नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. नवरात्रीचे नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. देवी पार्वतीने नऊ दिवस नऊ रूपं घेऊन महिषासुर राक्षसाचा वध केला. यामुळेच हे नऊ दिवस तिच्या नऊ रूपांची पूजा करण्याची पद्धत आहे. मात्र यासोबतच नवरात्रीच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये अजून काही परंपरा पाळल्या जातात. यातलीच एक महत्वाची रीत म्हणजे नवरात्रातील अष्टमीला केले जाणारे कन्यापूजन. नवरात्रातील अष्टमीला कन्या पूजन करण्याचे मोठे महत्व आहे. महाअष्टमी २९ सप्टेंबर २०२५, सोमवारी असून, या अष्टमी तिथीची सुरूवात २८ सप्टेंबर, रोजी रात्री ०८:३१ पासून होणार आहे. तर अष्टमी तिथीची समाप्ती २९ सप्टेंबर, रात्री ०६:२५ ला होईल. (Navratri)
कन्या पूजनाशिवाय नवरात्रीची पूजा अपूर्ण मानली जाते. नवरात्रीच्या ९ दिवसांपैकी कोणत्याही दिवशी कन्या पूजन करता येते. मात्र, अष्टमी आणि नवमी तिथीला कन्या पूजन करणे सर्वात शुभ आणि लाभदायक मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, १० वर्षांपर्यंतच्या मुलींची पूजा करणे अत्यंत पुण्यकारक असते. कन्यांसोबत एका मुलाला भैरव बाबाच्या रूपात पूजले जाते. ९ मुली आणि एका मुलाचे पूजन करणे शुभ मानले जाते. नवरात्रीमध्ये मुलींची पूजा करताना काही खास गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. तर चला जाणून घेऊया कन्या पूजेबद्दल सविस्तर माहिती. (Todays Marathi Headline)
कन्या पूजेचे महत्त्व
धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये कन्यापूजेला विशेष महत्त्व असते. नवरात्रीच्या काळात नऊ मुलींची नऊ देवी म्हणून पूजा केली जाते. तसेच एखाद्याच्या क्षमतेनुसार त्यांना अन्नदान केले जाते. असे मानले जाते की जे लोक नवरात्रीच्या अष्टमी आणि दशमी तिथीला कन्येची पूजा करतात आणि प्रसाद घेऊन उपवास संपवतात, त्यांना माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद मिळतो. ज्योतिष शास्त्रानुसार अष्टमीच्या दिवशी कन्येची पूजा केल्यास शुभ फळ मिळते. (Top Marathi Headline)
कन्या पूजेत काय करावे?
– कन्या पूजा करण्यासाठी सर्व प्रथम ९ मुलींना मोठ्या आदराने आपल्या घरी बोलावावे (Latest Marathi News)
– कन्या पूजेमध्ये ९ मुलींना ९ देवींचे रूप मानले जाते, त्यामुळे कन्या पूजेसाठी फक्त ९ मुलींना बोलवा. जर तुम्हाला ९ मुली एकत्र न मिळाल्यास जेवढ्या आल्या त्या सर्व मुलींची पूजा करा आणि उरलेल्या मुलींना भेटवस्तू आणि प्रसाद द्या.
– ९ मुलीसोबत एक किंवा दोन मुलांना बोलावण्याचाही नियम आहे. हिंदू मान्यतेनुसार, ही दोन मुलं गणपती आणि भगवान भैरवाचे प्रतीक आहेत.
– कन्या पूजन करताना कन्यांना स्वच्छ जागेवर बसवले पाहिजे आणि स्वच्छ पाण्याने त्यांचे पाय धुतले पाहिजे.
– पाय धुतलेल्या पाण्याला डोक्यावर लावून चरणस्पर्श करुन आशीर्वाद घ्यावा.
– यानंतर कन्यांच्या कपाळावर कुंकु लावून त्यांच्यावर फुलं आणि अक्षता वाहाव्या. (Marathi Trending News)
– कन्या पूजनात कन्यांच्या आवडीचे पदार्थ करावे आणि यथाशक्ती दक्षिणा आणि भेट वस्तू द्यावा.
– धार्मिक मान्यतांनुसार कन्यापूजेच्या वेळी नेहमी लक्षात ठेवा की ज्या मुलींची पूजा केली जात आहे त्यांचे वय १० वर्षांच्या आत असावे.
=======
Durga Puja : सप्तमीपासून सुरु होणाऱ्या दुर्गा पूजेची संपूर्ण माहिती
Uttar Pradesh : या मंदिरात होते, देवीच्या पाळण्याची पूजा !
=======
कन्या पूजेत काय करू नये
– मुलींसाठी स्वादिष्ठ आणि कमी तिखटाचे अन्न बनवावे. त्यांच्यावर खाण्यासाठी दबाव टाकू नका.
– घरी आलेल्या मुलींशी अतिशय आदराने वागा, त्या प्रसन्न झाल्यास तुम्हाला देवीचा आशिर्वाद आपोआपच प्राप्त होतो
– मुलींना शिळे अन्न खाऊ घालू नका. त्यांना फक्त ताजे तयार केलेले अन्नच खायला द्यावे.
– मुलीसाठी तयार केलेल्या जेवणात लसूण, कांदा वगैरे घालू नये. (Social News)
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics