा सर्वात प्राचीन प्रकार मानला जातो. नवरात्राच्या पहिल्या दिवशी जर सातूचे धान्य पेरलेले व्यवस्थित उगवले, तर ते वर्षभर घरात सुख-शांती, आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य राहील, असे मानले जाते. उलट, जर उगवण कमी झाली तर ते आगामी काळातील अडचणींचा इशारा मानला जातो. त्यामुळे या परंपरेला शुभ आणि मंगलकारी अर्थ दिला जातो. (Top Tredning News)

नवरात्रीमध्ये घटामध्ये धान्य पेरणे याला धार्मिक आधार नक्कीच आहे. मात्र यासोबचत जर आपण आजच्या आधुनिक काळात वैज्ञानिक दृष्टिकोनातून या धान्याच्या पेरणीचा विचार केला तर घरात उगवलेली ही छोटी हिरवी रोपे ऑक्सिजन निर्माण करतात, घरातील हवेत ताजेपणा आणतात आणि निसर्गाशी आपले नाते दृढ करतात. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.