Home » Navratri : नवरात्रीमध्ये केल्या जाणाऱ्या उपवासाचे नियम

Navratri : नवरात्रीमध्ये केल्या जाणाऱ्या उपवासाचे नियम

by Jyotsna Kulkarni
0 comment
Navratri
Share

शारदीय नवरात्र सुरु होण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. वर्षातला महत्वाचा सण म्हणून शारदीय नवरात्राची ओळख आहे. नवरात्र म्हणजे नऊ दिवस देवीची केली जाणारी उपासना. शारदीय नवरात्रामध्ये सर्वत्र घटस्थापना केली जाते. यावेळी अखंड दिवा, फुलांची माळ देखील घटावर लावण्यात येते. नवरात्र म्हटले की येतात ते नऊ दिवसांचे उपवास. नव्रातरचे नऊ दिवस उपवास अनेक लोकं मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने करतात. हे उपवास ज्यांच्याकडे नवरात्र आहे ते लोकं तर करतातच मात्र ज्यांच्याकडे नवरात्र नाही ते लोकं देखील करतात. (Marathi)

वाल्मिकी पुराणात सांगितलेल्या कथेनुसार, भगवान श्रीरामांनी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत ऋष्यमूक पर्वतावर कायद्यानुसार परम शक्ती महिषासुरमर्दिनी देवी दुर्गा यांची पूजा केली होती. त्यानंतर दशमीच्या दिवशी किष्किंधा पर्वतावरून लंकेत जाऊन त्यांनी रावणाचा वध केला. या नऊ दिवसांमध्ये श्रीरामांनी उपवास करून देवीची आराधना केली. तेव्हापसूनच कदाचित नवरात्रीमध्ये उपवास करण्याची प्रथा सुरु झाली असावी. नवरात्रामध्ये केल्या जाणाऱ्या उपवासांना देखील मोठे महत्व आहे. यंदा येत्या २२ सप्टेंबरपासून नवरात्रीची सुरुवात होणार आहे. याकाळात अनेक जण संपूर्ण नऊ दिवस उपवास धरतात. आज आपण या लेखातून याच नवरात्रीच्या उपवासांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. (Todays Marathi News)

नवरात्रीच्या उपवासाचे प्रकार
> काही लोकं नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी काही दिवस किंवा पूर्ण नऊ दिवस उपवास करतात.
> काही व्यक्ती दिवसातून एकदाच उपवासाचे पदार्थ (फराळ) खातात, याला ‘एकवेळ उपवास’ असे म्हणतात.
> काहीजण फक्त उपवासाला चालणारे पदार्थ खाऊन उपवास करतात.
> काही जण फक्त दिवसातून एकदाच रात्री जेवतात. याला एकभुक्त उपवास म्हणतात.
> काही जण नऊ दिवस एकाच प्रकचे धान्य खाऊन उपवास करतात.
> ज्या लोकांना नऊ दिवस उपवास करता येत नाहीत किंवा जे करत नाही ते सप्तमी, अष्टमी आणि नवमीचे उपवास करू शकतात. याला त्रिरात्री व्रत म्हणतात.
> जे लोक प्रतिपदा आणि अष्टमी व्रत करतात त्यांना युग्मरात्री व्रत म्हणतात. जो फक्त आरंभी व शेवटी व्रत करतो त्याला एकरात्री व्रत म्हणतात.

Navratri

नवरात्रातील उपवासाचे नियम
– या नऊ दिवसांत उपवास धरल्यास मद्यपान आणि मांसाहार टाळावा.
– या काळात नखे, केस किंवा दाढी कापू नये.
– उपवास केल्यावर तुम्ही दूध, साबुदाणा, भगर, फळे असा आहार घेऊ शकता.
– नवरात्रीच्या उपवास काळात मोहरी किंवा तिळाचे तेल वापरणे टाळा.
– या काळात तुम्ही शेंगदाण्याचे तेल आणि तूप वापरू शकता.
– या काळात सामान्य मिठापेक्षा सैंधव मीठ वापरणे चांगले असते.
– या काळात दुपारी किंवा दिवसा झोपू नये.
– या काळात शक्य असल्यास चामड्याच्या वस्तू वापरणे टाळावे.

नवरात्रीचे उपवास करण्याचे शरीराला होणारे फायदे

वजन कमी होण्यास मदत
तज्ज्ञांच्या मते या उपवासात अनेकजण कमी तेलकट पदार्थ खातात. गोड पदार्थ कमी खातात. शिवाय रोजच्या तुलनेत जास्त फळे खाण्यात येतात. असा आहार वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. उपवास करताना केवळ फळांचा आहार घेतल्यास शरीरातील हायड्रेशन पातळीही वाढते. नवरात्रीचे उपवास केल्यास वजन कमी होण्यास नक्कीच मदत होते. (Marathi Top News)

चांगली झोप लागते
नवरात्रीमध्ये केल्या जाणाऱ्या उपवासांमुळे केवळ शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होत नाही, तर मनालाही फायदा होतो. उपवास काळात तळलेले आणि स्निग्ध पदार्थ खाण्याचे टाळल्यास मनामध्ये सकारात्मक भावना जागृत होतात, तणाव कमी होतो. या बदलांमुळे चांगली झोप लागते.’ (Latest Marathi News)

=========

Navratra : घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Navratra : शारदीय नवरात्र का साजरे केले जाते?

=========

शरीर डिटॉक्स होण्यास मदत
नवरात्रातील उपवासांमुळे नकळत का असेना तुम्ही तुमच्या शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात. कारण या उपवासामध्ये तुम्ही जनक फूड किंवा मैद्याचे, पचनास जड पदार्थ कमी खातात. यामुळे तुमच्या पचनसंस्थेला एकप्रकारे विश्रांती मिळते. तसेच तुमचं शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. सलग नऊ दिवस उपवास करताना सात्विक अन्न खाल्ल्यानं डिटॉक्सिफिकेशन होते. ज्यामुळे पोट आणि त्वचेला फायदा होतो. (Top Trending News)

रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत
जर तुम्ही उपवास केला तर तुमची रोगप्रतिकारशक्तीही वाढते. कारण उपवास केल्याने शरीरामध्ये प्रतिरोधक पेशी तयार होतात. ऋतू बदलल्यानंतर अनेकदा रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. परंतु जर तुम्ही उपवास केला, तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तुम्ही विषाणूजन्य आजार, ताप किंवा खोकला, सर्दीपासून स्वतःचं संरक्षण करू शकता. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.