Home » Makeup : गरबा खेळताना घाम आल्याने मेकअप टिकत नाही? मग ‘या’ टिप्स करा फॉलो

Makeup : गरबा खेळताना घाम आल्याने मेकअप टिकत नाही? मग ‘या’ टिप्स करा फॉलो

by Jyotsna Kulkarni
0 comment
Makeup
Share

नवरात्र म्हणजे देवीच्या आराधनेचा काळ, या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा आणि उपासना केली जाते. मात्र या नवरात्राचे सर्वात मोठे आकर्षण असते गरबा. नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीसमोर रात्री गरबा रास खेळला जातो. ही पण एक प्रकारे देवीची भक्ती आहे. नवरात्रीच्या काळात महिला, पुरुष खास प्रकारचा पोशाख घालून देवीसमोर गरबा करतात. गरबा जास्तकरून गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर खेळाला जातो. गरब्यासोबतच दांडिया देखील खेळल्या जातात. गरबा खेळायला जाताना आपल्या पोशाखाला सूट होईल असा मेकअप आणि हेयरस्टाइल देखील करण्याचा ट्रेंड मधल्या काही काळापासूनच खूपच वाढताना दिसत आहे. (Marathi)

गरब्यासाठी लागणारे रंगबेरंगी घागरे आणि त्यावर केला जाणारा मेकअप तरुणींमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. पण अनेकदा आपल्यासोबत असे होते की, आपण गरबा भरपूर गरबा खेळल्यानंतर आणि खेळताना आपल्याला भरपूर घाम येतो आणि या घामामुळे आपला मेकअप खराब होतो आणि चेहरा विचित्र दिसतो. आपण किती चांगला ब्रँडेड मेकअप केला तरी त्याचे देखील हेच हाल होतात. मग अशा  वेळेस कोणत्या टिप्स वापराव्या जेणेकरून आपला मेकअप दीर्घकाळ टिकेल आणि आपण किती गरबा खेळलो तरी मेकअप खराब होणार नाही.(Navratri Makeup)

दांडिया नाइटसाठी जाताना प्रत्येक स्त्रीला आपण इतरांपेक्षा आकर्षक दिसावे असे वाटते. त्यासाठी सुंदर पेहराव तर निवडता येतोच; पण मेकअपही साजेसा व सुंदर करता येऊ शकतो. मेकअप करताना तो वॉटरप्रूफ असावा याकडे लक्ष द्यावं. म्हणजे घाम आला तरी मेकअप खराब होणार नाही व तुमचा लूक आहे तसा राहील. जाणून घेऊया यासाठी खास टिप्स. (Todays Marathi Headline)

सर्वप्रथम, चेहरा पूर्णपणे धुवा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमच्या चेहऱ्याला बर्फाने मसाज देखील करू शकता. तुमच्या त्वचेवर मेकअप बराच काळ टिकून राहण्यासाठी १५ ते २० मिनिटे बर्फाने हलकेच मसाज करा. मसाज केल्यानंतर, हलक्या हातांनी चेहरा पुसून टाका. यामुळे मेकअप जास्त वेळ टिकण्यास मदत होते. (Top Marathi Headline)

गरबा किंवा दांडिया नाइटला जाताना मेकअप करण्याआधी नेहमी प्रायमरचा वापर करा. कारण गरबा खूप जास्त कालावधीसाठी खेळला जातो. तेवढा वेळ तुमचा मेकअप टिकवायचा असेल, तर प्रायमर उपयोगी ठरते. मुख्य म्हणजे लिपस्टिकची निवड तुम्ही तुमच्या मेकअपनुसार करा. मेकअप जास्त गडद असेल, तर लिपस्टिक हलक्या रंगाची लावा आणि याउलट हलका मेकअप असेल, तर गडद लिपस्टिक लावा. म्हणजे तुमचा मेकअप हायलाइट होईल. (Latest Marathi News)

चेहऱ्याच्या मेकअपमध्ये डोळ्यांचा मेकअप सर्वात महत्वाचा असतो. डोळ्यांवर आयशॅडो जास्त काळ टिकवण्यासाठी क्रीम बेस्ड आयशॅडोचा वापर करा. तुमच्या पोषाखाला साजेसा रंग यात निवडा. यामुळे तुमच्या डोळ्यांचा मेकअप दीर्घ काळ तसाच राहील. अशा कार्यक्रमांमध्ये मेकअपचे जास्त थर देणं टाळावं. कारण घाम आला तर असा मेकअप लगेच खराब होऊ शकतो. मेकअप स्प्रे तसा जास्त वापरु नये. पण गरबा करताना, मेकअप तुमच्या चेहऱ्यावर स्मज होऊ नये म्हणून, मेकअप केल्यानंतर, मेकअप स्प्रे नक्कीच वापरा. ​​यामुळे तुमचा मेकअप तुमच्या त्वचेवर बराच काळ टिकेल. (Top Trending News)

======

Navratri : नवरात्रामध्ये अखंड दिवा लावताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

======

गरबा खेळताना घाम येऊन मेकअप खराब होऊ नये म्हणून तुम्ही सेटींग पावडर देखील लावू शकता. यामुळे घाम जास्त येत नाही आणि मेकअपही चांगला टिकतो. गरबा आणि दांडियाला जाताना केस मोकळे कधीच सोडू नयेत. केस मोकळे असले की, घामामुळे केस चिकट होतात आणि अंगाला. चेहऱ्याला चिकटू शकतात. त्यामुळे अंबाडा, पोनीटेल किंवा साजेशी हेअरस्टाइल करावी. यामुळे जास्त घाम येणार नाही, मेकअपही खराब होणार नाही. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.