Home » Navratra : चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्रामधील नेमका फरक कोणता?

Navratra : चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्रामधील नेमका फरक कोणता?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Navratra
Share

अवघ्या काही दिवसातच शारदीय नवरात्राची सुरुवात होत आहे. आदिमाया, आदिशक्ती देवीचा उदो उदो या काळात केला जातो. देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्यासोबतच, देवीचे पाठ देखील नवरात्रींमध्ये केले जातात. शारदीय नवरात्रीचे महत्व अनन्यसाधारण आहे. महिषासुर आणि आदिशक्तीमध्ये नऊ दिवसांचे मोठे युद्ध झाले आणि दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा नाश केला. त्यामुळे या नवरात्रींमध्ये असत्याचा सत्यावर झालेला विजय साजरा केला जातो. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीमध्ये शारदीय नवरात्र साजरे केले जाणार आहे. (Navratri)

दरम्यान नवरात्रीचा उत्सव आपण वर्षभरामध्ये चार वेळा साजरा करत असतो. यातले एक चैत्र नवरात्र, दुसरे शारदीय नवरात्र आणि दोन गुप्त नवरात्रीचा समावेश असतो. आषाढ आणि माघ महिन्यातील नवरात्र गुप्त पद्धतीने साजरे केले जाते. उरलेल्या दोन नवरात्राची माहिती सगळ्यांनाच असते. केवळ चैत्र आणि शारदीय नवरात्र ही गृहस्थ आणि कौटुंबिक जीवन जगणाऱ्यांसाठी शुभ मानली जाते. मग चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र यात नेमका काय फरक असतो? दोन्ही नवरात्रीच्या उपासनेची पद्धत जवळपास सारखीच आहे, पण दोन्हींचे व्रत पाळण्यात फरक आहे आणि दोन्हींचेही महत्त्व वेगळे आहे. (Marathi News)

मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी या कालावधीत वर्षातील पहिले नवरात्र साजरे केले जाते. चैत्र नवरात्रातील नवमी राम नवमी म्हणून ओळखली जाते. म्हणूनच याला राम नवरात्र असेही म्हटले जाते. वसंत ऋतुच्या सुरुवातीला हे नवरात्र येत असल्यामुळे याला वासंतिक नवरात्र असेही म्हटले जाते. शरद ऋतुच्या सुरुवातीला साजरे केले जात असल्यामुळे अश्विन नवरात्राला शारदीय नवरात्र म्हटले जाते. चातुर्मासातील अश्विन महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून ते विजयादशमी म्हणजेच दसऱ्यापर्यंत हे नवरात्र असते. अश्विन नवरात्रात देवीच्या मूर्तीची स्थापना करून दसऱ्याला विसर्जन केले जाते. (Todays Marathi News)

Navratra

चैत्र शुक्ल पक्षात चैत्र नवरात्र साजरे केले जाते. हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात मानला जातो. मराठी लोक हा सण गुढीपाडवा म्हणून साजरा करतात. तर काश्मिरी हिंदू ‘नवरे’ म्हणून आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातील हिंदू तो ‘उगादी’ म्हणून साजरा करतात. हा नऊ दिवसांचा उत्सव असतो. या सणाला ‘रामाचे नवरात्र’ देखील म्हटले जाते. भगवान रामाच्या जन्मदिवस अर्थात ‘रामनवमी’ला या चैत्र नवरात्राची समाप्ती होते. चैत्र नवरात्राला देवीची आराधना केल्याने लोक मानसिकदृष्ट्या मजबूत होतात आणि आध्यात्मिक इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते. (Top Marathi News)

शारदीय नवरात्र हे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरे केले जाते. नऊ दिवसांच्या दीर्घ युद्धानंतर महिषासुर राक्षसाचा देवी दुर्गेने वध केला होता आणि त्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. शारदीय नवरात्राबद्दल सांगितलेली आणखी एक कथा अशी आहे की, राम आणि रावणाच्या अंतिम युद्धामध्ये रावणाचा पराभव करण्यासाठी भगवान रामाने दुर्गा देवीच्या सर्व नऊ रूपांची पूजा केली. यानंतर भगवान रामाने दहाव्या दिवशी रावणाचा वध केला. यामुळे नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि दहाव्या दिवशी रामाने रावणाचा वध केल्यामुळे दसरा अर्थात विजयादशमी साजरी होते आणि रावण दहन केले जाते. (Latest Marathi News)

शारदीय नवरात्री हा पूर्णपणे शक्तीच्या उपासनेचा दिवस मानला जातो. असे मानले जाते की, चैत्र नवरात्रीची आराधना तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते आणि तुमच्या आध्यात्मिक इच्छा पूर्ण करते. दुसरीकडे, शारदीय नवरात्रीला सांसारिक इच्छा पूर्ण करणारी मानले जाते. (Top Trending News)

=========

Navratra : घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Navratra : शारदीय नवरात्र का साजरे केले जाते?

=========

शारदीय नवरात्राचा मुहूर्त आणि शुभ वेळ
पंचांगानुसार आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी सोमवारी २२ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ०१ वाजून २३ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी २३ सप्टेंबर रोजी रात्री ०२ वाजून ५५ मिनिटांनी समाप्त होईल. उदय तिथीनुसार शारदीय नवरात्रीची सुरुवात २२ सप्टेंबर पासून होईल. याच दिवशी घटस्थापना करून दुर्गा देवीच्या पूजेला सुरुवात केली जाईल. २२ सप्टेंबर रोजी घटस्थापनेसाठी शुभ वेळ सकाळी ०६ वाजून ०९ मिनिटांपासून सकाळी ०८ वाजून ०६ मिनिटांपर्यंत आहे. अभिजित मुहूर्तामध्ये दुपारी ११ वाजून ४९ मिनिटांपासून दुपारी १२ वाजून ३८ मिनिटांपर्यंतही घटस्थापना करता येईल. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.