आज नवरात्रीचा आठवा दिवस अर्थात अष्टमी. शारदीय नवरात्र सुरु होऊन आठ दिवस झाले आणि आता हे नवरात्र समाप्तीकडे आले आहे. नवरात्रातील अष्टमीचे मोठे महत्त्व आहे. या दिवशी देवीसमोर होम केला जातो, शिवाय कुमारिका पूजन देखील केले जाते. नवरात्रीच्या काळात भाविक देवीच्या विविध मंदिरांमध्ये जाऊन तिचे दर्शन घेते तिचा आशीर्वाद घेतात. महाराष्ट्रामध्ये देवीची अगणित जाज्वल्य मंदिरं आहेत. यातलेच एक प्रसिद्ध मंदिर म्हणजे नाशिकचे कालिका देवी मंदिर. (Navrtari)
नाशिकच्या जुन्या आग्रारोड नजीक असलेले कालिकेचे मंदिर म्हणजे नाशिकच्या वैभवातील एक मानाचे पान आहे. नाशिकचे ग्रामदैवत म्हणून कालिका मंदिराची ओळख आहे. नवरात्रीच्या दिवसांत नाशिकचे सर्व रस्ते कालिकेच्या मंदिराकडे आपसूकच वळतात. नाशिककरांसाठी नवरात्र म्हणजे कालिका मंदिराची यात्रा. नाशिकमधील प्रत्येक व्यक्ती नवरात्राच्या दिवसांमध्ये कालिका मंदिरात एकदा तरी दर्शनासाठी जातोच जातो. कोणी पायी जातात, कोणी पहाटेच्या काकड आरतीला जातात तर कोणी रात्री शयन आरतीला. नवरात्रामध्ये नाशिककरांसाठी कालिकेला जाणे म्हणजे शास्त्र असते ते. (Marathi News)
कालिका देवीचे मंदिर हे नाशिकच्या अगदी मध्यवर्ती भागात स्थित आहे. या देवस्थानाचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी इ. स. १७०५ च्या सुमारास केला. त्यांनी बांधलेले दगडी मंदिर दहा बाय दहा फूट लांबीचे व पंधरा फूट उंचीचे होते. त्या जवळच एक बारव होती. गावातील मंडळी सीमोल्लंघनासाठी कालिकामाता मंदिरापर्यंत येऊ लागली. तेव्हापासून देवी मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप येऊ लागले. त्यावेळी कालिकेच्या मंदिराचा आतला भाग अतिशय लहान होता. बाहेरचा सभा मंडपही पत्र्याचा आणि लहान असल्यामुळे यात्रेच्यावेळी भाविकांना दर्शन घेताना अत्यंत अडचण होत असे. हे पाहून लोकांनी या मंदिराच्या विस्ताराची मागणी केली. (Todays Marathi News)
तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. वसंतराव गुप्ते यांनी २० डिसेंबर १९७४ रोजी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन केले. त्यानंतर सहा वर्षांनी १९८० साली सध्या आग्रारोड वर उभे असलेले श्रीकालिका देवीचे अतिशय सुंदर कलाकुसर करून नटलेले मंदिर तयार झाले. या मंदिराचा गाभारा अठरा बाय अठरा फुटांचा तर शिखर ३० फूट उंच आहे. गाभार्या पुढचा सभामंडप ४० बाय ६० फूट एवढा मोठा आहे. मंदिराला दोन्ही बाजूंना भव्य प्रवेशदार असून, संपूर्ण परिसराला फरशी बसवण्यात आली आहे. (Top Marathi News)
कालिका मंदिराचा गाभारा चांदीच्या कलाकुसरयुक्त पत्र्याने सुशोभित करण्यात आला आहे. या गाभार्यात उंच ओट्यावर महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली या तीन देवींच्या मुख्य मूर्ती आहेत. पूर्वी या ठिकाणी फक्त कालिकेची शेंदूरचर्चित मूर्ती होती पण तिचे कवच काढून हल्लीची नयनमनोहर मूर्ती तयार करून घेण्यात आली आहे. येथे श्रीकालिका माता कुमारिकेच्या स्वरूपांत आहे. तिचे स्वरूप चंडिकेसारखे उग्र नसून एखाद्या लहान बालिकेसारखे अतिशय लोभस आणि सात्विक आहे. (Latest Marathi Headline)
देवीच्या मागे नऊ फण्यांचा शेषनाग दिसतो आहे. तिच्या पायाखाली तीन राक्षसांची मुंडकी आहेत. त्यावर कालिकादेवी उभी आहे. तिच्या उजव्या बाजूंच्या हातांत त्रिशूल व तलवार तर डाव्या बाजूंच्या हातांत डमरू व खडग आहे. तसेच कमंडलू सारखे भांडे देखील आहे. सुरुवातीला हे फक्त कालिका मातेचे मंदिर होते. कालांतराने तिवारी, मेहेर, वाजे या देवीभक्तांनी महालक्ष्मी व महासरस्वती यांच्या मूर्ती मंदिराला भेट दिल्या. त्यानंतर थेट जयपूरहून देवींच्या तिन्ही मूर्ती तयार करून, त्यांची यथासांग प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. (Top Trending News)
=========
Dussehra : वाईटचे प्रतीक असणाऱ्या रावणामध्ये देखील होते ‘हे’ सद्गुण
Ramayana : रावणाशी युद्ध जिंकल्यानंतर रामाची वानरसेना गेली कुठे?
=========
नवरात्रोत्सवात श्रीकालिका देवीला रोज पहाटे २ ते ४ या वेळेत गुलाबपाणी, पंचामृत, शुद्धपाण्याने अभिषेक करून साडी नेसवली जाते व संपूर्ण साजशृंगार केला जातो. रोज सकाळी ६ वाजता व सायंकाळी ७ वाजता देवीची आरती केली जाते. ही सर्व पूजा देवीचे पुजारी करतात. तसेच दररोज मान्यवरांच्या हस्ते महापूजा व आरती करण्यात येते.श्रीकालिकामाता हे नाशिकचे ग्रामदैवत असल्याने स्थानिक भाविकांबरोबरच इतर भाविकांची देखील अपार श्रद्धा या देवीवर आहे. नवरात्रामध्ये पालिकेची मोठी यात्रा भरते. या यात्रेसाठी अनेक मुख्य रस्ते देखील नऊ दिवस बंद ठेवण्यात येतात. या यात्रेमध्ये नानाविध प्रकारची खाण्याची, विविध वस्तूंची दुकानं सजतात. आकर्षक उंच रहाटपाळणे हे या यात्रेचे वैशिष्ट्ये असते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics